Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोग्लिक्सने औद्योगिक पुरवठा साखळी क्षमतांच्या बळावर सौरऊर्जा क्षेत्रात केले पदार्पण: कारखान्यांच्या छतापासून...

मोग्लिक्सने औद्योगिक पुरवठा साखळी क्षमतांच्या बळावर सौरऊर्जा क्षेत्रात केले पदार्पण: कारखान्यांच्या छतापासून घरांपर्यंत सेवा देण्यासाठी सज्ज 

 

भारतातील सौरऊर्जेचा विस्तार आता मोठ्या प्रकल्पांनंतर छतावरील (रूफटॉप) प्रणालींकडे वळत असताना, ‘मोग्लिक्स सोलर’ने औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वयंपूर्ण वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आखले आहे

 

राष्ट्रीय, २५ नोव्हेंबर, २०२६: मोग्लिक्सने औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांसाठी ‘मोग्लिक्स सोलर’ हा सर्वसमावेशक रूफटॉप सोलर व्यवसाय सुरू केला आहे. यातील औद्योगिक क्षेत्राअंतर्गत कंपनी प्रामुख्याने उत्पादन, ऑटोमोटिव्ह, वेअरहाऊसिंग, एफएमसीजी, औषधनिर्मिती, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उद्योगांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

 

भारतातील सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार आता मोठ्या सोलर पार्क्सकडून इमारतींच्या छतांपर्यंत पोहोचत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये सुमारे ३ गिगावॅट असलेली देशाची स्थापित सौरऊर्जा क्षमता आता वाढून सुमारे १७२ गिगावॅटवर पोहोचली आहे.

 

मोग्लिक्सच्या या वैशिष्ट्यपूर्ण उद्योग भागीदारी मॉडेलअंतर्गत, पात्र उद्योगांना कोणताही सुरुवातीचा भांडवली खर्च न करता रूफटॉप सोलर प्रणाली बसवता येणार आहे. या प्रणालीची परतफेड त्यांच्या सध्याच्या वीजबिलाएवढ्या किंवा त्याहून कमी मासिक हप्त्यांद्वारे करता येईल आणि कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर या संपूर्ण प्रणालीची मालकी संबंधित उद्योगाकडे राहील.

 

अलीकडच्या काळातील रूफटॉप सोलरच्या वाढीमध्ये घरगुती ग्राहकांचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ कोटी घरांच्या उद्दिष्टासह, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केलेली ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ आतापर्यंत ६५ लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचली आहे. ‘मर्कॉम इंडिया रिसर्च’च्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत नव्याने जोडल्या गेलेल्या रूफटॉप क्षमतेपैकी ८४ टक्के वाटा घरगुती प्रकल्पांचा, तर सुमारे १५ टक्के वाटा औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांचा राहिला आहे.

 

लहान व्यवसायांमध्येही या क्षेत्रासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. भारताच्या एकूण निर्यातीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा वाटा जवळपास ४५ टक्के असून, त्यांच्याकडे अंदाजे १५ ते १८ गिगावॅट इतकी रूफटॉप सौरऊर्जा निर्मितीची अद्याप न वापरली गेलेली क्षमता आहे. पारंपरिक वीजपुरवठ्याच्या (ग्रिड) प्रति युनिट ५.६ ते ९.९ रुपये दराच्या तुलनेत रूफटॉप सोलरचा खर्च केवळ ३.८ ते ६.५ रुपये प्रति युनिट इतका येतो; मात्र सुरुवातीचा मोठा खर्च, वित्तपुरवठ्याची कागदपत्रे आणि अनेक विक्रेत्यांशी समन्वय साधण्याची गुंतागुंत यामुळे अनेक व्यवसाय याकडे वळण्यास कचरतात.

 

ऊर्जा क्षेत्र आता केवळ गरजेपुरते मर्यादित न राहता आर्थिक स्थैर्य आणि सक्षमीकरणाचा आधार बनले आहे. पश्चिम आशियातील संघर्षाने या वर्षी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० अमेरिकन डॉलरच्या पुढे नेले असून देशांतर्गत डिझेलच्या किमतीही वाढवल्या आहेत; या वाढीव खर्चाचा थेट फटका जनरेटरवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना बसला आहे. गरजेचे बहुतांश तेल आयात करणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी अशा प्रकारची अस्थिरता विकासदरावर परिणाम करणारी ठरते. २ नोव्हेंबर रोजी ‘भारत अक्षय ऊर्जा शिखर परिषदेत’ बोलताना माननीय पंतप्रधानांनी ऊर्जा सुरक्षा ही थेट आर्थिक सुरक्षेशी जोडलेली असल्याचे नमूद केले आणि पुढील १० ते ११ वर्षांत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन ऊर्जा क्षमता जोडण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.

 

‘मोग्लिक्स सोलर’ ग्राहकांना एकाच जबाबदार भागीदाराच्या माध्यमातून पाच परस्परसंबंधित टप्प्यांतून सेवा देते. यामध्ये ऊर्जेचे मूल्यमापन आणि प्रणालीची रचना, बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समन्वयाने वित्तपुरवठा, उपकरणांची खरेदी, प्रमाणित भागीदारांमार्फत प्रणालीची उभारणी आणि कर्जाच्या कालावधीदरम्यान तिची देखभाल यांचा समावेश आहे. या प्रक्रियेच्या शेवटी संपूर्ण प्रणालीची मालकी ग्राहकाकडे राहते. या प्रवासात ‘मोग्लिक्स सोलर’ वीज वितरण कंपन्यांकडून आवश्यक परवानग्या आणि ‘नेट मीटरिंग’साठी समन्वय साधते, तसेच सरकारी इन्सेन्टिव्हच्या अर्जांसाठीही साहाय्य करते. याशिवाय, सौरऊर्जेचा निर्णय घेण्याबाबत अद्याप विचार करणाऱ्या व्यवसाय आणि घरगुती ग्राहकांना त्यांच्या जागेनुसार या प्रकल्पाचे आर्थिक गणित समजावून सांगण्यासही कंपनी मदत करते.

 

कोणताही व्यवसाय सध्याही कर्ज घेऊन सौरऊर्जा प्रकल्प खरेदी करू शकतो, मात्र त्यासाठी कर्जदार संस्था, पुरवठादार आणि प्रकल्प उभारणारे यांच्याशी स्वतंत्रपणे समन्वय साधावा लागतो. दुसरीकडे, ‘पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट’ पद्धतीमध्ये प्रकल्प विकासकाकडे प्रकल्पाची मालकी राहते आणि तो ग्राहकाला वीज विकतो. या दोन्ही पर्यायांचा समतोल साधत ‘मोग्लिक्स सोलर’ प्रकल्पाची मालकी आणि सर्व कामांसाठी एकाच जबाबदार भागीदाराची किंवा सिंगल काउंटरपार्टी सुविधा एकत्रितपणे देते.

 

हा नवा व्यवसाय मोग्लिक्सच्या आधीच मजबूत असलेल्या सौरऊर्जा पुरवठा साखळीच्या बळावर उभारण्यात आला आहे. कंपनीने २० हून अधिक उत्पादन भागीदार आणि ३०० पुरवठा भागीदारांच्या मदतीने ५ गिगावॅटहून अधिक क्षमतेच्या सौर प्रकल्पांना उपकरणे पुरवली असून, ९५ टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने पोहोचवल्या आहेत. कंपनीने पुरवठा केलेल्या प्रकल्पांमध्ये कुर्नूल येथील ‘वारी अल्ट्रा मेगा सोलर पार्क’ (९८० मेगावॅट), जगलूर येथील ‘क्लीनमॅक्स विंड-सोलर फार्म’ (३८३ मेगावॅट), शाजापूर येथील ‘एनजीएसएल सोलर पार्क’ (३२५ मेगावॅट) आणि राजकोट येथील ‘वारी कंटिन्युम सोलर पार्क’ (१४० मेगावॅट) यांसह सात राज्यांतील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या अनुभवाच्या जोरावर ‘मोग्लिक्स सोलर’चे उद्दिष्ट देशभरात आपले जाळे विस्तारून औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना सेवा देण्याचे आहे.

 

मोग्लिक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गर्ग म्हणाले, “प्रत्येक अर्थव्यवस्था आपली ऊर्जा कोठून येते याचा नव्याने विचार करत आहे आणि भारताने स्वतःची ऊर्जा निर्मिती वाढवण्याचा मार्ग निवडला आहे. या निर्णयात सौरऊर्जा केंद्रस्थानी आहे. सौरऊर्जेमुळे घरगुती वीजबिले कमी होतात, उद्योगांचा खर्च स्थिर राहतो आणि देशाचे आयात इंधनावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होते. प्रत्येक योग्य छतापर्यंत सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी उत्पादक, कर्जदार संस्था, प्रकल्प उभारणारे आणि धोरणकर्ते यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. ‘मोग्लिक्स सोलर’ हे त्याच दिशेने टाकलेले आमचे एक पाऊल आहे.”

 

मोग्लिक्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित कुमार म्हणाले, “अनेक व्यवसायांना सौरऊर्जेचे महत्त्व आधीच पटले आहे. मात्र, निर्णय घेतल्यानंतरच्या पुढील प्रक्रियेत—जसे की प्रणालीची रचना आणि वित्तपुरवठ्यापासून ते आवश्यक परवानग्या, नेट मीटरिंग आणि दीर्घकालीन देखभालीपर्यंतच्या गोष्टींमध्ये—ते अनेकदा अडकून पडतात. या सर्व टप्प्यांची जबाबदारी घेण्यासाठीच ‘मोग्लिक्स सोलर’ची निर्मिती करण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहक केवळ विचारापुरते मर्यादित न राहता अधिक आत्मविश्वासाने प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीकडे वळू शकतील. देशभरातील कारखाने, कार्यालये आणि घरांसाठी रूफटॉप सोलरची प्रक्रिया अधिक सोपी करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments