Monday, November 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ*

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ*

 

 

पुणे, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 

शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.

 

आता इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी व्यक्तींना अर्ज सादर करण्यासाठी १६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९.५९ वाजेपर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

 

अर्ज व पुरस्कारासंदर्भातील सूचना क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या विभागात ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. पात्र इच्छुकांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments