Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र* ...

पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र* *विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, नवउद्योजक व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १९ : विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, नावीन्यपूर्ण उपाययोजनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाचे जनजागृती सत्र गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

 

हे सत्र सकाळी ९.३० ते ११ या वेळेत बोट क्लब कॅन्टीनजवळील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मिनी सभागृहात होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

पुण्यातील सत्राचे आयोजन व समन्वय करण्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले असून या जनजागृती सत्रात ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची उद्दिष्टे, स्पर्धेत सहभागी होण्याच्या संधी आणि सहभागाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी संबंधित भागधारकांशी संवाद साधणार आहेत.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुकांना आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, नवउद्योजक, नवसंशोधक, उद्योजक तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती घेऊन जनजागृती सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश रा. वराडे यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments