पुणे, दि.२७: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दुकानदारांना दिवसा मालाची ने – आण करण्यास मनाई करण्यात आली असून दुकानदारांना १२ नोव्हेंबर पर्यंत रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेत मालाची चढ-उतार करता येईल.
दिवाळी सणाच्या अनुषंगाने शहरातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, भोरी आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, तापकीर गल्ली, कुमठेकर रोड, केळकर रोड, बाजीराव रोड व मध्यवर्ती भागातील दुकानदारांना हे आदेश लागू राहतील असे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी कळविले आहे.
००००


