पुणे,4 मार्च 2025 : भारतातील आघाडीच्या फास्ट फॅशन डी2सी ब्रँडसपैकी एक असलेल्या द इंडियन गराज कंपनी ने पुण्यातील ॲमनोरा मॉल येथे आपल्या नवीन फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन केले असून याला खरेदीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.1 आणि 2 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभाला फॅशन चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातून महाराष्ट्रातील जेन-झी आणि फॅशन प्रेमींमध्ये ब्रँडचे मजबूत आकर्षण पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
या स्टोअरचे उद्घाटन ॲमनोरा मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजित सिंग राजपुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. हैदराबाद येथील सारथ सिटी मॉल येथील ब्रँडच्या अभूतपूर्व यशानंतर ब्रँडने भारतभर रिटेल व्यवसाय सुरू ठेवत हा विस्तार ब्रँडसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
हा विस्तार साजरा करण्यासाठी ब्रँड तर्फे भारतातील सर्वांत मोठा फॅशन इव्हेंट म्हणजे फॅशन फ्रेंजी सेल हा पुण्यातील फॅशन चाहत्यांसाठी 48 तासांचा शॉपिंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यामध्ये 1500 पेक्षा अधिक स्टाईल्स,ट्रेंड सेटिंग स्ट्रीटवेअर,रिसॉर्ट वेअर,कोरियन प्रेरित व बोहेमियन कलेक्शनचा समावेश होता.
2051 चौरस फुटांवर विस्तारलेल्या ॲमनोरा मॉलमधील हे फ्लॅगशिप स्टोअर पुण्यातील फॅशन-जागरूक ग्राहकांसाठी आकर्षक खरेदी अनुभव देईल. ज्यामुळे ग्राहकांना जेन- झी पिढीसाठी स्टाईलिश फॅशनचे विविध प्रकार उपलब्ध होतील. ट्रेंडी स्ट्रीट वेअर पासून ते रिसॉर्ट आणि बोहेमियन प्रेरित उत्पादनांपर्यंत हे स्टोअर पुण्यातील तरूण फॅशन जागरूक लोकांसाठी त्यांच्या विविध आवडी-निवडीनुसार डिझाईन केले गेले आहे.
द इंडियन गराज कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत तांतेड म्हणाले की, आमच्या पुण्यातील स्टोअरला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप आनंदित आहोत. आमच्या ग्राहकांकडून मिळालेली उर्जा,उत्साह आणि प्रेम हे अभूतपूर्व आहे. पुण्यातील वाढत्या फॅशन संस्कृतीमुळे हे शहर आमच्या ब्रँडसाठी परिपूर्ण ठिकाण बनले आहे.आम्ही या अविश्वसनीय शहरात सर्वोत्तम फॅशन ऑफर प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.


