बंगळुरू,14 फेब्रुवारी 2025 : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित आरोग्यसेवा उपायांमध्ये दूरदर्शी संस्था असलेल्या आर्का एआय ने उत्तम आरोग्यसेवा,वैद्यकीय शिक्षण आणि दीर्घकाळ संशोधनाच्या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण सहकार्याची घोषणा केली आहे. लाँगेव्हिटी इंडिया आयआयएससी,बंगळुरू आणि बिलिव्हर्स चर्च मेडिकल कॉलेज हॉस्पिटल,केरळ यांच्यासोबत ही भागीदारी आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संशोधनात प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
लाँगेव्हिटी इंडिया आयआयएससी यांच्या द भारत स्टडीसह दीर्घकाळ संशोधनात प्रगती
आर्का एआय ही लाँगेव्हिटी इंडियासाठी प्रमुख तंत्रज्ञान भागीदार असून इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (आयआयएससी) द्वारे समथित आहे. ही संस्था सखोल संशोधन, शोध आणि अग्रगण्य तंत्रज्ञान विकासासाठी एकीकृत केंद्र म्हणून काम करते व भारतातील आरोग्यसेवेच्या विकासात प्रोत्साहन देते. हा सहयोग दीर्घकाळ संशोधनामध्ये सर्वसमावेशक माहिती संकलन,एकत्रीकरण आणि विश्लेषणासाठी तयार केलेल्या उच्च विशिष्ट अनुप्रयोगांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो. संशोधकांना बायोमार्कर्सचा पाठपुरावा करण्यासाठी,अनुवंशिक आणि जीवनशैलीच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि भारतातील आरोग्यसेवेतील विकासाला चालना देण्यासाठी योगदान देऊ शकतील असे भविष्यसूचक प्रारूप तयार करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
एआय,एमएल/डीएल ॲनालिटिक्स आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगमधील आर्का एआयच्या कौशल्यासह, लाँगेव्हिटी इंडिया मोठ्या प्रमाणात संशोधनाच्या माहितीची कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी प्रगत साधनांनी सुसज्ज असेल. या उपक्रमामुळे दीर्घायुष्य विज्ञानातील प्रगतीला गती मिळण्याची अपेक्षा असून,नवीन उपचारात्मक धोरणे आणि अचूक औषध पध्दतींसाठी नवे मार्ग खुले होतील. संघटित शिक्षणासाठीची माहिती आणि विश्लेषण हे बंगळुरूमधील असून इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (आआयएससी) मध्ये संग्रहित केले जातील.
लाँगेव्हिटी इंडियाचे समन्वयक आणि आयआयएससीचे प्राध्यापक डॉ.दीपक सैनी म्हणाले की, आर्का एआय सोबतचा आमचा सहयोग वाढणारे वय आणि दीर्घायुष्याबरोबर येणाऱ्या गुंतागुंती समजून घेण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक मोठी झेप दर्शवितो. एआय आधारित विश्लेषणासह आपण याबद्दल सखोल अंतर्दृष्टी मिळवू शकतो,ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारणाऱ्या नाविन्यपूर्ण हस्तक्षेपांचा मार्ग मोकळा होतो.
एआय चा वापर करून केरळमधील बिलिव्हर्स चर्च मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षणात परिवर्तन
रूग्ण-डॉक्टर परस्पर संवाद,वैद्यकीय निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे,रूग्णालयातील कामकाज सुव्यवस्थित करणे आणि रूग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी एआय-आधारित उपाय योजना एकत्रित करण्यासाठी आर्का एआय ने केरळमधील बिलिव्हर्स चर्च मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी भागीदारी केली आहे. मशिन लर्निंग मॉडेल्स,प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स आणि उपचार योजना अनुकूलित करण्यासाठी ऑटोमेशन,निदान प्रकियेचा विलंब कमी करणे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना रिअल टाईम माहिती प्रदान करणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे.
याव्यतिरिक्त ही भागीदारी रूग्णसेवेच्या पलीकडे जाऊन वैद्यकीय शिक्षण,विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एआय-आधारित शिक्षण साधने प्रदान करणे,सिम्युलेशन आधारित प्रशिक्षण आणि माहिती व वैद्यकीय कौशल्ये समृध्द करणारी डिजिटल संसाधने प्रदान करते. वैद्यकीय अभ्यासक्रमात इंटेलिजंट सिस्टिम समाविष्ट करून, केरळमधील बिलिव्हर्स चर्च मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने एआय सक्षम आरोग्य व्यावसायिकांची नवीन पिढी विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे प्रशासकीय कामात सहभागी होण्याऐवजी त्यांच्या रूग्णांसोबत अधिक वेळ मिळेल.
केरळमधील बिलिव्हर्स चर्च मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या रोझी मार्सेल म्हणाल्या की,आमचे रूग्णालय आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये एआय नवकल्पना आणण्यासाठी आर्का एआय सोबत सहयोग करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या भागीदारीमुळे आम्हाला रूग्णसेवा सुधारण्यास मदत होणार आहे.तसेच आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण अनुभव देखील वाढेल,ज्यामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्राच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक कौशल्यांसह सुसज्ज केले जाईल.
भविष्यासाठी सामायिक दृष्टीकोण
हा धोरणात्मक सहयोग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्यसेवा आणि संशोधनात परिवर्तन घडवून आणण्याच्या आर्का एआयची वचनबध्दतेला अधोरेखित करतात. वैद्यकीय क्षेत्र आणि वैज्ञानिक संशोधनामध्ये आघाडीवर असलेल्या संस्थांसोबत काम करून कंपनी सध्याच्या रूग्णांना फायदा होईल आणि भविष्यातील औषधे आणि संशोधनाला आकार देईल अशा नवीन उपक्रमांना चालना देत आहे.हे प्रयत्न 20 वर्षांच्या लक्ष्यासह दीर्घ कालावधीसाठी भारतातील आरोग्य आव्हानांचे मुलभूत सर्वेक्षण करण्यास मदत करतील.
आर्का एआयचे संस्थापक रोहित राजन म्हणाले की,डेटा-आधारित माहितीच्या मदतीने भारतीय लोकसंख्येसाठी एक व्यापक आरोग्य सेवा विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डेटाच्या या संरचित चौकटीचा उपयोग एमएल/डीएल विश्लेषणासाठी केला जाऊ शकतो,ज्यामुळे सामुदायिक उपाय योजनांसाठी भविष्यसूचक प्रारूप तयार करता येते. दीर्घकाळात आम्ही वैद्यकीय मेटाडेटा हा जीवनशैलीशी निगडीत आरोग्य डेटा आणि मोलेक्युलर डेटासह एकत्रित करून लोकांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करू.


