गुरूग्राम, सप्टेंबर ५, २०२४: सॅमसंग इंडियाने आज त्यांचा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ २०२४ च्या टॉप १० टीम्सची घोषणा केली. टॉप १० टीम्स आता ग्रॅण्ड फिनालेकडे वाटचाल करतील, जेथे ते सॅमसंग लीडरशीप आणि इतर प्रमुख उद्योग प्रमुखांचा समावेश असलेल्या दिग्गज ज्यूरीसमोर त्यांच्या अद्वितीय संकल्पनांना सादर करतील. शॉर्टलिट करण्यात आलेल्या टीम्स देशातील काही दुर्गम प्रांतांमधील आहेत, जसे आसाममधील गोलाघाट व कामरूप रूरल, राजस्थानमधील झलावर, कर्नाटकमधील उडुपी आणि छत्तीसगडमधील बिलासपूर. यामधून या उपक्रमाचा सखोल प्रादेशिक विस्तार दिसून येतो.
हे फायनालिस्ट्स प्रखर निवड प्रक्रियेमधून गेले, ज्यामध्ये सॅमसंग ज्यूरी सदस्यांसमोर पिच प्रेझेन्टेशन्सच्या विविध फेऱ्या आणि सॅमसंग व फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एफआयटीटी), आयआयटी दिल्लीमधील तज्ञांची मार्गदर्शन सत्रे यांचा समावेश होता. रिवॉर्ड म्हणून या प्रत्येक २० टीम्सना प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपयांचे अनुदान मिळाले. याव्यतिरिक्त, युथ ट्रॅकमधील शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या टीम्सना नवीन सॅमसंग गॅलॅक्सी लॅपटॉप्स मिळाले, तर स्कूल ट्रॅमधील टीम्सना गॅलॅक्सी टॅब्स मिळाले.
या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वामध्ये विद्यार्थ्यांनी दोन व्यापक थीम्स ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ आणि ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी’ अंतर्गत त्यांच्या संकल्पना सबमिट केल्या. या व्यापक थीम्सअंतर्गत, बहुतांश संकल्पना प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यावर केंद्रित होत्या, जसे वंचित समुदायांसाठी शिक्षण व संसाधन उपलब्धता, प्रायोगिक अध्ययनामधील आव्हाने, डिजिटल साक्षरता, जल संवर्धन आणि आर्सेनिक प्रदूषण.
टीम्सनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तज्ञ सत्रे व एक्स्पोजर देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन वॉक’मध्ये देखील सहभाग घेतला. बेंगळुरू व नोएडामधील सॅमसंग आरअँडडी सेंटर्स, गुरूग्राममधील प्रादेशिक मुख्यालयांसह विविध सॅमसंग कार्यालयांमध्ये ‘इनोव्हेशन वॉक’चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सत्रांमध्ये सहभाग घेतला, जे उत्पादन विकास प्रक्रियेबाबत सखोल माहिती देण्यामध्ये साह्यभूत ठरले, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पनांमध्ये सुधारणा करण्यास मदत देखील झाली. यानंतर नॅशनल पिच इव्हेण्टचे आयोजन करण्यात आले, जेथे अंतिम १० टीम्सना निवडण्यात आले.
“आम्हाला देशभरातील या १० शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या टीम्सचा प्रवास पाहताना आनंद होत आहे, जो अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रम सर्व सहभागींसाठी सर्जनशीलता व क्षमतेसंदर्भात मर्यादांना दूर करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे, ज्यामुळे ते फिनालेसोबत त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी देखील सुसज्ज आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा सहभागींना टेक्निकल कौशल्यांसह सक्षम करण्याचा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचा आणि त्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. आम्ही ग्रॅण्ड पिच इव्हेण्टकडे वाटचाल करत असताना हे सहभागी त्यांच्या उल्लेखनीय संकल्पनांना कशाप्रकारे प्रत्यक्षात आणून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणतात हे पाहण्यास उत्सुक आहोत,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष एसपी चुन म्हणाले.
“या तरूण विचारवंतांनी दाखवलेली नाविन्यता आणि सर्जनशीलता अत्यंत प्रेरणादायी आहे. सॅमसंगचा ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रम या विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पनांना परिभाषित, निपुण व सर्वोत्तम करण्यास आवश्यक असलेले योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यामध्ये मोठा योगदानकर्ता राहिला आहे. एफआयटीटीला या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मचा भाग असण्याचा अत्यंत अभिमान वाटतो, जेथे तरूण नवप्रवर्तकांना कौशल्ये व आत्मविश्वासासह सक्षम केले जाते, जे त्यांच्या भावी प्रवासांचा महत्त्वपूर्ण भाग राहतील,” असे आयआयटी दिल्ली येथील एफआयटीटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले.
‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ २०२४ उपक्रमाच्या या पर्वामध्ये देशातील काही सर्वात दुर्गम प्रांतांमधील सहभागी दिसण्यात आले आहेत, जसे मणिपूरमधील इंफाळ, मेघालयमधील ईस्ट खासी हिल्स आणि छत्तीसगडमधील बिलासपूर. सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा, विशेषत: वंचित समुदायांमधील व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान नाविन्यतेचा फायदा घेण्याच्या सॅमसंगच्या मिशनची पूर्तता करण्याचा मनसुबा असलेल्या संकल्पना विकसित करण्यास प्रेरित करण्यात आले.
स्कूल ट्रॅकच्या फायनालिस्ट ५ टीम्स आणि ते निराकरण करत असलेल्या समस्या
स्कायगार्ड वाइल्डफायर मॉनिटरिंग: प्रतिकूल परिणामांचे निराकरण करण्यासाठी रिअल-टाइम डेटा देत पर्यावरणीय देखरेख व सार्वजनिक आरोग्य सुधारणेवर लक्ष केंद्रित करणारे सोल्यूशन्स विकसित करण्याच्या माध्यमातून विशेषत: पेरी-अर्बन, ग्रामीण आणि वन्यभागातील समुदायांना असलेल्या वन्यजीवनाचा धोका व वायू प्रदूषणाचे प्रतिकूल प्रभाव कमी करत आहे.
ईको टेक इनोव्हेटर: टीम पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये अर्सेनिक प्रदूषणाच्या प्रतिकूल परिणामांना कमी करण्यासाठी सोल्यूशन विकसित करत आहे, या प्रदूषणामुळे आवश्यक मिनरल्स कमी होतात.
प्रेटोर व्हीआर: टीमचा महागडे सोल्यूशन्स परवडू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर व्हीआर-आधारित लर्निंग सोल्यूशन्स विकसित करण्याचा दृष्टिकोन आहे.
यू: स्वीकृती आणि समानतेला चालना देण्यासाठी कायदेशीर व माहितीपूर्ण उपक्रम राबवत एलजीबीटीक्यू समुदायाला पाठिंबा देते.
हमारालॅब्स: अॅप विकसित केले आहे, जे कोर्सबाबत माहिती देते, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते.
युथ ट्रॅकच्या फायनालिस्ट ५ टीम्स आणि ते निराकरण करत असलेल्या समस्या
मेटल: विशेषत: भूजलमधील अर्सेनिक प्रदूषणाच्या समस्येसाठी सोल्यूशन शोधत आहे.
टीम हेम्टा: कृषी अपव्यय कचरा जाळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सोल्यूशन्स विकसित केले.
बायोडी: कार्बन फूटप्रिंट, तसेच सागरी व लँडफिल प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सिंगल-युज प्लास्टिक्सवरील अधिक अवलंबन कमी करण्यास मदत करण्यासाठी सोल्यूशन्स देत आहे.
रामधन लोढा: शाश्वत आणि शेतकऱ्यांसाठी अनुकूल सोल्यूशन्स देत कृषीसंदर्भातील आव्हानांचे निराकरण करते.
एन्व्हटेक: बोअरवेलवरील अधिक अवलंबन कमी करण्यास मदत करण्यासाठी भूजल सोल्यूशन्स देते.
सॅमसंग इंडियाने सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वासाठी भारतातील फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एफआयआयटी), आयआयटी दिल्ली; मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (एमईआयटीवाय); मंथन, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायण्टिफिक अडवायजर, भारत सरकार आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांच्यासोबत सहयोग केला.
यंदा ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रमाने दोन विशिष्ट ट्रॅक्स – स्कूल ट्रॅक व युथ ट्रॅक सादर केले आहेत. हे प्रत्येक ट्रॅक विशिष्ट थीमला चालना देण्याप्रती समर्पित आहेत आणि विविध वयोगटातील व्यक्तींवर लक्ष्य करतात. दोन्ही ट्रॅक्स एकाच वेळी राबवण्यात येतील, ज्यामधून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान खेळाच्या मैदानाची खात्री मिळेल. या उपक्रमाने स्कूल ट्रॅकमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी भारतभरातील १०० हून अधिक शाळांमध्ये नवीन लर्निंग मॉड्यूल – डिझाइन-थिंकिंग वर्कशॉप्स देखील राबवले. या वर्कशॉप्सचा विद्यार्थ्यांना स्थितीनुसार आव्हाने देत त्यासाठी सोल्यूशन्स निर्माण करण्यास प्रेरित करण्याच्या माध्यमातून त्यांच्या समस्या-निवारण मानसिकतेला चालना देण्याचा मनसुबा होता.
विजेत्यांना काय मिळेल:
स्कूल ट्रॅक: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘कम्युनिटी चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारणेसाठी २५ लाख रूपयांचे सीड अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या स्कूल्सना शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, समस्या निवारण मानसिकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग प्रॉडक्ट्स देखील मिळतील.
युथ ट्रॅक: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘एन्व्हायरोन्मेंट चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि आयआयटी-दिल्ली येथे इन्क्यूबेशनसाठी ५० लाख रूपयांचे अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या कॉलेजना त्यांच्या शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, सामाजिक उद्योजकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग उत्पादने देखील मिळतील.
२०१० मध्ये प्रथम यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम सॉल्व्ह फॉर टूमारो सध्या जगभरातील ६३ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’ जगभरातील तरूणांना शिक्षण प्रदान करण्यासोबत भावी लीडर्सना सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर प्रयत्नांबाबतच्या अधिक गाथा
आमचे सीएसआर पेज http://csr.samsung.com यावर वाचा.


