Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ.मोहिनी शिंदे यांना संशोधन कार्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान

डॉ.मोहिनी शिंदे यांना संशोधन कार्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान

पुणे, 30 एप्रिल २०२४ : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी विभागाच्या क्वालिटी एमडी डिसर्टेशन इन होमिओपॅथी या मोहिमेमध्ये भारती विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,पुणे येथील डॉ. मोहिनी शिंदे यांना संशोधन कार्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण भारतभरातील विविध महाविद्यालयातून डॉ.मोहिनी शिंदे यांना मिळालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे. होमिओपॅथीमध्ये एमडी शोधनिबंधसाठी डॉ. मोहिनी शिंदे यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून भारत सरकार तर्फे होमिओपॅथी विषयातील उत्तम एमडी अभ्यासासाठी त्यांना रु. ३५,००० ची शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

 

अँटीव्हायरल ऍक्शन ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन रस टॉक्सिकोडेंड्रोन अगेन्स्ट हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस टाईप – 2- इन विट्रो स्टडी या विषयावर त्यांनी संशोधन केले असून प्रा.डॉ.शीतल अजित पाटील, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या (नारी) मॉलेक्युलर बायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विजय नेमा आणि वायरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले आहे. हे संशोधन आयसीएमआर, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (एनएआरआय) येथे करण्यात आले आहे.

 

विश्व होमिओपॅथी दिवस २०२४ निमित्त दिल्ली येथील यशोभूमि येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्काराचा वितरण समारंभाला मुख्य अतिथी आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव बी.के. सिंग, सेंटर कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (सीसीआरएच) चे महासंचालक डॉ.सुभाष कौशिक,आयुषच्या सल्लागार डॉ.संगीता दुग्गल, नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (एनसीएच) चे अध्यक्ष डॉ.अनिल खुराना आणि एनआयचे निदेशक डॉ. सुभाष सिंह यावेळी उपस्थित हो

ते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments