Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रँड अम्बेसिडर अक्षय कुमार यांची आरआर काबेलच्या वाघोदियातील अत्याधुनिक उत्पादन केंद्राला भेट...

ब्रँड अम्बेसिडर अक्षय कुमार यांची आरआर काबेलच्या वाघोदियातील अत्याधुनिक उत्पादन केंद्राला भेट देत सुरक्षा आणि नाविन्याप्रती बांधिलकी अधोरेखित

राष्ट्रीय, 18 डिसेंबर २०२४ – आरआर काबेल लिमिटेड या वायर्स व केबल क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या आणि २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या निर्यातदार कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर अक्षय कुमार यांनी वाघोदिया येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्राला भेट दिली. ही भेट कंपनीची नाविन्य, सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रातील आघाडीचे स्थान अधोरेखित करणारी होती.

मजबूत भागिदारी
गेल्या सात वर्षांपासून अक्षय कुमार हे आरआर काबेलचे केवळ ब्रँड अम्बेसिडर नाहीत, तर ते सुरक्षा आणि दर्जाप्रती कंपनीला वाटणाऱ्या बांधिलकीचे प्रतीक आहेत. या नात्याच्या सुरुवातीपासूनच अक्षय कुमार यांनी आरआर काबेलच्या सुरक्षा उपक्रमांच्या संदेशाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्रँडशी दीर्घकाळापासून असलेल्या नात्यासह त्यांनी वायरच्या दर्जाचे महत्त्व तसेच अग्नीप्रतिबंधक गुणांना आवाज आणि विश्वासर्हता दिली. सार्वजनिक स्तरावर जागरूकता पसरवण्यातील त्यांचा सहभाग, विशेषतः फायर से ज्यादा जानलेवा, अकलमंद बनो सही सुनो, सेव्हिंग्ज का सुपरहिरो आणि वायर का फायर टेस्ट, #सीरियलकिलर अशा उपक्रमांतून त्यांनी महत्त्वाचे काम केले. त्यांनी आरआर काबेलच्या फायरेक्स एलएसओएच (लो स्मोक झिरो हॅलोजन) वायर्सची अनोखी सुरक्षितता आणि दर्जा ‘स्मार्ट’ चॉइस टीव्हीसीमधून अधोरेखित केला. कुमार यांची प्रतिमा ब्रँडच्या मूल्यांशी पूर्णपणे सुसंगत, ग्राहकांना आपलीशी वाटणारी असून त्यातून त्यांनी इलेक्ट्रिक सुरक्षेविषयी प्रसार करत सर्वसामान्यांमध्ये विश्वासर्हता तयार केली.

भेटीदरम्यान कुमार यांनी अत्याधुनिक वाघोदिया केंद्राची सफर केली आणि आआर काबेलची अत्याधुनिक उत्पादन व नाविन्यपूर्ण उत्पादन क्षमतेविषयी बांधिलकी जाणून घेतली. त्यांनी एनएबीएलच्या मान्यताप्राप्त लॅबला भेट दिली आणि प्रत्येक वायर व केबलच्या दर्जाची कशाप्रकारे तपासणी केली जाते हे अनुभवले. हे उत्पादन केंद्र कंपनीच्या इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते. कुमार यांनी यावेळी निवडक बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि वितरकांची भेट घेत कंपनीचा विकास आणि नाविन्याला चालना देणारे आरआर काबेलचे या क्षेत्रातील व्यावसायिकांशी असलेले नाते आणखी मजबूत केले.

याप्रसंगी आरआर केबलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीगोपाल काब्रा म्हणाले, ‘अक्षय कुमार यांच्याशी असलेले आमचे नाते विश्वास, सुरक्षा आणि प्रगतीशील विचारसरणी अशा मूल्यांवर आधारित आहे. वाघोदिया उत्पादन केंद्र जागतिक दर्जाची उत्पादने पुरवण्याची आणि त्याचबरोबर #FireSeJyaadaJaanleva या व अशा कॅम्पेन्सद्वारे इलेक्ट्रिक सुरक्षेविषयी जागरूकता पसरवण्याची आमची बांधिलकी दर्शवणारे आहे.’

भविष्यवेधी दृष्टीकोन

आरआर काबेलने आतापर्यंत बरेच उपक्रम या क्षेत्रात पहिल्यांदाच राबवले आहेत. क्लास २ कंडक्टर्ससह इलेक्ट्रॉन बीम हॅलोजन फ्रीम हाउस वायर्स पुरवणारी पहिली आणि एकमेव भारतीय वायर व केबल कंपनी या नात्याने कंपनीने आतापर्यंत नवनवे औद्योगिक मापदंड प्रस्तापित केले आहेत. सिल्व्हासा आणि वाधोगिया येथील त्यांच्या अत्याधुनिक आर अँड डी केंद्रांना डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चची (डीएसआयआर) मान्यता मिळाली असून त्यांनी ७०० कठोर चाचण्या घेऊन प्रत्येक उत्पादन उपयुक्तता व सुरक्षेचे उच्च मापदंड पार करेल याची काळजी घेतली आहे.

भविष्यातही नाविन्य, शाश्वतता आणि सुरक्षेप्रती बांधिलकी जपण्याचे ध्येय आरआर काबेलने ठेवले आहे. औद्योगिक क्षेत्रातील ४.० तंत्रज्ञान, अक्षय उर्जा आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार पद्धतींमधील गुंतवणुकीसह आरआर काबेल भारतातील इलेक्ट्रिक उद्योगाच्या भविष्याला आकार देण्याचे काम सुरूच ठेवणार आहे. अक्षय कुमार यांनी दिलेली भेट आरआर काबेलच्या प्रेरणादायी प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून त्यातून गुणवत्तेचा ध्यास घेत समाज व उद्योगाला सक्षम करण्याची अविरत बांधिलकी दिसून आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments