Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ लाँच; आकर्षक ऑफर्ससाठी आजच प्री-बुकिंग...

सॅमसंगकडून भारतात झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ लाँच; आकर्षक ऑफर्ससाठी आजच प्री-बुकिंग करा

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना गॅलॅक्‍सी झेड अशुअरन्‍सचा भाग म्‍हणून १४९९९ रूपयांचे दोन स्क्रिन व पार्टस् रिप्‍लेसमेंट फक्‍त ९९९ रूपयांमध्‍ये मिळेल

 

· गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ प्री-ऑर्डर केलेले ग्राहक अतिरिक्‍त बँक कॅशबॅक किंवा ८००० रूपयांच्या अपग्रेड बोनससह ९ महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआयचा आनंद घेऊ शकतात

 

· विद्यमान सॅमसंग फ्लॅगशिप ग्राहक १५००० रूपयांच्‍या अपग्रेड बोनसचा आनंद घेऊ शकतात

 

गुरूग्राम, भारत – जुलै ११, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने भारतात त्‍यांचे सिक्‍स्‍थ जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स – गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ साठी प्री-ऑर्डर्स ना सुरूवात केली आहे, जेथे गॅलॅक्‍सी एआयच्‍या नवीन चॅप्‍टरची सुरूवात झाली आहे. नवीन गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ गॅलॅक्‍सी एआयला नव्‍या उंचीवर घेऊन जातात, ज्‍यामुळे ग्राहकांना अद्वितीय मोबाइल अनुभव मिळेल.

 

”सॅमसंगमध्‍ये आम्‍हाला आमचे सिक्‍स्‍थ जनरेशन फोल्‍डेबल्‍स – गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ सह गॅलॅक्‍सी एआयच्‍या नवीन चॅप्‍टरची सुरूवात करण्‍याचा आनंद होत आहे. नवीन स्‍मार्टफोन्‍स कम्‍युनिकेशन्‍स, उत्‍पादकता आणि सर्जनशीलतेमध्‍ये अद्वितीय मोबाइल अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. एआय-समर्थित कनेक्‍टेड गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टमसोबत सहयोगाने आमची नवीन उत्‍पादने तुम्‍हाला सक्षम करतील आणि तुमच्‍या जीवनाला उत्‍साहित करतील. मला सांगताना आनंद होत आहे की, गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ नोएडा येथील आमच्‍या फॅक्‍टरीमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आले आहेत,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्‍हणाले.

 

उपलब्‍धता, किंमत आणि ऑफर्स

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ साठी प्री-ऑर्डर १० जुलैपासून सर्व आघाडीचे ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्ये सुरूवात झाली आहे. ग्राहक आजपासून https://www.samsung.com/in/live-offers/ येथे देखील सॅमसंग लाइव्‍हवर प्री-ऑर्डर करू शकतात.

 

 

 

Specifications

 

Ram Storage

 

Colors

 

MOP (INR)

 

Galaxy Z Flip6

 

12GB 256GB

 

Blue, Mint, Silver Shadow

 

109,999

 

12GB 512GB

 

121,999

 

Galaxy Z Fold6

 

12GB 256GB

 

Silver Shadow, Navy, Pink

 

164,999

 

12GB 512GB

 

176,999

 

12GB 1TB

 

Silver Shadow

 

200,999

 

 

 

Samsung.com च्‍या माध्‍यमातून गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ब्‍लॅक व व्‍हाइट या दोन आकर्षक रंगांमधून निवडण्‍याचा पर्याय मिळेल. Samsung.com च्‍या माध्‍यमातून गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ब्‍लॅक, व्‍हाइट आणि पीच या तीन आकर्षक रंगांमधून निवडण्‍याचा पर्याय मिळेल.

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ साठी प्रीबुक ऑफर्स

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी बँक कार्ड्सवर ८००० रूपयांची कॅशबॅक, तसेच ९ महिन्‍यांचा नो-कॉस्‍ट बँक ईएमआय किंवा ८००० रूपयांच्‍या अपग्रेड बोनससह जवळपास ९ महिन्‍यांचा नो कॉस्‍ट ईएमआय मिळेल. विद्यमान सॅमसंग फ्लॅगशिप स्‍मार्टफोन ग्राहक १५००० रूपयांच्‍या अपग्रेड बोनसचा आनंद घेऊ शकतात.

 

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि झेड फ्लिप६ प्री-ऑर्डर करणाऱ्या सर्व ग्राहकांना गॅलॅक्‍सी झेड अशुअरन्‍स मिळेल, जेथे त्‍यांना इंडस्‍ट्री-फर्स्‍ट दोन स्क्रिन/पार्ट्स रिप्‍लेसमेंट्स फक्‍त ९९९ रूपयांमध्‍ये मिळेल.

 

तसेच, गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ ग्राहक सॅमसंग कव्‍हर्सवर ५० टक्‍के सूट आणि नवीन लाँच करण्‍यात आलेले गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, वॉच ७ आणि गॅलॅक्‍सी बड्स३ सिरीजवर जवळपास ३५ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments