Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेवा संकल्प अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात कृषी विभागाची मोहिम* ...

सेवा संकल्प अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात कृषी विभागाची मोहिम* *७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण*

 

 

 

पुणे, दि. १९ (जिमाका, वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पुणे जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

 

अभियानांतर्गत जिल्ह्यात ७ लाख २३ हजार ४५३ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २०१९ पासून आतापर्यंत १ हजार ९०८ कोटी रुपयांचा निधी थेट त्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यात या योजनेचे सुमारे ४.५९ लाख शेतकरी पात्र आहेत.

 

शेतकऱ्यांना डिजिटल कृषी सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे ‘महाविस्तार’ ॲप आतापर्यंत २ लाख ८३ हजार ८६८ शेतकऱ्यांनी डाउनलोड केले आहे. तसेच प्रत्यक्ष शेती व शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांना कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राकरिता २ लाख ४२ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

 

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याच्या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार १८४ दिवे प्रज्वलित करण्यात आले.

 

या अभियानाद्वारे पात्र शेतकऱ्यांची ओळख निश्चित करणे, योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे आणि डिजिटल कृषी सेवांचा विस्तार करणे यावर भर देण्यात आला.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments