Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठी भाषा गौरव दिन रमणबाग शाळेत पुस्तकांची भव्य रांगोळी

मराठी भाषा गौरव दिन रमणबाग शाळेत पुस्तकांची भव्य रांगोळी

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती.

‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि बालकवी विश्वास वसेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महाजन म्हणाल्या, ‘भाषा ही प्रवाही आहे, तिचा सन्मान करावा. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे तिचा जास्तीत जास्त वापर केला जाईल.”

वसेकर म्हणाले, “भाषेचा उपयोग करताना आपले अनुभव,कल्पना सुंदर करून सजवून सांगता आल्या पाहिजे.”

लोकमान्य कल्चरल फाउंडेशन तर्फे मुकुल मारणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली.

शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर, अंजली गोरे, अंजली मालुसरे, सीमा ढोण, उषादेवी भोसले,ऋचा कुलकर्णी, शुभांगी पाखरे, अर्चना देवळणकर यांनी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments