Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रिजस्टोनला 17 व्या ग्लोबल सीएसआर आणि ईएसजी समिट आणि अवॉर्ड्स 2025 मध्ये...

ब्रिजस्टोनला 17 व्या ग्लोबल सीएसआर आणि ईएसजी समिट आणि अवॉर्ड्स 2025 मध्ये “सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय उत्कृष्टता पुरस्कार” आणि “बेस्ट इन इंडिया पुरस्कारा”ने गौरविले

• ब्रिजस्टोनने 17व्या ग्लोबल सीएसआर आणि ईएसजी समिट अँड अवॉर्ड्स 2025 मध्ये दोन पुरस्कार मिळवले, 20 श्रेणींतील 250 हून अधिक नामांकनांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
• या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात सलग आठव्या वर्षी ब्रिजस्टोनला सन्मानित करण्यात आले आहे.
• हे पुरस्कार ब्रिजस्टोनच्या शाश्वत विकास आणि समाजावर होणाऱ्या सकारात्मक प्रभावावरील बांधिलकीचे प्रतीक आहेत असून ते ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट आणि ‘इकोलॉजी’, ‘ईझ’ आणि ‘एम्पॉवरमेंट’ या मूल्यांशी सुसंगत आहेत.

पुणे , 4 मार्च 2025 – ब्रिजस्टोन आशिया पॅसिफिक, इंडिया, चायना (BSAPIC) या कंपनीला परिवर्तनशील सीएसआर धोरणाद्वारे सकारात्मक प्रभाव घडविण्यासाठी 17 व्या वार्षिक ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट आणि अवॉर्ड्स 2025 मध्ये दोन पुरस्कार मिळाले आहेत. BSAPICने आता सलग आठव्या वर्षी ग्लोबल सीएसआर आणि ईएसजी समिट अवॉर्ड्स प्राप्त केले आहेत.
यंदा BSAPICला ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय उत्कृष्टता’ आणि ‘बेस्ट इन इंडिया’ या श्रेणींमध्ये प्लॅटिनम पुरस्कार मिळाले. ब्रिजस्टोनच्या जैवविविधता संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय उत्कृष्टता’ पुरस्कार दिला गेला असून, यामध्ये BSAPICच्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. ब्रिजस्टोन इंडोनेशियामध्ये मॅन्ग्रोव्ह प्रकल्पाच्या माध्यमातून प्रजातींसाठी नैसर्गिक अधिवास पुनर्स्थापित करण्यात आला आहे, तर संगगाबुआना प्रकल्पाअंतर्गत पुनर्रोपणाच्या माध्यमातून जंगलतोडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यात आली आहे. ब्रिजस्टोन थायलंडच्या ‘वॉटर बॉय’ उपक्रमाद्वारे पाणीटंचाई असलेल्या भागांत वन्यजीव पुनर्स्थापनेसह पाणीपुरवठा वाढवण्याचे काम करण्यात आले आहे. ब्रिजस्टोन इंडियाच्या ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल’ उपक्रमाद्वारे इंदूर आणि पुणे येथील प्लांट्समध्ये जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ब्रिजस्टोन इंडियाच्या व्यापक शाश्वत विकास उपक्रमाचा भाग म्हणून ओळख मिळाली असून, त्यामुळे कंपनीला ‘बेस्ट इन इंडिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा सन्मान म्हणजे ग्राहक आणि समाजासाठी शाश्वत समाधान देणारी कंपनी होण्याच्या ब्रिजस्टोनच्या व्हिजनममध्ये महत्त्वाचा टप्पा आहे. पर्यावरण संरक्षण आणि समाजाच्या सशक्तीकरणासाठी ब्रिजस्टोन सातत्याने कार्यरत आहे. ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

“ग्लोबल सीएसआर आणि ईएसजी समिट आणि अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय उत्कृष्टता पुरस्कार’ आणि ‘बेस्ट इन इंडिया पुरस्कार’ मिळणे, हा आमचा बहुमान आहे. 2018 पासून गेल्या आठ वर्षांत या प्रतिष्ठित सोहळ्यात BSAPICने मिळवलेल्या 17 व्या आणि 18 व्या विजेतेपदांचे हे प्रतीक आहेत. ग्राहकंना शाश्वत उपाय उपलब्ध करून देण्याच्या पलीकडे जाऊन, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे, शिक्षणाला चालना देणे आणि समाजासाठी अधिक संधी निर्माण करणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ब्रिजस्टोन E8 कमिटमेंटच्या मार्गदर्शनाखाली, अधिक शाश्वत आणि समावेशक भविष्य घडवण्यासाठी नवे मार्ग शोधत राहू,” असे BSAPICसाठी एचआर आणि सीएसआरचे नेतृत्व करणारे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर पॉल चू म्हणाले.

17 वी वार्षिक ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट आणि अवॉर्ड्स 2025 हा आशियातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) आणि पर्यावरण, सामाजिक व कॉर्पोरेट प्रशासन (ईएसजी) क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. व्यवसायिक कार्यपद्धतींमध्ये नैतिक मूल्यांचे पालन, कायद्याचे अनुपालन आणि व्यक्ती, समाज व पर्यावरणाचा सन्मान राखणाऱ्या कंपन्यांची या मंचावर विशेष दखल घेण्यात येते. या पुरस्कारांसाठी यंदा 20 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 250 हून अधिक नामांकने स्पर्धेत होती.

या क्षेत्रातील BSAPICने केलेली कामगिरी पुढीलप्रमाणे :

1 ब्रिजस्टोन समूहाने आपल्या व्हिजनची अंमलबजावणी करण्यासाठी ‘ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट’ स्थापन केली आहे. 2050 पर्यंत, शाश्वत उपाय प्रदान करणारी कंपनी म्हणून ब्रिजस्टोन सामाजिक आणि ग्राहक मूल्य निर्माण करत राहील, हा या व्हिजनचा मुख्य उद्देश आहे. ही कमिटमेंट समूहाच्या व्यवस्थापनासाठी एक केंद्रबिंदू म्हणून कार्य करेल आणि भविष्यातील पिढ्यांचा विश्वास संपादन करेल. ‘ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट’मध्ये आठ मूल्यांचा समावेश आहे, जे ‘E’ अक्षराने सुरू होतात – ऊर्जा (एनर्जी), पर्यावरणीय संतुलन (इकोलॉजी), कार्यक्षमता (एफिशियन्सी), दीर्घायुष्य (एक्स्टेन्शन), अर्थव्यवस्था (इकोनॉमी), भावना (इमोशन), सहजता (ईझ) आणि सशक्तीकरण (एम्पॉवरमेंट). ब्रिजस्टोन समूह आपली उद्दिष्टे आणि प्रक्रियांच्या माध्यमातून, कर्मचारी, समाज, भागीदार आणि ग्राहकांसोबत मिळून ही मूल्ये निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे, जेणेकरून शाश्वत समाजाची निर्मिती साध्य करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments