Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त*

पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त*

 

 

पुणे, दि. ५ (जिमका वृत्तसेवा) : पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरातील राहुल एजन्सीज या दुकानात परवान्याशिवाय साठवून ठेवलेला ६५ लाख ३४ हजार ४२८ रुपये किमतीचा कीटकनाशकांचा बेकायदेशीर साठा कृषी विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानमालक राहुल साहेबराव निकम याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) निलेश गवरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल गणपतराव जाधव आणि गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती हवेली येथील सुनील सिताराम रुपनर यांनी १४ व १५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवाजी रोड, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ येथील राहुल एजन्सीज या दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानाच्या परवान्यामध्ये नोंद नसलेला तसेच आवश्यक परवानगीशिवाय साठवून ठेवलेला कीटकनाशकांचा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये डेल्टामेथ्रिन, इमिडाक्लोप्रिड, क्लोरपायरीफॉस, फिप्रोनिल, सायपरमेथ्रिन यांसह विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचनामा करून कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून संबंधित साठ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

 

शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेकायदेशीर कृषी निविष्ठांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments