Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाढते शहरीकरण पर्यावरणपूरक, मानवकेंद्री आणि सर्वसमावेशक हवे बीएनसीएतील ‌‘संरचित भवताल‌’ या तिसऱ्या...

वाढते शहरीकरण पर्यावरणपूरक, मानवकेंद्री आणि सर्वसमावेशक हवे बीएनसीएतील ‌‘संरचित भवताल‌’ या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची अपेक्षा

पुणे, दि. 4 मार्च २०२५ : चालू शतक हे भारतासह जगभरातील देशांसाठी सर्वाधिक वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचे आहे. शहरांमधील वाढती लोकसंख्या तसेच जागतिक हवामान बदलांसारख्या महाकाय आव्हानांना समावेशक दूरदृष्टीने, तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून आणि मानव केंद्री दृष्टीकोन अंगीकारून सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे ही प्रदूषणात वाढ करणारी न राहता ती पर्यावरणस्नेही व ऊर्जाकेंद्रे बनावीत आणि त्यातून एकजिनसी समाज घडावा. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतानाच, समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्रातील संकल्पनाचा समन्वय साधत शहरांमधील मूलभूत पायाभूत सुविधांमधील सर्वसमावेशक दृष्टिकोन जाणीवपूर्वक जोपासला जावा, अशी अपेक्षा देशभरातील व परदेशातील नामवंत वास्तूरचनातज्ज्ञ, अभियंते, शहर नियोजक आणि तज्ज्ञ अभ्यासकांनी या परिषदेत व्यक्त केली.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन तर्फे (बीएनसीए) ‌‘संरचित भवताल व त्यापलीकडे: आव्हाने आणि संधी‌’ (बिल्ट एनव्हायरमेंट ॲण्ड बियाँड : चॅलेंजेस ॲण्ड अपॉर्च्युनिटी) या विषयावरील शोधनिबंध सादरीकरणावरील दोन दिवसांची तिसरी राष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक व ज्येष्ठ शहर नियोजक आर्किटेक्ट डॉ. मनीष चलाना, इंग्लंडच्या लिव्हरपूल मूर्स विद्यापीठातील सहयोगी प्रा. डॉ. मोहन श्रीवर्धेना आणि यांच्या बीजभाषणांसह प्रमूख पाहुणे म्हणून कौंन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रशिक्षण आणि संशोधन विभाग केंद्राच्या संचालक आर्किटेक्ट प्रा. जयश्री देशपांडे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या 60 तज्ज्ञ अभ्यासकांनी विचार मांडले. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रेरणेतून ही तिसरी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेला कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) आणि आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हेअर्स असोसिएशन (एइएसए) या संस्थांची ज्ञानात्मक भागीदारी लाभली आहे.

बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोगडे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात नवनवे संशोधक पुढे येत आहेत, या गोष्टीचे स्वागत केले. ते म्हणाले की, बीएनसीए हे पुण्यातील वास्तूरचनाशास्त्रामध्ये कार्यरत असणारे एकमेव संशोधन केंद्र असून तिथे नवीन संशोधनास प्रोत्साहन दिले जाते.

परिषदेच्या निमंत्रक डॉ, वैशाली लाटकर यांनी या दोन दिवसांच्या परिषदेमागची भूमिका, व्याप्ती व आजच्या संदर्भातले महत्व विषद केले. सहआयोजक प्रा. निशिगंधा साखरदांडे यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेच्या सहनिमंत्रक डॉ. मीरा शिरोळकर आणि डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांनीही आपले विचार मांडले. या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेला देशभरातून व परदेशातून मिळून बांधकाम क्षेत्र व त्यापलिकडील आव्हाने आणि संधी यावर 60 शोधनिबंध सादर केले. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत मूर्ती आणि स्थापत्यशास्त्रांपासून पर्यावरणपूरक साधनसामुग्री आणि तंत्रज्ञान, चक्रीय अर्थकारण, महाराष्ट्रातले किल्ले, वास्तूरचनाशास्त्राचा चित्रपटातली वापर अशा विविध व्याप्ती असणाऱ्या विषयांचे सादरीकरण झाले. ह्या परिषदेत सादर केलेल्या निवडक शोधनिबंधांचे संकलन करून लवकरच ते पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात येणार आहे.

आपल्या बीजभाषणात डॉ.मनीष चलाना यांनी भारत 30 टक्के शहरीकरणाकडून 60 टक्के शहरीकरणाकडे वेगाने जात असून दिल्ली, मुंबई व बंगलोर या शहरांचे वेगाने जागतिकीकरण होत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शाश्वत उपाय तसेच बांधकाम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना, बांधकाम क्षेत्रात समावेशकता व लवचिकता यायला हवी. यातून शहरी वाहतुकीत मोठे बदल, चक्रीय अर्थकारणाच्या वापरातून वाढता लोकसहभाग तसेच पर्यावरणपूरक, ऊर्जानिर्मिती करणारी, शाश्वत व सक्षम अशी बांधकाम निर्मिती करणे शक्य होईल. तसेच शहरांमधील जुनी ऐतिहासिक बांधकामे व नवी बांधकामे यांचा सुयोग्य मेळ घालता येईल.

डॉ. मोहन श्रीवर्धेनांनी बीजभाषणातून बांधकाम क्षेत्र हे मानवकेंद्री असून यापुढे होणारी शहरी बांधकामे ही पर्यायाने मानवी आरोग्य व कल्याणाचा अधिक विचार करणारी राहतील, असे सांगितले. ते म्हणाले की, त्यातून समाज, संस्कृती, अर्थकारण, पर्यावरणरक्षण या मार्गानेच विकास शक्य होईल. स्थानिक संस्कृती व इतिहासाचा नाश न करता त्याला पूरक शहरी बांधकामे व्हायला हवीत. बांधकाम धोरणात कुशल व व्यावसायिक मनुष्यबळ घडवण्याची क्षमता ही शैक्षणिक संस्था व बांधकाम क्षेत्राने वाढवली पाहिजे. त्यातूनच मानवी गरजा व त्यांचे दीर्घकालीन नियोजन व त्याची अंमलबजावणी शक्य होईल.

प्रा. जयश्री देशपांडे म्हणाल्या की, बांधकाम क्षेत्राचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मानवी समाजजीवनावर पडत असून विविध समाजघटक हे दिवसेंदिवस स्वत:च्या कोषात वावरत आहेत. बांधकामातून सर्व पातळ्यांवरील मानवी संबंध जोडताना व निकोप करताना भौतिक भिंती पाडून सार्वजीनक जागांचा वापर मानवी सुसंवादासाठी करता येईल. यातून शहरातील, इमारती, झोपडपट्ट्या, वाहतूक कोंडीचे प्रश्न आणि वाढत जाणारे प्रदूषण यावर एकात्म तोडगा काढणे शक्य होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments