Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्‍यातील रिअल इस्‍टेट बाजारपेठेने जानेवारी २०२५ मध्‍ये मुद्रांक शुल्‍क संकलनांमधील यथास्थिती कायम...

पुण्‍यातील रिअल इस्‍टेट बाजारपेठेने जानेवारी २०२५ मध्‍ये मुद्रांक शुल्‍क संकलनांमधील यथास्थिती कायम ठेवली: नाइट फ्रँक इंडिया · १ कोटी रूपयांपेक्षा अधिक मूल्‍य असलेल्‍या मालमत्तांसाठी मागणी वाढली

पुणे, फेब्रुवारी २५, २०२५: नाइट फ्रँक इंडियाने आपल्‍या नवीन अहवालामध्‍ये नमूद केले की, पुण्‍यातील रिअल इस्‍टेट बाजारपेठेने वार्षिक आधारावर जानेवारी २०२५ मध्‍ये मालमत्ता नोंदणींमधून मुद्रांक शुल्‍क संकलनांमधील यथास्थिती कायम ठेवली. पुण्‍यामध्‍ये १६,३३० मालमत्ता विक्री नोंदणींची नोंद झाली, जेथे मुद्रांक शुल्‍कांमधून ५९० कोटी रूपयांचा महसूल मिळाला.

जानेवारी २०२५ मध्‍ये नोंदणी करण्‍यात आलेल्‍या मालमत्तांच्‍या आकडेवारीमध्‍ये जानेवारी २०२४ च्‍या तुलनेत वार्षिक ८ टक्‍क्‍यांची घट झाली, ज्‍यासाठी प्रमुख कारण म्‍हणजे सणासुदीच्‍या काळात आणि त्‍यापूर्वीच्‍या महिन्‍यांमध्‍ये मालमत्ता व्‍यवहारांचे सर्वाधिक प्रमाण होते. असे असताना देखील मुद्रांक शुल्‍क संकलन स्थिर राहिले, ज्‍याला १ कोटी रूपये व त्‍यापेक्षा अधिक मूल्‍य असलेल्‍या मालमत्तांच्‍या प्रमाणामध्‍ये झालेल्‍या वाढीचा पाठिंबा मिळाला.

मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्‍क संकलन

Period

Registrations (Units)

Stamp duty collection (INR cr)

Jan-24

17,786

589

Jan-25

16,330

590

YoY Change

-8%

0.1%

मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्‍य आणि मुद्रांक शुल्‍क संकलन

Year

Month

Total Registration

Stamp Duty Collection

(INR Cr)

2024

January

17,786

589

2024

February

18,791

662

2024

March

22,189

822

2024

April

14,244

566

2024

May

12,280

440

2024

June

14,690

545

2024

July

13,731

521

2024

August

13,645

599

2024

September

11,056

508

2024

October

20,894

751

2024

November

13,371

475

2024

December

17,348

620

2025

January

16,330

590

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)

जानेवारी २०२५ मध्‍ये १ कोटी रूपये व त्‍यापेक्षा उच्‍च मूल्‍य असलेल्‍या सदनिकांच्‍या मागणीत वाढ दिसण्‍यात आली

१ कोटी रूपये व त्‍यापेक्षा उच्‍च मूल्‍य असलेल्‍या मालमत्तांसाठी मागणीमध्‍ये वाढ दिसण्‍यात आली आहे. या श्रेणीचे प्रमाण जानेवारी २०२४ मधील १३ टक्‍क्‍यांवरून जानेवारी २०२५ मध्‍ये १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले, ज्‍यामधून पुण्‍यातील गृहनिर्माण बाजारपेठेत प्रीमियमायझेशनप्रती ट्रेण्‍ड दिसून येतो.

निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी तिकिट आकाराचे प्रमाण

Ticket size

Share in Jan 2024

Share in Jan 2025

Under INR 25 lakhs

22%

24%

INR 25 – 50 lakhs

32%

30%

INR 50 lakhs – 1 Cr

33%

31%

INR 1 Cr – 2.5 Cr

12%

13%

INR 2.5 Cr – 5 Cr

1%

2%

Over 5 Cr

<=1% <=1% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी तिकिट आकार Ticket size Share in Jan 2024 Share in Jan 2025 Under INR 25 lakhs 2,088 1,929 INR 25 – 50 lakhs 2,973 2,434 INR 50 lakhs - 1 Cr 3,066 2,515 INR 1 Cr – 2.5 Cr 1,022 1,055 INR 2.5 Cr – 5 Cr 113 147 Over 5 Cr 30 33 नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजाल म्‍हणाले, “जानेवारी २०२५ मध्ये पुण्‍यातील मालमत्ता विक्री नोंदणींमध्‍ये घट दिसण्‍यात आली. पण, विशेषत: १ कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्‍या उच्‍च मूल्‍याच्‍या घरांसाठी मागणी वाढत आहे, ज्‍यामधून उच्‍च मूल्‍य श्रेणीमध्‍ये गृहखरेदीदारांची सकारात्‍मक भावना दिसून येते. सर्वसमावेशक किफायतशीरपणा गतीशीलता आणि बाजारपेठ समायोजनाचा कमी व मध्‍यम श्रेणीमधील व्‍यवहार आकारमानांवर प्रभाव पडला असला तरी गृहकर्ज व्‍याजदरांमध्‍ये कपात आणि शहरामधील प्रबळ रोजगार बाजारपेठेला पुढे जाण्‍यास मदत करण्‍याची अपेक्षा आहे. डेव्‍हलपर्स ग्राहकांच्‍या बदलत्‍या प्राधान्‍यक्रमांशी जुळवून घेत आहेत, तसेच मागणीची पूर्तता करण्‍यासाठी स्थिर पुरवठा होण्‍याची खात्री घेत आहेत.'' मोठ्या सदनिकांसाठी उच्‍च मागणी कायम मोठ्या सदनिकांसाठी पसंती कायम राहिली आहे, जेथे ८०० चौरस फूटांहून अधिक जागा असलेल्‍या सदनिकांचे प्रमाण जानेवारी २०२४ मधील २८ टक्‍क्‍यांवरून जानेवारी २०२५ मध्‍ये ३१ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. या ट्रेण्‍डमधून महामारीनंतर देखील मोठ्या सदनिकांसाठी सतत मागणी होत असल्‍याचे दिसून येते. निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी क्षेत्राचे प्रमाण Area in sq ft Share in Jan 2024 Share in Jan 2025 Under 500 25% 25% 500-800 47% 45% 800-1000 14% 14% 1000- 2000 12% 14% Over 2000 2% 3% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) जानेवारी २०२५ मध्‍ये सेंट्रल पुण्‍यात एकूण निवासी व्‍यवहारांपैकी ८० टक्‍के व्यवहारांची नोंद जानेवारी २०२५ मध्‍ये हवेली तालुका, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचा समावेश असलेले सेंट्रल पुणेने निवासी व्‍यवहारांमध्‍ये प्रभुत्‍व कायम राखले, ज्‍याचे बाजारपेठेत ८१ टक्‍क्‍यांचे मोठे योगदान होते. असे असताना देखील हे प्रमाण गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत काहीसे कमी झाले आहे, तसेच शहरातील इतर भागांमधील नवीन पुरवठा पुण्‍यातील गृहखरेदीदारांच्‍या सतत बदलत असलेल्‍या गरजांची पूर्तता करत आहेत. मावळ, मुळशी व वेल्‍हे यांसारख्‍या भागांचा समावेश असलेल्‍या पश्चिम पुणेने निवासी व्‍यवहारांमध्‍ये १२ टक्‍क्‍यांसह दुसरे सर्वात मोठे प्रमाण सुनिश्चित केले. तसेच याच कालावधीदरम्‍यान उत्तर, दक्षिण व पूर्व पुणेचे एकत्रित निवासी व्‍यवहारांमध्‍ये प्रमाण ७ टक्‍के होते. निवासी मालमत्ता व्‍यवहारांसाठी सूक्ष्‍म बाजारपेठांचे प्रमाण Micro market Share in January 2024 Share in January 2025 North 5% 5% South 3% 1% East 1% 1% West 8% 12% Central 83% 81% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्‍ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) Micro Markets Zone Taluka North Junnar, Ambegaon, Khed South Bhor, Purandhar, Baramati, Indapur East Shirur, Daund West Mawal, Mulshi, Velhe Central Haveli, Pune city (Pune Municipal corporation (PMC) & Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC))

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments