Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑटोरिक्षा परवान्यांना मुदतवाढ; वाहन बदलासाठीही दिलासा*

ऑटोरिक्षा परवान्यांना मुदतवाढ; वाहन बदलासाठीही दिलासा*

 

 

 

पुणे, दि. १२: परवाना बंदीमुळे पूर्वी जारी करण्यात आलेल्या इरादापत्रांना नवीन ऑटोरिक्षा वाहन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या इरादापत्रांची १८० दिवसांची मुदत १ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर संपली आहे, तसेच ज्या अर्जदारांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे, अशा इरादापत्रांना एकदाच १८० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

तसेच, ९ मार्च २०२६ पर्यंत नवीन ऑटोरिक्षा नोंदणीसाठी अर्ज सादर केलेल्या, मात्र नोंदणी क्रमांक अद्याप जारी न झालेल्या इरादापत्रांनाही १८० दिवसांची मुदतवाढ देऊन वाहन नोंदणीसाठी सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

*वाहन बदलाच्या परवान्यालाही मुदतवाढ*

परवानाधारकांना जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्यासाठी असलेल्या रिप्लेसमेंटच्या मुदतीबाबतही दिलासा देण्यात आला आहे. ३० जून २०२६ पर्यंत मुदत संपलेल्या रिप्लेसमेंट प्रकरणांमध्ये दंड भरून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बदललेले वाहन सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

तसेच, ०१ जुलै २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रिप्लेसमेंटची मुदत संपलेल्या प्रकरणांमध्ये दंड न घेता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाहन बदलाची नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास परवाना रद्द समजण्यात येईल.

याशिवाय, १ सप्टेंबर २०२६ नंतर रिप्लेसमेंट झालेल्या प्रकरणांमध्ये रिप्लेसमेंटची मुदत सहा महिन्यांची असून, मुदत संपल्यानंतर केवळ एकदाच सहा महिन्यांची मुदतवाढ वाहन बदलण्यासाठी देण्यात येणार आहे, असे

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments