Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedवीरेंद्र किराड यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान श्री स्वामी समर्थ...

वीरेंद्र किराड यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट पालखी सोहळा

पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी सोहळ्यात यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट पुणे चे संस्थापक अध्यक्ष स्वामीभक्त वीरेंद्र किराड यांना प्रदान करण्यात आला.

 

काँग्रेस भवन येथे आयोजित पालखी सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला. महोत्सवाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यावेळी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष आहे. शाल, श्रीफळ, महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्काराचे यंदा ९ वे वर्ष आहे.

 

पुरस्कार सोहळ्यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती झाली. उत्सवात सर्व दिवस ‘रक्तदान महायज्ञ’ हा उपक्रम राबविण्यात आला.

 

डॉ. पराग काळकर म्हणाले, पुण्याला मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. पुण्यात साजरे होणारे विविध धार्मिक उत्सव म्हणजे पुण्याचा आनंद सोहळा आहे. भक्ती सोहळ्याची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. भगवंताची भक्ती केल्याने भक्ताला सुखाची अनुभूती मिळते.

 

आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

 

पालखी सोहळ्यात तुकाराम दैठणकर आणि हर्षद कुलकर्णी यांचा ‘स्वामी भक्ती गीते’ कार्यक्रम, ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था ऑर्केस्ट्रा साई सातसूर परिवार सांस्कृतिक मंच यांचा ‘साई सातसुर’ कार्यक्रम, मुकुंद बादरायणी यांचा ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम तर योगेश तपस्वी आ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments