Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक पर्यावरण दिनानिमित्त पीआयसी तर्फे ‘सस्टेनेबल ॲन्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया’...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पीआयसी तर्फे ‘सस्टेनेबल ॲन्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे,30 मे 2024 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे प्रसिध्द शास्त्रज्ञ, पीआयसीचे विश्वस्त व पीआयसीच्या एनर्जी एनव्हायरमेंट ॲन्ड क्लायमेट चेंज (ईईसीसी) संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. अमिताव मल्लिक यांनी संपादित केलेल्या ‘सस्टेनेबल ॲन्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया’ या पीआयसीच्या पहिल्या स्वयंप्रकाशित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकाशन समारंभ बुधवार 5 जून 2024 रोजी सुमंत मुळगावकर हॉल, ए विंग,आयसीसी ट्रेड टॉवर, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे.

पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. याप्रसंगी प्रकाशन समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स ॲन्ड इकोनॉमिक्सचे कुलगुरू डॉ.अजित रानडे उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच डॉ. अमिताव मल्लिक आणि पुस्तकाचे इतर लेखक उपस्थित राहणार आहेत.

जगावर हवामान बदलाचे संकट आले असताना भारताच्या विकासाच्या प्रवासात हा महत्त्वाचा काळ आहे. उष्णतेच्या लाटा व विनाशकारी पूर यासारख्या हवामान बदलाच्या वाढत्या घटनांमुळे देशात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असून तसेच मोठ्या प्रमाणात उपजीविकांचे देखील नुकसान होत आहे.

पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ.विजय केळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले आहे की, वेगाने विकसित होणाऱ्या भारताला हवामान बदलाशी निगडीत संकटांचे देखील मोठे आव्हान आहे.

मानवाने नजिकच्या भविष्यात क्लायमेट चॅलेंज्ड वर्ल्ड (ज्याला परिणामांचे युग म्हटले जाते) मध्ये प्रवेश केला आहे, असेच दिसत आहे, असे प्रा.मल्लिक यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

या पुस्तकात हवामान बदलाचे धोके आणि त्यावरील उपाययोजना याबाबत शाश्वततेच्या क्षेत्रातील 9 लेखकांचे सखोल दृष्टीकोन वाचायला मिळणार आहेत.

आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये कोणताही संघर्ष नाही हे आज दिसून येते. म्हणूनच भविष्यातील विकास हा हरित तंत्रज्ञान आणि स्वच्छ पध्दतींवर आधारित असेल.

अशा आव्हानात्मक काळात भारत आणि जगभरातील तरूणांना समर्पित हे पुस्तक शाश्वतता आणि मानवी विकासाचे भविष्य अधिक निसर्ग-केंद्रित राखण्याचा संदेश देते. नेट झीरो हा संपूर्ण प्रवासातील फक्त एक टप्पा असून पृथ्वीचे कार्बन संतुलन आणि पर्यावरणीय संवर्धन राखणे हे अंतिम ध्येय असायला हवे…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments