Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedअक्षय्य हिंदू पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९ मे) अक्षय्य हिंदू...

अक्षय्य हिंदू पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९ मे) अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे आयोजन : काशी -अयोध्या -मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन यांची उपस्थिती

पुणे : हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे ‘अक्षय्य हिंदू पुरस्काराने’ गौरविले जाते. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे होणार आहे. यावेळी काशी – अयोध्या- मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे तुषार दामगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

पत्रकार परिषदेला शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, रिषभ परदेशी, निलेश भिसे, चंद्रभूषण जोशी, सारिका वाघ, महेश पवळे, रुपेश कुलकर्णी, शिवानी गोखले आदी उपस्थित होते.

 

यंदाचा मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून, गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्याकरिता आणि आचार्य के. आर. मनोज यांना धर्म जागरण करिता देण्यात येणार आहे. तसेच कै. शरद मोहोळ यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार आणि अनंत करमुसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कोदंडदारी श्रीरामाची अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त करणारी वीरश्रीयुक्त मूर्ती, दहा हजार रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

कार्यक्रमात पुरस्कारार्थींची मुलाखत व विष्णू जैन यांचे व्याख्यान देखील होणार आहे. हिंदुत्वाचे विविध आयाम आहेत. गोरक्षा सामाजिक समरसता, धर्म जागृती, वनवासी कल्याण, लोकशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये देशभर अनेक कार्यकर्ते निरलसपणे काम करतात. अशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन समितीतर्फे सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे.

 

गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना ‘सांगाती ट्रस्ट’ तर्फे डॉ. सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका त्याच दिवशी प्रदान करतील. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments