Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीएमध्ये इंटिरीयर डिझाईनवरील (बी. डिझाईन) पदवी अभ्यासक्रम सुरू

बीएनसीएमध्ये इंटिरीयर डिझाईनवरील (बी. डिझाईन) पदवी अभ्यासक्रम सुरू

पुणे, दि. १८: महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) येत्या १ ऑगस्ट पासून इंटिरीयर डिझाईन (अंतर्गत रचना) या विषयातील चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाचा (बी. डिझाईन) समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुरू होत आहे. कला, शास्त्र किंवा वाणिज्य शाखेतील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) या अभ्यासक्रमात इंटिरीयर डिझाईन हा विषय येत असून सर्व प्रकारच्या बांधकामांबरोबरच त्यातील अंतर्गत सजावटीलाही आता खूप महत्त्व प्राप्त झाल्याचे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले. तापमान बदलाच्या आजच्या कालखंडात बांधकाम तसेच अंतर्गत सजावटीसाठी शाश्वत साधनांचा वापर आवश्यक असून या अभ्यासक्रमातून पर्यावरणपूरकतेची शिकवणही दिली जाईल, असे डॉ. शुभदा कमलापूरकर यांनी सांगितले. या अभ्यासक्रमासाठी बीएनसीएमध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित डिझाईन फॅबलॅब, इमर्सिव्ह लॅबसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असे इंटिरीयर डिझाईन अभ्यासक्रमाचे विभागप्रमूख प्रा. किरण निचळे यांनी स्पष्ट केले. जुलै २०२४ अखेरपर्यंत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया चालू असून अधिक माहितीसाठी प्रा. निचळे यांना ९८५०५४६६६२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments