१३,००० चौरस फुटांहून अधिक जागेवर पसरलेले एकात्मिक, बाह्यरुग्ण-केंद्रित मेडिकल सेंटर एकाच छताखाली अनेक वैद्यकीय शाखा एकत्र आणते.
पुणे, २७ नोव्हेंबर २०२६: बजाज इंटिग्रेटेड हेल्थ सिस्टीमने (बीआयएचएस) आज पुण्यातील हडपसर येथील अमनोरा टाउन पार्क येथे आपल्या पहिल्या निवारा मेडिकल सेंटरचे उद्घाटन केले, ज्याद्वारे शहरातील त्यांच्या आरोग्यसेवा कामकाजाची सुरुवात झाली आहे. बीआयएचएसने पुढील तीन ते पाच वर्षांत पुण्यात मेडिकल सेंटर्स, डे सर्जरी सेंटर्स, होमकेअर आणि एक हॉस्पिटल यांचा समावेश असलेले परस्पर कनेक्टेड आरोग्यसेवा नेटवर्क उभारण्यासाठी २,०००-२,५०० कोटी रूपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
निवारा संस्था मेडिकल सेंटर-केंद्रित दृष्टिकोनाचा अवलंब करते, जी रुग्णाच्या आरोग्य प्रवासातील प्रतिबंध, सल्लामसलत आणि निदानापासून सुरू होणारा प्रारंभिक टप्पा बनण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लामसलत, निदान चाचण्या, फार्मसी, फिजिओथेरपी आणि होमकेअर यांना एकाच कनेक्टेड परिसंस्थेत एकत्र आणून निवाराचे रुग्णाच्या संपूर्ण उपचार प्रवासात अधिक उत्तम समन्वय आणि सातत्य साधणारी एकसंध आरोग्यसेवा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या मेडिकल सेंटरमध्ये गायनेकोलॉजी, पेडियाट्रिक्स, एंडोक्राइनोलॉजी, कार्डिओलॉजी, पल्मोनोलॉजी, ऑप्थॅल्मोलॉजी यांसह १५ हून अधिक वैद्यकीय शाखांमध्ये बाह्यरुग्ण सल्लामसलत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यासाठी २० हून अधिक डॉक्टर व स्पेशालिस्ट्स आणि १५ हून अधिक सल्लामसलत कक्षांची सुविधा आहे. येथे फार्मसी, फिजिओथेरपी आणि होमकेअरसोबत लॅबोरेटरी, रेडिओलॉजी आणि इमेजिंग सेवांसह सर्व निदान चाचण्या उपलब्ध असतील. मेडिकल सेंटरचे या सर्व सेवा एकत्र आणून रुग्णांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ, समन्वित आणि अखंड बनवण्याचे ध्येय आहे.
बीआयएचएसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ नीरव बजाज म्हणाले, “पुणे शहराचे बजाज ग्रुपशी पिढ्यानपिढ्या घनिष्ठ नाते राहिले आहे, त्यामुळे आमच्या आरोग्यसेवा प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हे स्वाभाविक ठिकाण आहे. निवाराच्या माध्यमातून, दैनंदिन आरोग्यसेवेत गुणवत्ता, सातत्य आणि अधिक उत्तरदायित्व आणणारी विश्वासार्ह आरोग्य संस्था उभारून आम्हाला या शहराच्या विकासात अभिनव योगदान द्यायचे आहे. हे मेडिकल सेंटर पुण्यात आणि कालांतराने संपूर्ण भारतात मोठे आरोग्यसेवा नेटवर्क उभारण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.”
बीआयएचएसच्या चीफ एंटरप्राइझ अँड गव्हर्नन्स ऑफिसर देविना कर्था म्हणाल्या, “आम्ही निवारा उभारत असताना आमचा गुणवत्ता आणि रुग्णांच्या अनुभवाच्या सातत्यपूर्ण मानकांवर आधारित विस्तारक्षम उपचार मॉडेल तयार करण्यावर भर आहे. सुरुवातीपासून या प्रणालीमध्ये प्रमाणित क्लिनिकल प्रोटोकॉल, प्रबळ प्रशासन आणि परस्पर कनेक्टेड रुग्ण माहिती यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे नेटवर्कचा विस्तार होत असताना रुग्णांना तीच गुणवत्ता आणि उपचारांतील सातत्य अनुभवता येईल.”
पुणे निवाराच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्याचे मुख्य केंद्र असेल. या नेटवर्कमध्ये अनेक मेडिकल सेंटर्स, डे सर्जरी सेंटर्स आणि एका हॉस्पिटलचा समावेश असेल, ज्यामुळे बाह्यरुग्ण सेवा, प्रगत निदान आणि हॉस्पिटल-आधारित उपचारांचा समावेश असलेली कनेक्टेड आरोग्यसेवा परिसंस्था निर्माण होईल. २०२६-२७ दरम्यान ही मेडिकल सेंटर्स स्थापन करण्याची योजना आहे, तसेच आगामी वर्षांत डे सर्जरी सेंटर्स आणि हॉस्पिटल सुरू होण्याची अपेक्षा आहे.
एकसंध डिजिटल प्रणाली संपूर्ण नेटवर्कमधील रुग्णांची माहिती, क्लिनिकल कार्यपद्धती आणि उपचार केंद्रांना एकमेकांशी जोडेल, ज्यामुळे रुग्ण उपचारांच्या विविध टप्प्यांवरून जाताना अधिक सातत्य राखण्यास मदत होईल. नियोजित सुविधांमध्ये डिजिटल पेशंट अॅक्सेस आणि वननिवारा पेशंट आयडीद्वारे कार्यान्वित होणाऱ्या एकात्मिक रुग्ण नोंदींचा समावेश आहे.
बीआयएचएस पुण्यामध्ये निवाराची उपस्थिती साधण्यासोबत अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करेल, आणि कालांतराने हे एकात्मिक आरोग्यसेवा मॉडेल भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये विस्तारण्याचा मनसुबा आहे. हे उद्दीष्ट संपूर्ण नेटवर्कमधील गुणवत्ता, प्रशासन आणि रुग्ण अनुभवाची सातत्यपूर्ण मानके सुनिश्चित करताना विश्वासार्ह राष्ट्रीय आरोग्य संस्था उभारण्याच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे.


