Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedतआरुफ सिग्नेचर शायरी मेहफिल २०२४ कार्यक्रमात ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तआरुफ सिग्नेचर शायरी मेहफिल २०२४ कार्यक्रमात ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, ३० एप्रिल २०२४ : तआरुफ कल्चरल फाउंडेशन तर्फे नुकतेच कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल येथे तआरुफ सिग्नेचर शायरी मेहफिल २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. भाषेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी समर्पित ना-नफा संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम हिंदुस्थानी शायरीची समृद्ध परंपरा आणि पुण्यातील युवा कवींच्या चैतन्यशील प्रतिभेचा उत्सव होता. यामध्ये 16 प्रतिभावान कवींनी लिहिलेल्या कविता समाविष्ट असलेले ‘लफ़्ज़ों का सफ़र’ या पुस्तकाचे कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध कवी जुबैर अली तबिश यांच्या सादरीकरणाने ने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

 

या कार्यक्रमात अभिषेक सालपे, आदित्य बारस्कर, शाहनवाज काझी, अनुज कपूर, सुरेंद्र भाटिया, इम्तियाझ खान, प्रेयस हाथी, तौफिक आझम मगरबी, जव्वाद सय्यद आणि प्रशांत कात्यायन या कलाकारांनी हिंदुस्थानी शेरो शायरी सादर केल्या. प्रत्येक कवीने प्रेम, उत्कंठा आणि जीवनाच्या प्रवासातील मानवी अनुभवाचे चित्र रेखाटले.

 

स्वतः कवी असलेले लेफ्टनंट जनरल (डॉ.) मुकेश सभरवाल, पीव्हीएसएम, एव्हीएसएम आणि बीएआर, व्हीएसएम हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेकंड सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, ट्रीट ऑन टाइम, लायसनआयटी, फॅन्सी पँट्स मीडिया सोल्युशन्स आणि महाराष्ट्र फार्मास्युटिकल्स हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments