गेल्या आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसाने शहरातील अनेक भागात दैना उडविली. अनेक ठिकाणी पाणी साचले व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे नाले सफाई, पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन (गटार) सफाई चे वास्तव तर उघडे पडलेच पण त्याच बरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण व्यवस्थित समतोल न झाल्याने व काही अंशी सिमेंट काँक्रिट च्या रस्त्यांमुळे तळं साचलेले दिसले.येथे पाण्याचा निचरा होण्यास 2/3 दिवस लागले. तरी शहरातील अशी ठिकाणं शोधून तेथे त्वरित उपाययोजना केल्यास येणारा पावसाळा पुणेकरांना सुखावह जाईल.
तसेच गत वर्षी अश्याच पडलेल्या मुसळधार पावसाने ( अवघ्या काही तासात ) शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. कर्वेनगर / एरंडवणे भागात तर अनेक इमारतीत पाणी शिरले व स्वतः आयुक्त विक्रमकुमार यांना सर्व अधिकाऱ्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत येथे थांबून रहावे लागले व स्वतः पाणी निचऱ्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्या लागल्या.त्यावेळी ही त्रुटी लक्षात आली की पाणी निचरा करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेशी साधने नव्हती / पंप नादुरुस्त होते व येवढे पाणी उपसण्याची त्यांची क्षमता नव्हती. तरी खालील मागण्या करत आहे, त्याची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलला अशी खात्री वाटते….
✅ आपत्ती व्यवस्थापने साठी लागणारी सर्व साधन सामग्री सर्व क्षेत्रीय कार्यालयात त्वरित उपलब्ध करावी.
✅ तसेच एका संस्थेने (बहुधा प्रायमूव्ह) शहरातील सर्व पावसाळी व ड्रेनेज लाईन्स चे मॅपिंग केले आहे. त्याचा अभ्यास करावा म्हणजे ऐन वेळी कुठे पाणी अडकले आहे हे शोधत बसण्याची नामुष्की टाळता येईल.
✅ शासनाने काही ठिकाणी नाल्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे, नाल्यांची सफाई, खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधी मंजूर केला असून सदर निधी प्राप्त झालाय का व त्याचा विनियोग कसा करत आहात याचा तपशील जाहीर करावा.
✅ तसेच नालेसफाई वेगात पूर्ण करावी व त्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेमार्फत मागवावा म्हणजे वर्षानुवर्षे नालेसफाई, ड्रेनेज व पावसाळी लाईन सफाई चा कोट्यावधीचा निधी पाण्यात तर वाहून गेला नाही ना ह्या पुणेकरांच्या शंकेचे निरसन होईल.असे या निवैदनात नमूद केले आहे.मा


