Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedउर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा सांगीतिक कार्यक्रम शनिवारी (दि.८) भक्तिसुधा फाऊंडेशनच्या...

उर्जा’ : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा सांगीतिक कार्यक्रम शनिवारी (दि.८) भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजन ; कला रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

पुणे : भारतीय संस्कृतीतील महान स्त्रियांचे कार्य व चरित्र भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशींद्वारे समाजासमोर आणण्यासाठी भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘उर्जा’ : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा सांगीतिक कार्यक्रम एम.ई.एस. ऑडिटोरियम, बाल शिक्षण मंदिर, कोथरूड येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा व गायिका भाग्यश्री केसकर यांनी दिली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री निर्मला गोगटे व खासदार डॉ. मेधा कुलकर्णी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘ऊर्जा – सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा’ या कार्यक्रमांतर्गत देवी सीतामाता, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी – यमुनाबाई सावरकर अशा महान व्यक्तिमत्वांकडून मिळणाऱ्या त्याग, तपस्या, भक्ती, शौर्य, मातृत्व, शक्ती अशा विविध तेजस्वी गुणांमधून मिळणारी ‘ऊर्जा’ या कार्यक्रमातून शास्त्रीय बंदिशींच्या द्वारे अनुभवायला मिळणार आहे. तसेच भारतमातेवरील विशेष बंदिश या कार्यक्रमात सादर केली जाणार आहे

सर्व महिला कलाकारांकडून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या बंदिशींची रचना संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या तिसऱ्या पिढीतील सुप्रसिद्ध गायिका पल्लवी पोटे, मृणाल भिडे, प्राजक्ता मराठे व श्रुती विश्वकर्मा-मराठे यांनी केली असून त्या स्वत:हे सादरीकरण करणार आहेत. तर तबल्याची साथ सावनी तळवलकर व हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी करणार आहेत. या राष्ट्रीय विचारांच्या संकल्पनेला सुप्रसिद्ध कीर्तनकार मानसी बडवे सूत्रबद्ध पद्धतीने मांडणार आहेत.

भाग्यश्री केसकर म्हणाल्या, आपल्या भारतभूमीतील अनेक आदर्श स्त्रिया आपल्या कायार्तून समाजाला, देशाला अक्षय ऊर्जा व प्रेरणा देत असतात.शास्त्रीय संगीताच्या परंपरेत जर या स्त्रियांचे चरित्र व कार्य आले व त्यांचे गुणगान गाता आले तर हे चरित्र पुढील पिढ्यांपर्यंतचिरकाल राहील, म्हणून या बंदिशी निर्मित केल्या आहेत. हा कार्यक्रम कला रसिकांसाठी विनामूल्य खुला असून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments