Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या जगण्याचं साधन,शेत जमीन जप्त करता येणार नाही, याचं भान बँक व...

शेतकऱ्यांच्या जगण्याचं साधन,शेत जमीन जप्त करता येणार नाही, याचं भान बँक व सहकार विभागाला असावं

*.!*

*नाशिक डीसीसी बँकेने जप्त केलेले जमिनी शेतकऱ्यांना सन्मानाने परत करा अन्यथा सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ पण येत्या विधानसभा निवडणुकीत संबंधित सरकारचे बारा वाजवू .! असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.*

*१९आक्टोंबर २०२४*
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपसभापती आदरणीय नामदार नरहरी झिरवळ साहेब मी ऑगस्ट 2024 रोजी मंत्रालय येथे माननीय उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन, व गृह यांच्या बैठकीनंतर मंत्रालय येथे नाशिक डीसीसी बँकेच्या शेतकऱ्यांच्या कर्ज वसुली संदर्भामध्ये बेकायदेशीर शेती जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री गृह व अर्थमंत्री यांच्याशी शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोहन गावंडे पेठ दिंडोरी, भिकाजी चौधरी पाटील पेठ दिंडोरी, ह्यूमन राईटच्या महिला उपाध्यक्ष सौ ज्योती मोहिते, व आदिवासी महिला अध्यक्ष शेतकरी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.*
*तर नंतर माननीय सहकार मंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेचे सह अवसायानायात व प्रशासक असलेल्या नागरी सहकारी व जिल्हा बँकांची तसेच राष्ट्रीयकृत बँकांची बैठक तात्काळ तत्कालीन सहकार मंत्री यांनी बोलवली त्यावेळी विठ्ठल राजे पवार यांनी सांगितले की माननीय बँकांचे प्रशासक हे महाराष्ट्र राज्य बँकेच्या प्रमाणे नियुक्त करा त्यानंतर ही राज्य सरकारने अद्याप पर्यंत तसे केलेले नसलेने संघटना व पदाधिकारी हे अत्यंत नाराज झालेले आहेत, राज्य सहकारी विभागाने प्रशासकांच्या हाताखाली भ्रष्टाचार आणि अनिमित्त असलेल्या लोकांना प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात प्रशासकीय यंत्रणा असेल तर चोरीचा शोध लागेल का? असा सणसणाटी आरोप संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठलराव पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की राज्य सरकार आणि त्यामध्ये काम करणारे सर्वच अधिकारी व पदाधिकारी हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत त्यांच्यावर कुठे ना कुठे आरोप आहेत त्यांचं हे बिंग बाहेर येऊ नये म्हणून राज्य सरकारचे सहकार मंत्री हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व केंद्रीय सहकार मंत्र्यांना खोटा व चुकीचा अहवाल देतात त्यामुळे नाशिक जिल्हा बँकेचे वर्धा बीड सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यात ज्या काही चांगल्या जिल्हा बँका आहेत त्यापैकी त्या बँकांवर सरकार व आरबीआयचे व्यवस्थित नियंत्रण नसेल किंवा सरकारी यंत्रणा व्यवस्थित रिपोर्ट सादर करत नसेल तर चांगल्या बँका देखील अडचणीत यायला वेळ लागणार नाही त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी सहकारी साखर कारखाने जिल्हा बँका दूध संस्था व सहकार क्षेत्रातील प्रचंड भ्रष्टाचाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या बेकायदेशीर जप्त केलेल्या शेत जमिनी त्यावरील बँकेने लावलेले स्वतःचे नाव व शेतकऱ्यांचे काढलेले नाव हे कार्य पूर्ववत केले नाही तर संघटना निवडणुकीमध्ये मतदार शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करेल आणि त्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील असा इशारा देखील राजे पवार यांनी दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र आयडॉल मध्ये दिलेल्या मुलाखतीत देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार मतदार यांना जाहीर आवाहन केले ची माहिती देखील यावेळी संघटनेचे उपसचिव काशिनाथ जाधव पाटील यांनी दिली.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments