Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorized"शेतकरी..., हा एक रुपया पगार न घेता, राज्य आणि राष्ट्रातील सरकार आणि...

“शेतकरी…, हा एक रुपया पगार न घेता, राज्य आणि राष्ट्रातील सरकार आणि उपभोक्तेंना वर्षभर मोफत पोहसणारा एकमेव नेता आहे., विठ्ठल राजे पवार.!*

*

*पुणे*
*दिनांक ०२ मार्च २०२५.*
*[“महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी पंपाचे संपूर्ण विज बिल मुक्त केले, दुसरी भेट सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रेला ०४ मार्च २०२५ पासून सुरुवात.., केंद्र व राज्य सरकारकडून गरजवंत शेतकऱ्यांना लवकरच सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळवूनच देउ.!*
*शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटने कडून राज्यातील शेतकऱ्यांना ३९ हजार कोटी वीज बिल मुक्तीची अनोखी भेट दिले नंतर…]*
*….. लवकरच राज्य व राष्ट्रातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज मुक्ती मिळवून देण्याचा ऐतिहासिक निकाल देखील शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ, संघटनाच घेईल, असा विश्वास विठ्ठल राजे पवार यांनी व्यक्त केला आहे.*

*भारतीय शेतकरी हा वर्षभरातील कोणतेही महिन्याचा एक रुपया पगार न घेता वर्षभर देशातील उपभोक्ते आणि सरकारला पोहसत आहे, परंतु गेल्या ७६ वर्ष केंद्र व ६५ वर्षात राज्य सरकारकडून अध्यायापर्यंत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, देशात राष्ट्र आणि राज्यातला सर्वश्रेष्ठ नेता म्हणून जर भारतामध्ये कोण असेल तर सर्वप्रथम “सर्वोच्च हा शेतकरी आहे.! आणि त्यांना त्यांचा आदर सन्मानपूर्वक सहकार्य करण्याची भावना राज्य आणि राष्ट्रीय सरकारने घेतली पाहिजे, म्हणून देशाचे प्रधानमंत्री, सहकार मंत्री, कृषी मंत्री आणि अर्थमंत्री यांना पत्रव्यवहार केलेला आहे, लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्य आणि राष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी करून ती पूर्णत्वाकडे नेऊन श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचे दुसरे स्वप्न लवकरच पूर्ण करू असे महत्त्वपूर्ण उद्गार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी पुणे येथील संघटनेच्या राष्ट्रीय संपर्क कार्यालयामध्ये काढले संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश व गुजरात संपर्कप्रमुख मध्ये नीलिमा देसाई यांची कर्नाटक अध्यक्षपदी प्रोफेसर मीनाक्षी काळे पाटील यांची नियुक्ती त्यांनी यावेळी केली यावेळी संघटनेचे युवकाध्यक्ष अनिल भांडवलकर का व सामाजिक कार्यकर्ते सोनवणे उपस्थित होते. शेतकरी सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीचा हक्कदार आहे,* शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करणं हे सरकारचं कर्तव्य आहे ती त्यांनी पार पाडावे, अशी शरद शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे, राज्य आणि राष्ट्रातील शेतकरी सतत कर्जबाजारी आणि सहा लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्याचे पाप तत्कालीन आणि विद्यमान सरकारचेच आहे.! असा आरोप देखील संघटनेने केला आहे., *शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे कारण राज्य आणि केंद्र सरकार आहे म्हणून शेतकरयांना संपूर्ण सरसकट कर्जमुक्तीचा आग्रह केंद्र आणि राज्य सरकारकडे राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रे च्या माध्यमातून आहे, तो सरकारने मान्य केलं नाही तर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून सर्वोच्च सुप्रीम न्यायालय व राष्ट्रीय अन्न आयोगासमोर याचिका दाखल करून शेतकऱ्याला सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती चा न्याय मिळवून देऊन, श्रद्धेय युगपुरुष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांची दुसरी स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात करू असा दावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक व एनयूबीसी चे वेस्टर्न भारत चेअरमन विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे.*
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाचं ३९ हजार कोटींचे सरसकट संपूर्ण विज बिल मुक्त करणारी राज्यातील एकमेव शेतकरी संघटना “शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ होय,, असा ठाम दावा विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे.*
*”यापुढे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांनी एक रुपया देखील कृषी पंपाच्या विजेचे बिल भरू नये मग तो पाच एचपी चा असेल किंवा पन्नास एचपी चा. कृषी पंपासाठी येणारे, मागील किंवा पुढील कोणतही विज बिल एक दमडा देखील कोणीही भरू नये अशी माहिती संघटनेच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये संघटनेच्या वतीने केल्या गेलेल्या राष्ट्रीय नियुक्तीच्या दरम्यान राजे पवार बोलत होते. बोलत होते..*
यानिमित्ताने जानेवारी 20-25 पासून महाराष्ट्र राज्यातून शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात केलेली असून संघटनेने शेतकऱ्यांची केलेली विज बिल मुक्ती हा भारतामधील एक ऐतिहासिक निर्णय आहे, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विज बिल मुक्ती हा महाराष्ट्र राज्य अन्न आयोग व मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश संघटनेने श्रद्धेय युगपुरुष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या चरणी समर्पित, केला आहे. श्रद्धेय युगपुरुष यांचे दुसरे स्वप्न देखील लवकरच साकार होईल असे धाडसी गौर उद्गार विठ्ठल राजे पवार व्यक्त करत राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना विश्वास दिला आहे, शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची कोणतीही चिंता अथवा आत्महत्या सारखा विचार करू नये, तसेच सत्तेच्या लालसे पोटी सरकारच्या ताटाखालची मांजर झालेल्या भ्रष्टाचारी गैर नेत्यांचे च्या नादी लागून शेतकऱ्यांनी स्वताचे नुकसान करून घेऊ नये असे आवाहन देखील विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी केले आहे, शेतकऱ्यांवरती कोणतेही संकट असेल तर शेतकऱ्यांनी तात्काळ शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षता पदाधिकाऱ्यांची संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन नियुक्त्या झाल्या नंतर ते राष्ट्रीय कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते, यावेळी संघटनेचे अनिल भांडवलकर पुणे जिल्हा युवक अध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे, प्रदेश उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे पाटील, विठ्ठल पाटील लोखंडे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments