Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात नवीन डिझाइन आणि मॉन्‍स्‍टर कार्यक्षमता असलेले गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि...

सॅमसंगकडून भारतात नवीन डिझाइन आणि मॉन्‍स्‍टर कार्यक्षमता असलेले गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी लाँच

गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी २७, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज विविध सेगमेंट-लीडिंग वैशिष्‍ट्ये असलेल्या दोन मॉन्‍स्‍टर डिवाईसेसच्‍या लाँचची घोषणा केली – गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी. अत्‍यंत लोकप्रिय गॅलॅक्‍सी एम सिरीजमधील हे नवीन स्‍मार्टफोन्‍स स्‍टाइल व अत्‍याधुनिक इनोव्‍हेशन्‍सचे प्रभावी संयोजन देतात, ज्‍यामधून प्रत्‍येक ग्राहकाला नवीन क्षमतांची खात्री मिळते.

”गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी एम सिरीजचे दोन वारसायुक्त मॉन्‍स्‍टर इनोव्‍हेशन्‍स व कार्यक्षमतेसह येतात. नवीन डिझाइनसह हे डिवाईसेस स्‍टाइल व कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यांच्‍यामध्‍ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर आणि ऑपरेटर्समधील फुल ५जी सपोर्ट आहे. गॅलॅक्‍सी एम१६ ५जी सेगमेंट-लीडिंग एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले, ओएस अपग्रेड्सचे सहा जनरेशन्‍स आणि टॅप अँड पे क्षमता असलेल्‍या सॅमसंग वॉलेटसह नवीन मापदंड स्‍थापित करतो,” असे सॅमसंग इंडियाचे एमएक्‍स बिझनेसचे महाव्‍यवस्‍थापक अक्षय एस. राव म्‍हणाले.

मॉन्‍स्‍टर डिस्‍प्‍ले

गॅलॅक्‍सी एम१६ ५जी मध्‍ये सेगमेंट-लीडिंग ६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आहे, जो उच्‍च दर्जाचा कलर कॉन्स्ट्रास्‍ट देतो, ज्‍यामधून सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव मिळतो. गॅलॅक्‍सी एम१६ ५जी मध्‍ये अॅडप्टिव्‍ह हाय ब्राइटनेस मोड आहे, ज्‍यासह वापरकर्ते प्रखर सूर्यप्रकाशात देखील त्‍यांच्‍या आवडत्‍या कन्‍टेन्‍टचा आनंद घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी एम०६ ५जी मध्‍ये ६.७ इंच एचडी+ डिस्‍प्‍ले आहे, जे तंत्रज्ञान-प्रेमी जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांसाठी बाहेरील वातावरणामध्‍ये देखील सोशल मीडिया फिड्स सहजपणे स्‍क्रॉलिंग करण्‍याची सुविधा देते.

मॉन्‍स्‍टर डिझाइन

गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी या दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ऑल-न्‍यू डिझाइनसह नवीन लिनियर ग्रुप्‍ड कॅमेरा मॉड्यूल, आकर्षक व संतुलित कलर पॅलेट आणि सुधारित फिनिशिंग आहे, ज्‍यामुळे हे डिवाईसेस आकर्षक व ट्रेण्‍डी दिसतात. दोन्‍ही डिवाईसेस स्‍लीक व अविश्‍वसनीयरित्‍या एर्गोनॉमिक आहेत. गॅलॅक्‍सी एम१६ ५जी ची जाडी फक्‍त ७.९ मिमी आहे, तर गॅलॅक्‍सी एम०६ ५जी ची जाडी ८ मिमी आहे. गॅलॅक्‍सी एम१६ ५जी ब्‍लश पिंक, मिंट ग्रीन व थंडर ब्‍लॅक या तीन आकर्षक व उत्‍साहवर्धक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल, तर गॅलॅक्‍सी एम०६ ५जी सेग ग्रीन आणि ब्‍लेझिंग ब्‍लॅक या रंगासह तुमच्‍या स्‍टाइलला अधिक आकर्षक करेल.

मॉन्‍स्‍टर कार्यक्षमता आणि कनेक्‍टीव्‍हीटी

गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी मध्‍ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरची शक्‍ती आहे, ज्‍यामुळे दोन्‍ही डिवाईसेस सुलभ मल्‍टीटास्किंगसाठी गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम आहेत. अल्टिमेट स्‍पीड व कनेक्‍टीव्‍हीटी आणि सेगमेंटमधील अग्रणी ५जी बँड्सच्‍या सपोर्टसह वापरकर्ते कुठेही कनेक्‍टेड राहू शकतात, ज्‍यामधून जलद डाऊनलोड व अपलोड स्‍पीड्स, सुलभ स्‍ट्रीमिंग आणि विनात्‍यत्‍यय ब्राऊजिंगचा अनुभव मिळेल.

मॉन्‍स्‍टर कॅमेरा

गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी मध्‍ये आकर्षक नवीन कॅमेरा मॉड्यूल आहे. गॅलॅक्‍सी एम१६ ५जी मध्‍ये अधिक सुस्‍पष्‍टतेसाठी सेगमेंट-लीडिंग ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरा आहे, ज्‍याला पूरक ५ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स आणि २ मेगापिक्‍सल मॅक्रो कॅमेरा आहे. १३ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरासह आकर्षक व सुस्‍पष्‍ट सेल्‍फीज कॅप्‍चर करता येतात. गॅलॅक्‍सी एम०६ ५जी मध्‍ये हाय-रिझॉल्‍यूशन ५० मेगापिक्‍सल वाइड-अँगल लेन्‍ससह एफ१.८ अर्पेचर आहे, जे आकर्षक व सुस्‍पष्‍ट फोटो कॅप्‍चर करते, तर २ मेगापिक्‍सल डेप्‍थ कॅमेरा अधिक सुस्‍पष्‍ट इमेजेस् देतो. तसेच, गॅलॅक्‍सी एम०६ ५जी मध्‍ये ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे, ज्‍यामधून आकर्षक सेल्‍फी काढता येतात.

मॉन्‍स्‍टर बॅटरी

गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी या दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळपर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग आणि मनसोक्‍त मनोरंजन पाहण्‍याचा आनंद देते. दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये २५ वॅट फास्‍ट चार्जिंग आहे, ज्‍यामुळे डिवाईसेस कमी वेळेत संपूर्ण चार्ज होतात.

मॉन्‍स्‍टर गॅलॅक्‍सी अनुभव

सॅमसंग गॅलॅक्‍सी एम१६ ५जी सोबत ओएस अपग्रेड्सच्‍या बेस्‍ट-इन-सेगमेंट ६ जनरेशन्‍स व ६ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी सह ओएस अपग्रेड्सच्‍या ४ जनरेशन्‍स व ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स देत ग्राहक समाधानाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. यामधून वापरकर्ते आगामी वर्षांमध्‍ये नवीन वैशिष्‍ट्ये आणि अधिक सुरक्षिततेचा आनंद घेऊ शकतात.

ग्राहक अनुभवाला अधिक उत्‍साहित करण्‍याच्या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नामध्‍ये सॅमसंग गॅलॅक्‍सी एम१६ ५जी सह या सेगमेंटमध्‍ये पहिल्‍यांदाच सॅमसंग वॉलेटच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यपूर्ण टॅप अँड पे वैशिष्‍ट्य सादर करत आहे, ज्‍यामुळे ग्राहक सुरक्षितपणे पेमेंट्स करू शकतात.

दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये सॅमसंगचे सर्वात प्रगत सिक्‍युरिटी इनोव्‍हेशन्‍स: सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट असेल. ही हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देते. गॅलॅक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलॅक्‍सी एम०६ ५जी मध्‍ये वॉईस फोकस सारखी वैशिष्‍ट्ये देखील असतील, जे सुधारित कॉलिंग अनुभवासाठी आसपासचा आवाज कमी करते.

उत्‍पादन

व्‍हेरिएण्‍ट

सुरूवातीची किंमत

ऑफर्स

गॅलॅक्‍सी एम१६ ५जी

४ जीबी + १२८ जीबी

११४९९ रूपये

सर्वसमावेशक १००० रूपयांची कॅशबॅक ऑफर

६ जीबी + १२८ जीबी

१२९९९ रूपये

८ जीबी + १२८ जीबी

१४४९९ रूपये

गॅलॅक्‍सी एम०६ ५जी

४ जीबी + १२८ जीबी

९४९९ रूपये

सर्वसमावेशक ५०० रूपयांची कॅशबॅक ऑफर

६ जीबी + १२८ जीबी

१०९९९ रूपये

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments