Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorized11 सप्टेंबर, 2024 ला लाँच होणार MG विंडसर इंडियाची पहिली इंटिलिजंट क्रॉसओव्हर...

11 सप्टेंबर, 2024 ला लाँच होणार MG विंडसर इंडियाची पहिली इंटिलिजंट क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल

MG विंडसर CUV ला सेडानसारखा आरामदायीपणा असेल आणि SUV सारखी प्रशस्त जागा असेल

 

· ‘18” डायमंड कट अलॉय व्हील्ससह ‘एरोग्लाइड डिझाइन’ लँग्वेज आहे* आणि या क्षेत्रातील सर्वात मोठे व्हीलबेस आहे.

 

· ‘ग्रँडव्हिव 15.6 टच डिस्प्ले’: क्षेत्रामध्ये सर्वात मोठे

 

· मनोवेधक असा ‘इन्फिनिटी व्हिव ग्लास रूफ’

 

· 1350 रिक्लाइनसह या क्षेत्रातील प्रथम ‘एरो-लाउंज सीट्स’, ज्यामुळे प्रवास्यांना आलीशान आणि आरामदायी राहता येतं

 

· युनिक वॉटर वॅडिंग क्षमतांसह उच्च स्तराचा टिकाऊपणा, अत्यंत उष्णतेमध्ये उच्च कार्यक्षमता आणि सुरळीत राईडसाठी एलिव्हेटेड ग्राउंड क्लीयरन्स.

 

गुरूग्राम, 5 सप्टेंबर 2024: JSW MG मोटर इंडियाने आज MG विंडसर – भारतामधील प्रथम इंटिलिजंट CUV (क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल) 11 सप्टेंबर ला लाँच होणार असल्याची घोषणा केली. इंटिलिजंट CUV मध्ये जगातील सर्वोत्तम अशा दोन्ही म्हणजेच सेडानचा आरामदायीपणा आणि SUV चा विस्तार असणार आहे.

 

CUV च्या ‘एरोग्लाइड डिझाइन’ मध्ये अमर्यादपणे सर्वोत्तम कारागिरी असलेले अत्याधुनिक एरोडायनॅमिक्स आहे आणि 18” डायमंड कट अलॉय व्हील्स असून क्षेत्रातील सर्वात मोठे व्हीलबेस असेल. एकसमान ड्रायव्हिंग अनुभव येण्यासाठी या व्हेइकलमध्ये उच्च स्तराचा ग्राउंड क्लियरंस असेल. MG विंडसर EV ने उच्च सहनशक्ती, काही कठीण वातावरणात आणि अति उष्णतेमध्ये क्षमता चाचणी पास केली आहे. कच्छ, लेह आणि उदयपूरच्या आव्हानात्मक भूप्रदेशातून सुद्धा तीने अंतर पार केले आहे आणि ती आता पूर्णपणे सिद्ध झाली आहे.

 

MG विंडसर ही ऑटो-टेक ब्रँडच्या पोर्टफोलियोमधील 6 वी निर्मीती आहे आणि त्यामध्ये क्षेत्रातील प्रथम बरेच फिचर्स आहेत. महत्वाचे फिचर म्हणजे या क्षेत्रातील प्रथम 15. इंच ‘ग्रँडव्हिव टच डिस्प्ले’ हे आहे, ज्यामुळे मनोरंजन, नेव्हिगेशन, आणि व्हेइकल सेटिंग यांसाठी ती सेंट्रल हब म्हणून कार्य करते. विस्तारीत स्क्रीन साइजमुळे प्रवास्यांना विना-मेहनत नेव्हीगेट करता येते, मनोरंजनावर नियंत्रण ठेवता येते आणि सहजतेने व्हेइकल सेटिंग्ज बदलता येतात. MG विंडसरमधील 15.6 इंच टचस्क्रीनचे डिझाइन कारच्या आतील अनुभव पुन्हा नव्याने देण्यासाठी केलेली आहे ज्यामुळे ती उभी असतांना मनोरंजन, गेमिंग, आणि लर्निंग यांचे हब बनते.

 

केबिनचा अनुभव आणखीन चांगला करून, MG विंडसरमध्ये ‘इन्फिनिटी व्हिव ग्लास रूफ’ असेल, ज्यामुळे केबिनमधील सौंदर्य आणि प्रशस्तपणा सुधारतो आणि मनोवेधक देखावा निर्माण होतो. या महागड्या ग्लास रूफमुळे ग्राहकांना शहरात किंवा ग्रामीण कोठेही प्रवास करतांना बाहेरचा विना-अडथळा आनंद घेता येईल. या एक प्रकारच्या फिचरमुळे केवळ आलीशानच वाटत नाही तर जागेची जाणीव सुद्धा सुधारते, ज्यामुळे अत्याधुनिक केबिनमध्ये हवेशीर वाटते आणि प्रत्येक प्रवास आनंद देणारा बनतो.

 

MG विंडसरचे दुसरे परंतु या क्षेत्रातील प्रथम फिचर म्हणजे तीच्या ‘एरो-लाउंज’ सीट्स ज्या 1350 वाकतात, आलीशानपणा आणि आरामदायीपणा यांचा अतुलनीय अनुभव देण्यासाठी त्यांची रचना केलेली आहे. बारकाईने तयार केलेला रेक्लाइन अँगल हे सुनिश्चित करतो की, प्रवासी शहरात छोट्या ड्राइव्हवर किंवा लांब अंतराच्या प्रवासात स्टाईलमध्येच रिलॅक्स पण होऊ शकतात.

 

या फिचरसह, वास्तविकता आणि कार्यक्षमता यांचे संतुलन देऊन उच्च स्तराचा ड्रायव्हिंग अनुभव हवा असलेल्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा MG विंडसरचा उद्देश्य आहे.

 

एरोडायनॅमिक डिझाइन आणि प्रशस्त इंटेरियर असलेल्या CUV या भारतामधील विकसित झालेल्या रस्त्यांसाठी आदर्श आहेत. त्यांचे वैविध्यपूर्ण डिझाइन त्यांना शहरातील छोटे रस्ते आणि लांब-अंतरावरील रस्ते अशा दोन्हींसाठी योग्य बनवतात, ज्यामुळे कुटुंबांना आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास मिळतो.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments