पुणे, दि. २८ :
माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भ्रष्टाचार काढू नये यासाठी गुंड पाठवून मारहाण केली. या संदर्भात सुनील गुजर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करीत याकडे शासनाचे लक्ष वेधले. कथित खाण व्यवहार आणि रॉयल्टीबाबतही प्रश्न, निष्पक्ष चौकशीची मागणीही गुजर यांनी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सुनील गुजर यांनी सांगितले, की टाटा कंपनीचे बेकायदेशीर हजारो कोटी रुपयांच्या बेकायदेशीर उत्खनना संदर्भात व तळेगाव एमआयडीसीतील आंबळे गावातील भ्रष्टाचार जगासमोर आणला. याचा राग मनात धरून १६ ऑक्टोबर रोजी मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके यांनी काही गुंडासह आपल्याला मारहाण केली. माहिती अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे हिसकावून घेण्यात आली. तसेच ‘माझ्याविरोधात कागदपत्रे काढतो काय, थांब तुझा किशोर आवारे सारखा कार्यक्रम करतो’, म्हणत धमकी दिली. आपल्या समवेत जमीन हक्क परिषदेच्या राज्य महिला अध्यक्ष करुणाताई सरोदे यांना जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व पीडित न्याय मागायला येत असतात आणि तिथेच जर अनुचित प्रकार घडत असेल, तर न्याय कुठे मागायचा ? त्यामुळे या प्रकरणात स्वतः जिल्हाधिकारी यांनी फिर्याद देऊन साक्षीदार म्हणून त्यांचे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. मावळ टाटा गौण खनिजाची चौकशी करून दंड वसुल करून सरकारी तिजोरीत रक्कम अदा करावी, ही आमची मागणी आहे.
————————————————
* माहितीसाठी :
मौजे खांडी सावळा येथील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागांमध्ये टाटा कंपनीने दिनांक २४/०३/२०२६ रोजी त्यांच्या जमीन गट क्र. ३७९ क्षेत्र ५६९ हेक्टर मधून दगड व मुरूम काढण्याची पूर्व परवानगी मागितली होती, परंतु सदरचा भाग संवेदनशील अर्थात (Eco-sensitive) असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हा सचिव महसूल व वन विभाग व पर्यावरण सचिव महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग यांच्याकडे अनुमतीने साठी सदर अर्ज पाठवण्यात आला होता, परंतु सदरचे क्षेत्र संवेदनशील (Eco-sensitive) असल्यामुळे खानपट्ट्यास व गौण खनिज उत्खनांस पूर्वपरवानगी देण्यात आली नाही. तरीही टाटा कंपनीने त्या भागातून अंदाजे ८० ते ९० हजार ब्रास दगड व ५० ते ६० हजार ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन केले आहे. त्याची एक रुपयाही रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत जमा नाही. म्हणजेच आज रोजी टाटा कंपनीकडे दंडासह १०० कोटी रुपये येणे आहे. या माहितीकरिता व तालुक्याचे आमदार श्री. सुनील शेळके त्यांचे वडील श्री. शंकराव शेळके त्यांच्या आई सौ. सुमनराव शेळके भाऊ श्री. सुदाम शंकरराव शेळके व सौ. सारिका सुनील शेळके, श्री. सुधाकर शेळके तसेच सौ. लिलाबाई वसंत घोलप श्री. विलास बाबुराव काळोखे श्री. सचिन संभाजी काळोखे श्री. संदीप संभाजी काळोखे श्री. संदीप वसंत घोलप श्री. संतोष वसंत घोलप श्री. सागर शिवाजीराव पवार श्री. शिवाजी ज्ञानोबा पवार सौ. शकुंतला शिवाजी पवार सौ. मनीषा विलास काळोखे श्री. श्रीकांत खंडू शिवेकर श्री. मयूर विलास काळोखे या सर्वांनी मौजे आंबळे तालुका मावळ येथील लाखो ब्रासचे गौण खनिज उत्खनन गट क्र. १०८, १०९, ११३, ११४, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२३, १२५, १२६, १३६/१, १३६/२, १६३/३, १३७, १४१, १४३/२, १४९, १५२, १५४, १५८, १७०, १७१/२, १७२, १७५/२, १९१, १९२, १९५ या जमीन गटातून लाखो ब्रासचे उत्खनन केलेले आहे. सदर उत्खननाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेट.
किमान १००० कोटीची रॉयल्टी (दंड रक्कम वगळता) यांच्याकडे येणे आहे. यातील आमदार महोदयांनी स्वतःच्या नावावर वनीकरणाची जमीन फोडलेली आहे. तसेच वनिकरणाची जमीन वरील सर्व टोळीने फोडलेले आहे. त्याचे पुरावे सोबत जोडून जोडलेले आहे. तसेच टॉवर लाईन खाली देखील खोदकाम केले असून, कुठल्याही क्षणाला टॉवर लाईन कोसळू शकते. त्याचबरोबर या मंडळींनी शेतकऱ्यांकडून एमआयडीसी ने घेतलेल्या जमिनी ज्या आता एमआयडीसीच्या ताब्यात आहेत त्या शेकडो एकर जमिनीवर अवैध्य उत्खनन केलेले आहे.
तसेच माननीय आमदार श्री. सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांना ७२ एकर शंभर फुटी खोदकाम केलेली जमीन एमआयडीसीला देऊन त्या बदल्यात तेवढीच चांगली जमीन पदरात पाडून घेतली आहे. याची किमान जवळपास २५० कोटी होत आहे. यामध्ये अनेक उच्चपदस्थ्य स्थानिक आहेत. या सर्व प्रकारच्या शोध मी गेले अनेक दिवस करत आहे.
याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी मिळवल्यामुळे त्यांनी माझ्यावर पाळत ठेवून गुंडाकरवी व स्वतः माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मला मारहाण केली व माझ्या समवेत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता सौ. करुणाताई सरोदे यांना धक्काबुक्की केली व जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच नियोजनबद्ध किडन्याप करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या समवेत असणाऱ्या सौ. करुणाताई सरोदे यांनी आरडाओरडा केल्यामुळे मी बचाव करू शकलो. माननीय आमदार साहेब तुमच्या वैयक्तिक संरक्षणास २५ पोलीस असताना तुम्ही नियोजनबद्ध गुन्हेगारांना सोबत घेऊन माझ्यावर हल्ला केला व मीच तुमची पाळत ठेवण्याचा बनाव करून बंडगार्डन पोलीस स्टेशनला माझ्याविरुद्ध मला खोटा अडकविण्याचा प्रयत्न केला.
परंतु तेथील मी ओळखत नसलेल्या परंतु इतर प्रकरणात उपस्थित असलेल्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आल्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखत मला अनपेक्षितपणे मदत केली. व त्यामुळे खोटा बनाव रचलेला तुमचा डाव आमदार महोदय उधळा गेला. तरी देखील आपण सर्व पत्रकारांना लगेच खोटे माहिती देऊन माझ्याविरुद्ध बातमी देण्यात आली. त्यामुळे माझ्या कुटुंबातील पत्नी, मुले, मुलगी, सर्वच भयभीत झालेले आहे. आमदार साहेब मी तुम्हाला तुमच्या काळ्या कारनाम्या विषयी मिळालेल्या शासकीय कागदपत्रासह पुरावा पत्रकारांना देत आहे.
* माझे प्रश्न पुढील प्रमाणे-
१. टाटा कंपनीने गाव सावळा खांडी या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन केलेले आहे की नाही? त्यांचा दंडासह रॉयल्टी कोण भरणार? तो पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भाग इकोसिन्सिटीव्ह आहे की नाही ?
२. टाटा व पीडब्ल्यूडी (PWD) यांच्याकडून रस्त्याचे काम कोणी घेतले ? व प्रत्यक्ष कोण करीत आहे ? त्यात तुमचे नाव आहे की नाही ?
३. सावळा हे गाव पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदिशील असूनही त्याच गावातून हजारो लाखो टन मुरूम या रस्त्या करिता वापरला आहे की नाही ?
४. आंबळे येथील गट क्र. १२१,१२३,१९५ हे वनीकरणांमध्ये आहेत तरी आपण यामध्ये उत्खनन केले आहे की नाही ? त्याचे पुरावे लगेच सादर करतो. तुम्ही या उद्योगांमध्ये गेली २५ वर्षे कार्यरत असताना, तुम्हास सर्व कायद्याचे ज्ञान असूनही आपण सत्तेच्या जोरावर अनाधिकृत काम केले असून त्याची आपण रॉयल्टी भरलेली नाही. तसेच आंबळे येथील तुमचे कार्यकर्ते विलास बबनराव काळोखे, लिलाबाई वसंत घोलप, शकुंतला शिवाजी पवार, शिवाजी ज्ञानोबा पवार, शंकरराव बाजीराव शेळके, सुनील शंकरराव शेळके, सुधाकर शंकराव शेळके, सुदाम शंकराव शेळके, यांनी वनीकरण क्षेत्रातील जमीन गट क्र.१२१,१२३,१२५,१९५ येथून व गट क्र. १०८,१०९,११३,११४,११६,११७,११८,११९,१२०,१२१,१२३,१२५,१२६,१३६/१,१३६/२,१६३/३,१३७,१४१,१४३/२,१४९,१ ५२,१५४,१५८,१७०,१७१/२,१७२,१७५/२,१९१,१९२,१९५ येथे उत्खनन करून हजारो कोटीची रॉयल्टी बुडवून शासनास नाममात्र रॉयल्टी जमा केली असून शासनाची फसवणूक केली आहे. हे सर्व गट आमच्यासमोर ड्रोन द्वारे मोजण्याची तयारी आहे का? वनीकरण क्षेत्रात जे काही दगडफोड काम केले आहे त्याचे काय? यातून कागदपत्र सह व्हिडिओ रेकॉर्डिंग व गुगल इमेज देत आहे. आमदार साहेब एवढे पुरावे जमा करण्याकामी मला दररोज जिल्हाधिकारी व इतर महसूल कार्यालयात जावे लागत असे. तुम्ही मला मारहाण करून शिव्या दिल्या, माझे व्यक्तिशः बदनामी केली, व मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला.


