पुणे दि २८ आक्टों
‘पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना दिलेल्या पसंती-क्रमानुसार मतांची, मतमोजणी होते; त्यामुळे या निवडणुका कायम मतपत्रीकेवरच होतात, तर कधीही ईव्हीएम वर झालेल्या नाहीत’ हे देखील पंतप्रधानांना समजू नये….(?) ही बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी काय अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की,
मविआ आघाडीतील काही सदस्यांची बंडखोरी, त्यामुळे बसलेला फटका व काँग्रेस’ची ‘मतदार नोंदणी, मविआ घटक पक्षांची भुमिका इ बाबतीत काँग्रेस पक्ष निश्चितच विश्लेषण व आत्मचिंतन करेल, मात्र तरी देखील ‘मतदान कायम मतपत्रीकेवरच’ व्हावे या विषयी काँग्रेसची आजही आग्रही भूमिका आहे. तसेच
मविआ’तील २ घटक पक्षांच्या विजयात काँग्रेसचा वाटा आहे हे विसरतां येणार नाही.
या निवडणुकीत नागपुर विभागातुन पदवीधर मध्ये अभिजीत वंजारी यांना तुल्यबळ मते मिळाली व शरदचंद्रजी पवार राष्ठ्रवादी काँग्रेस बंडखोर उमेदवार निलेश कराळे यांना भाजप विरोधात मतदान झाले आहे.. व या दोन्ही मविआ उमेदवारांची मते एकत्र केल्यास.. भाजप’ला आरशात नागपुर मधील लोकमताचा कौल दिसुन येतो त्या मुळे पंचप्रधान मोदींनी काँग्रेस वर केलेला टिकेचा आततायीपणा हास्यास्पद आहे..!
देशाचे पंतप्रधान यांनी प्रगल्भतेचे धडे घ्चावेत व सदा न् कदा स्वातंत्र्योत्तर लोकशाहीवादी भारताचा पाया रचणाऱ्या ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ या १२ वेळा देशातील जनतेने निवडून दिलेल्या पक्षाच्या विरोधात सतत तोंडसुख घेण्याचा हव्यास कमी करावा अशी उपहासात्मक टिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
शिवाय काही अपक्ष उमेदवारांना आघाड्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे केवळ विजयी जागांच्या संख्येवरून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
———————-///————


