Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedZF आफ़टरमार्केटद्वारे नवी दिल्ली येथे भारतातील पहिल्या आधुनिक ZF टेक...

ZF आफ़टरमार्केटद्वारे नवी दिल्ली येथे भारतातील पहिल्या आधुनिक ZF [प्रो] टेक प्लस वर्कशॉप चे उद्घाटन

ZF[प्रो]टेक प्लसचा पहिल्या वर्कशॉपमुळे देशातील पुढील वाटचालीकरता पाया तयार केला जाणार आहे
पहिले भारतीय ZF[प्रो] टेक प्लस वर्कशॉपची ZF[प्रो] टेकचा नेटवर्कशी हातमिळविणी, ज्यामुळे या भागात नव्या वर्कशॉपची सुरवात
ZF[प्रो] टेक भविष्यातील वर्कशॉप व्यवसायांना कामाचा ठिकाणी लागणारे सहाय्य प्रदान करणार, ज्यामुळे गुंतागुंतीचा भागांमध्ये उत्पादनकर्त्यास तज्ञांकडून उत्तम सल्ला मिळू शकेल.

नवी दिल्ली, भारत- फ़ेब्रुवारी २१,२०२५- ZF समूह, हा जागतिक स्तरावर परिवहन (ड्राईवलाईन) आणि चेसिस तंत्रज्ञानामध्ये काम करणारा एक समूह असून, ते ॲक्टिव आणि पॅसिव सुरक्षा तंत्रज्ञानात देखील कार्यरत आहे. यांचाद्वारे आपल्या भारतातील पहिल्या ZF[प्रो]टेक प्लस वर्कशॉपचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. यामुळे हे ZFचे देशातील तंत्रज्ञान क्षमता वाढविणे, स्थानिक तज्ञ समूह निर्माण करणे आणि ग्राहक सेवा प्रदान करण्याकरिता उचललेले पाऊल आहे असे म्हणायला हरकत नाही.

ZF आफ़टरमार्केटकडे ४० वर्षांचा वर्कशॉप्सचा दाणगा वारसा आहे. हे नवीन वर्कशॉप २०१२ पासून ZFचाच मान्यता मिळालेल्या ZF[प्रो] टेक नेटवर्कचा एक भाग आहे, यांचाद्वारे वर्कशॉप्सचे सबळीकरण हे तंत्रज्ञानाची माहिती, प्रशिक्षण आणि ओईएमचा सेवा डेटाचामाध्यमाने केले जाते.

नवी दिल्ली येथील वर्कशॉपचे उद्घाटन ZF आफ़टरमार्केटचे, ग्लोबल बिझनेस लाईन पॅसेंजरचे प्रमुख मार्कस विटिग आणि बिझनेस लाईन पॅसेंजर कार आयएमईएचे प्रमुख विजय खोरगडे तसेच युरोपियन मोटर वर्क्सचे प्रमुख आणि वर्कशॉपचे मालक असलेल्या रोली चढ्ढा यांचाद्वारे केले गेले. या कार्यक्रमामुळे या उपक्रमाचे यश आणि जागतिक महत्वं अधोरेखीत केले जात असून, ZFची जगभरातील भागधारकांना सबळकरण्याप्रती असलेली बांधिलकी देखील दर्शविली जाते.

मार्कस विटिग, ZF आफ़टरमार्केटचा बिझनेस लाईन पॅसेंजरचे प्रमुख यावेळी बोलताना म्हणाले, “´भारतातील पहिल्या ZF [प्रो]टेक प्लस वर्कशॉपचा उद्घाटन सोहळ्याचा मला अतीशय आनंद होतो आहे. यामुळे आमची भारतीय बाजारपेठे प्रती असलेली बांधिलकी आणि येथे काम करण्याचे ध्येयाचा आशय सगळ्यांसमोर स्पष्ट होईल. . या सुविधेमुळे, आम्हाला वर्कशॉप भागीदारांना उत्तम सहाय्य देता येऊ शकेल, ज्यामुळे त्यांचा क्षमता सुधारतील आणि भारतातील ऑटोमोटिव उद्योगात उद्भवणाऱ्या मागणीसाठी ते तयार असतील. यामुळे भारतात आमचा वर्कशॉपची भूमिका मांडता येईल आणि त्याचा विस्तार देखील होईल अशी माझी आशा आहे .”

एसीएमए नुसार, भारतीय ऑटोमोटिव उद्योगाचे आफ़टरमार्केट हे वाहनांची वाढती मागणी आणि त्यांची दुरुस्ती आणि व्यवस्थपान बाजरपेठेचा परिणामामुळे. १०% ने वाढले आहे, जे आर्थिकवर्ष २०२४ मध्ये १०.६ अब्ज युएसडी पासून ११.३ अब्ज युएसडी पर्यंत गेले.

हेड ऑफ़ बिझनेस लाईन पॅसेंजर कार आयएमईए, विजय खोरगडे, यावेळी बोलताना म्हणाले, “ भारतात ZF आफ़टरमार्केट हे वर्कशॉपकरिता तंत्रज्ञान आणि गुणवत्तेसाठीचे एक उदाहरण ठरते आहे. तांत्रिक माहिती आणि प्रशिक्षणामुळे आम्ही आमचा भागीदारांना त्यांचा ग्राहकांना उत्तम सेवा आणि सहाय्य देता येऊ शकेल याची काळजी घेतो. आपल्यातील बऱ्याच जणांना हे माहिती आहे की भारतीय ऑटोमोटिव बाजारपेठ ही क्रांतीचा उंबरठ्यावर ऊभी असून, ZF[प्रो] टेक प्लसचा विचारांमुळे वर्कशॉपला नवीन तंत्रज्ञान आणि गतीशीलतेमधील आधुनिकतांशी जुळवून घेता येते आणि त्यांना भविष्याकरिता संदर्भित आणि तयार ठेवते.”

युरोपियन मोटर वर्क्स आणि वर्कशॉपचे मालक असलेले रोली चढ्ढा, यावेळी उत्साहाने बोलताना म्हणाले, “ बऱ्याच वर्षांपासून आम्ही ZF समूहाशी जोडलेलो आहोत. एक उत्तम वारसा असलेले डिस्ट्रिब्युटर म्हणून , आम्हाला माहिती आहे की ZF आफ़टरमार्केटचे तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला तोड नाही आणि त्यामुळेच ZF [प्रो] टेक प्लसचा पहिल्या वर्कशॉपचा स्वरूपात त्यांचा एक भाग असणे अतीशय आनंदाची भावना देणारे आहे. ZF समूहाचे व्यापक सहाय्य आणि कौशल्यामुळे आम्हाला आमचा सेवांची गुणवत्ता सुधारता येईल आणि आमचा ग्राहकांना अधिक चांगली सेवा प्रदान करता येईल, यात शंकाच नाही.”

प्रयोजन आणि प्रभाव:

ZF आफ्टरमार्केटच्या “मोबिलिटी अपटाइमला जास्तीत जास्त वाढवणे” या धोरणामुळे , ZF [प्रो]टेक वर्कशॉप, वर्कशॉपमधील भागीदारांना तांत्रिक कृतीचे ज्ञान, प्रशिक्षण आणि माउंटिंग सूचना प्रदान करतात. सर्व ZF [प्रो]टेक वर्कशॉप्सना ZF च्या आफ्टरमार्केट तज्ञांकडून प्रदान केलेल्या व्यापक पाठिंब्याचा फायदा होतो, ज्यामध्ये तांत्रिक डेटा आणि सेवा मोहिमांपासून ते मार्केटिंग समर्थन आणि अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमांचा समाविष्ट आहेत. हा समग्र दृष्टिकोनामुळे वर्कशॉप आधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाच्या

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments