पुणे
धायरी, खडकवासला आणि सिंहगड रोड परिसरातील महिलांसाठी “वीआर सक्षम महिला बचत गट,” “वर्शीप अर्थ फाउंडेशन (Worship Earth Foundation),” आणि “शिपको आयटी प्रायव्हेट लिमिटेड” यांच्या सहकार्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक विशेष उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे कौशल्यविकास करणे हा होता. लोणचं, पापड, उन्हाळी पदार्थ बनवणे, अॅडव्हान्स शिवणकाम कोर्स, डिजिटल मार्केटिंग चे प्रशिक्षण अशा विविध कौशल्य प्रशिक्षणाचे उदघाटन याशिवाय मोफत टू-व्हीलर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे महिलांच्या स्वावलंबनाला गती मिळाली.
कार्यक्रमात मनोरंजनासाठी “खेळ पैठणीचा,” संगीत खुर्ची आणि इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, महिलांसाठी प्रेरणादायी चर्चासत्रे आणि व्यवसाय मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. विशेषतः, याशिवाय महानगरपालिकेच्या कै. वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे प्राथमिक विद्यालय येथे ६वी ते ८वीच्या मुलींसाठी चांगल्या वागणुकीसंबंधी स्पर्श आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जागरूकता सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये २५० मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमामध्ये ७०० महिलांनी सहभाग घेतला, त्यापैकी सुमारे ६०० ६५० महिलांनी महिलांनी मोफत प्रशिक्षणासाठी सहभाग घेतला होता
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिपको आयटी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर नितीन ठाकुर, हेड एचआर शुभांगी सिन्हा, यांची उपस्थिती होती. वीआर सक्षम महिला बचत गटाच्या रेशमाताई पोकळे, वैशाली चिपलकट्टी, रुपाली पवार, वर्शीप अर्थ फाउंडेशनचे पराग मते आणि दिनेश कदम, तसेच खडकवासला किरकिटवाडी येथील अनिल मते, भारतीताई मते या मान्यवरांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली. मर्दानी खेळांचे प्रशिक्षण, शंखनाद आणि भजनी मंडळाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आहे
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री. दिनेश कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन रेशमाताई पोकळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
स्त्रीशक्ती हा समाज उभारणीचा मुख्य आधार असून महिलांचे आर्थिक स्वावलंबन हे त्यांच्या आणि कुटुंबांच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे.


