पुणे, दि. २८ : पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नोव्हेंबर २०२६ मध्ये खेड, मंचर, जुन्नर वडगाव मावळ व लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खेड येथे ३ ते ५, मंचर येथे १२,१३ व १६, जुन्नर येथे १७ ते १९ वडगाव मावळ येथे २३, २५ व २६ तर लोणावळा येथे २७ व ३० नोव्हेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
0000


