Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*खडकवासला मतदारसंघात निवडणूक खर्च निरीक्षकांनी भेट देवून घेतला आढावा*

*खडकवासला मतदारसंघात निवडणूक खर्च निरीक्षकांनी भेट देवून घेतला आढावा*

पुणे, दि. २४ : खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास या मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक अमित कुमार यांनी भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सिंहगड टेक्निकल कॉलेज, आंबेगाव बुद्रुक येथे स्थापित करण्यात आले आहे. या कार्यालयामध्ये निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने विविध कक्ष स्थापित करण्यात आले आहेत, या सर्व कक्षांना श्री अमित कुमार यांनी भेट दिली. यावेळी डॉ. माने यांनी कार्यालयातील प्रत्येक कक्षाच्या विधानसभा निवडणूक कामकाजाबद्दल आणि कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. श्री अमित कुमार यांनी निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या. विविध कक्षांत सूरू असलेल्या व पूर्वनियोजित कार्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. सुचेता साकोरे, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी कुणाल मंदवाले, माध्यम कक्ष समन्वयक विजयेंद्र गायकवाड, एक खिडकी कक्ष समन्वयक स्वाती नरुटे आदी उपस्थित होते.
००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments