Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात चार...

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

पुणे, दि. 10 : विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.

यावेळी अपर आयुक्त उपायुक्त समीक्षा चंद्राकर तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात येते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या प्रलंबित दोन व नव्याने दाखल झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे जिल्ह्यातील तीन, कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. पुनर्वसन प्लॉटचा ताबा मिळण्याबाबत, पावसाळी नाला बांधकाम नकाशात न दर्शविल्यामुळे व साईड मार्जिनमध्ये येत असल्यामुळे बांधकाम परवानगीस स्थगिती देण्याबाबत, ट्रक चोरी प्रकरणी कार्यवाही होण्याबाबत आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments