पुणे दि.-२६ –
अमूल्य ज्योती, केशव वेणू प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पंडित पन्नालाल घोष जयंतीचे औचित्य साधून
पं.केशव गिंडे रचित शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी “ऋतुरंग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन ऋतूं मधील बारा महिन्यात विविध रागां मधून “ऋतुरंग” हा कार्यक्रम साकार करताना प्रत्येक महिन्यातून येणारे विविध राग बसंत,बसंतबहार, सारंग, शुद्धसारंग मेघ,मेघमल्हार ,मालकंस ,हेमंत जोग, जोगकंस,भैरव व श्री या रागांचा समावेश करून आपल्या शिष्यां समवेत हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. प्रसिद्ध संतूर वादक पं.दिलीप काळे व जेष्ठ बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी हे साथ करणार आहेत.
दुसरे सत्र प्रसिद्ध सतार वादक पं.नयन घोष यांच्या सतार वादनाने होणार असून त्यांना ईशान घोष तबला साथ करणार आहेत. पं.नयन घोष यांचे देश विदेशात अनेक कार्यक्रम केले असून त्यांनी जेष्ठ सतार वादक पं. रविशंकर, उस्ताद विलायत खान, सरोज वादक अमजदअली खान, पं.निखिल बॅनर्जी यांना साथ केली आहे. हा कार्यक्रम शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह कर्नाटक हायस्कूल, एरंडवणा येथे होणार असून तो सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.


