Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉग्निझंटने पुण्यात अत्याधुनिक कॅम्पसचे केले अनावरण; ‘AI बिल्डर’च्या दृष्टीकोनाला गती

कॉग्निझंटने पुण्यात अत्याधुनिक कॅम्पसचे केले अनावरण; ‘AI बिल्डर’च्या दृष्टीकोनाला गती

या नूतनीकरणातून कंपनीची शहरातील प्रतिभावंत, तंत्रज्ञान आणि समुदाय परिसंस्थेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित

 

 

 

पुणे, भारत, ५ नोव्हेंबर २०२६: अग्रगण्य AI बिल्डर आणि तंत्रज्ञान सेवा पुरवठादार असलेल्या कॉग्निझंट (NASDAQ: CTSH) ने आज पुण्यातील आपल्या नूतनीकृत आणि अत्याधुनिक कॅम्पसचे उद्घाटन केले. याद्वारे कंपनीची या भागातील प्रतिभावंत आणि नावीन्यपूर्ण परिसंस्थेवरील कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. चार ब्लॉक्समध्ये पसरलेला आणि १,३९,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा उन्नत कॅम्पस सुरक्षितता, विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि कार्यस्थळावरील कामगिरी उंचावण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे सहकाऱ्यांना काम करण्यासाठी एक आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज वातावरण उपलब्ध होईल.

 

 

 

“गेल्या दोन दशकांत, आमचे पुणे केंद्र जागतिक उद्योगांना प्रगत तंत्रज्ञान सोल्यूशन्स पुरवणारे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित झाले आहे,” असे कॉग्निझंट इंडियाचे प्रेसिडंट (ग्लोबल ऑपरेशन्स) आणि चेअरमन तसेच मॅनेजिंग डायरेक्टर राजेश वॉरियर म्हणाले. “हा उन्नत कॅम्पस आमच्या ‘AI बिल्डर’च्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. भविष्यासाठी तयार असलेले हे वातावरण आमच्या सहकाऱ्यांना एकमेकांसोबत काम करण्यासाठी, नाविन्य आणण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यासाठी सक्षम करेल.”

 

 

 

या कॅम्पसच्या नूतनीकरणामुळे बसण्याची क्षमता ९६० वरून १,२७० वर्क सीट्सपर्यंत वाढवली असून विद्यमान परिसराचे सर्वसमावेशक आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पात कार्यस्थळाची अंतर्गत रचना, इमारत सेवा, दर्शनी भाग (फसाड) आणि बाह्य परिसर, तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि पूरक सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे एक ताजेतवाने आणि समकालीन कार्यस्थळ तयार झाले आहे.

 

 

 

सहकाऱ्यांच्या बदलत्या गरजा अनुरूप आपली कार्यस्थळे विकसित करण्याच्या कॉग्निझंटच्या प्रयत्नांचे हे रूपांतरण एक प्रतीक आहे. आधुनिक कार्यक्षेत्रे, सुधारित पायाभूत सुविधा आणि वर्धित सुविधा एकत्र आणून, पुणे कॅम्पस अधिक सहकार्य, संवाद आणि एक सुधारित कर्मचारी अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केला गेला आहे.

 

 

 

नूतनीकरण केलेल्या कार्यक्षेत्रांसोबतच, येथे अंदाजे ३५० आसनांचे नवीन ओपन-एअर अँफिथिएटर, अंदाजे ५४० आसनांची उन्नत कॅन्टीन आणि २५५ आसनांचे बहुउद्देशीय सभागृह (मल्टीपर्पज हॉल) तयार करण्यात आले आहे. तसेच, आधुनिक जिम आणि समर्पित योगा रूम असलेला एक सुधारित वेलनेस सेंटर सहकाऱ्यांना ताजेतवाने होण्यासाठी आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो.

 

 

 

कॉग्निझंटची पुण्यावरील निष्ठा केवळ कार्यस्थळापुरती मर्यादित नाही. ‘कॉग्निझंट आऊटरीच’ या कर्मचारी स्वयंसेवक कार्यक्रमाद्वारे कंपनीने शहरातील समुदायावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे काम केले आहे. २०१७ मध्ये, ‘आऊटरीच’ने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास पार्श्वभूमीतील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्टेम (STEM) शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘प्रोजेक्ट ध्येय’ सुरू केले, ज्याचा उद्देश भावी अभियंते घडवणे हा होता. तेव्हापासून हा उपक्रम भारतातील इतर शहरांमध्येही पसरला आहे. या उपक्रमात २५० हून अधिक स्वयंसेवकांनी १०,००० हून अधिक तास शिक्षणदानासाठी योगदान दिले असून, हा कार्यक्रम सध्या ८ वीपासून पदवीपर्यंतच्या ६५० हून अधिक विद्यार्थ्यांना आधार देत आहे. या कार्यक्रमातील अनेक लाभार्थ्यांनी IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT अलाहाबाद, VIT पुणे आणि PICT यांसारख्या अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे.

 

 

 

कॉग्निझंटचे भारतभर बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली-NCR, गिफ्ट सिटी, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, मंगळुरू, मुंबई, पुणे आणि विशाखापट्टणम येथे भक्क

म ऑपरेशनल अस्तित्व आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments