*इकार्टच्या रिफिनिश सर्व्हिसने प्रस्थापित केले नवे आयाम, परत आलेल्या वस्तूही मिळतील नवीन स्वरुपात*
_कपडे, चपला, हँडबॅग्स, अॅक्सेसरीज, घर सजवण्याच्या वस्तू यासाठी ही सेवा असणार आहे._
_ज्या वस्तू ग्राहकांनी परत केल्या आहे. त्यात ९० टक्क्यापेक्षा जास्त वस्तू पुन्हा दुरुस्त केल्या जाणार असून त्यात बचत केली जाणार आहे._
*बंगळुरू, २९ मे २०२४- इकार्ट ही भारतातील आघाडीची सप्लाय चेन कंपनी आहे. या कंपनीने रिफिनिश सर्व्हिस नावाची एक सेवा आणली आहे. फॅशन आणि लाईफस्टाईल क्षेत्रात अनेकदा वस्तू परत येतात. हे या क्षेत्रासमोरील मोठं आव्हान आहे. या उपक्रमामुळे परत केलेल्या वस्तूंचे योग्य व्यवस्थापन केलं जाणार आहे. त्यामुळे या ब्रँड्सना विकतायेण्याजोग्या वस्तू तयार करण्यासाठी मोठी मदत मिळेल.
सध्याच्या काळात ग्राहक अनेक वस्तू परत करतात. त्यामुळे फॅशन ब्रँड समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कपडे, आणि चपला या घरी घालून पाहिल्या जातात किंवा काही प्रमाणात त्या खराब होतात. इकार्टची रिफिनिश सर्व्हिसमुळे ही अडचण दूर होणार आहे. परत आलेल्या गोष्टींपैकी ९० टक्के वस्तू पुन्हा पहिल्यासारख्या करून, इकार्ट कंपन्याचा तोटा कमी करेल आणि उत्पन्न वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. थेट ग्राहक, इकॉमर्स, आणि फॅशन आणि लाईफस्टाईल क्षेत्रातील रिटेल व्यापारी यांना डोळ्यासमोर ठेवून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँडबरोबरच ही सेवा फुटवेअर, हँडबँग्स, अॅक्सेसरीज, तसेच पडदे, चादरी, ब्लँकेट यासारख्या घर सजवण्याच्या वस्तूंचीही दुरुस्ती केली जाईल.
इकार्टकडे दररोज ५५००० युनिट्सवर प्रकिया करण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक मशीन्स आणि ऊर्जा बचत करणारे तंत्रज्ञान आहे. रिफिनिशिंग प्रक्रियेत अत्यंत बारकाईने दर्जाची तपासणी केली जाते, डाग घालवले जातात, बॉक्स बदलले जातात, इस्त्री आणि लागलंच तर शिवणकामही केले जाते. तसंच दुरुस्त केलेल्या उत्पादनांचं क्वालिटी कंट्रोल केलं जातं. पर्सन्लाईज्ड रिफिनिशिंग सोल्युशन्स हे इकार्टचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक ब्रँडची काम करण्याची पद्धत लक्षात ठेवून ते केलं जातं. प्रत्येक उत्पादनात योग्य त्या सर्व सुधारणा होतील याची काळजी घेतली जाते.
इकार्टचे मुख्य व्यापार अधिकारी मणी भूषण म्हणाले, “परत आलेल्या वस्तूंचं व्यवस्थापन करणे हे फॅशन ब्रँडसमोर लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने आणि आर्थिक पातळीवरही एक मोठं आव्हान आहे. रिफिनिश सेवेमुळे हे आव्हान पेलणे आता सोपे होईल. उत्तम तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींमळे ब्रँड्सच्या सप्लाय चेनला मदत होईल. दीर्घकालीन सकारात्मक बदलासाठी हे एक मोठे पाऊल आहे. या क्षेत्रातले हे एक मोठे पाऊल आहे. परत येणाऱ्या वस्तूंच्या व्यवस्थापनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे यामुळे संशोधन, कार्यक्षमता, शाश्वतता याबद्दल आमची कटिबद्धता आणखी अधोरेखित होण्यास मदत होईल.”
रिफिनिश सर्व्हिसेसची ठळक वैशिष्ट्ये:
कार्यक्षम पुरवठा- इकार्टचे रिफिनिश सेंटर देशात सर्वाधिक मागणी असलेल्या शहरात आहेत त्यामुळे वस्तू लगेच परत घेता येतात आणि त्यामुळे वस्तूंच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च कमी होते. गुडगाव, मुंबई, बंगलोर, कोलकाता या शहरात ही सेंटर्स आहेत.
सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर- रिफिनिश सर्व्हिस उपक्रमात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यात उत्तमोत्तम यंत्रं वापरली जातात. त्यात अप-स्टीम टेबल्स, स्टीम व्हॅक्युम टेबल्सचा समावेश आहे. त्यामुळे परत केलेल्या वस्तूंवर फोम फिनिशरने योग्य प्रकिया केली जाते आणि त्यांचा दर्जा कायम राहतो.
आर्थिक बचत- परत आलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नवीन रुप अगदी कमीत कमी वेळात देऊन विकण्यायोग्य केल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आणि वस्तू परत आल्यामुळे नुकसान कमी करण्यासाठी इकार्टची ब्रँड्सना मदत होते.
पर्यावरणाविषयी जबाबदारी- रिफिनिशिंगसाठी वापरल्या जाणारी यंत्रे पर्यावरणपूरक आहेत त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर उर्जेची बचत होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इकार्ट कार्यक्षमता तर वाढवतेच, पण पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही कमी करते. जबाबादारीने व्यापार करण्याच्या योग्य पद्धतींशी हे सुसंगत आहे
रिफिनिश मुळे इकार्टने ल़ॉजिस्टिक्स क्षेत्रात सातत्याने नवनवीन गोष्टी आणल्या आहेत. वस्तू परत करण्याचं व्यवस्थापन आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यासाठी इकार्टचा हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल.


