पुणे दि १८ –
शिव छत्रपतींच्या ‘रयतेच्या राज्याची संकल्पना’ ऊदधोषित करणारी ‘शिवमुद्रेची प्रतिमा’ महाराष्ट्राच्या राजमुद्रेत व भारतीय संविघानात प्रतिबिंबित होत असुनही,
शिवेंद्रराजेंना ते दिसू नये, ही दुर्दैवी बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांना उत्तर देतांना केली.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेस’चेच योगदान असल्याने, मुंबई सह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येतांना, छत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना संविधानात उतरवण्याचे कार्य डॅा आंबेडकरांच्या रुपाने काँग्रेसने केले याचे स्मरण द्यावे काय.. असा सवाल ही केला.
ते पुढे म्हणाले की, रयतेप्रती, जनतेच्या नित्य जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देण्याचे कारस्थान भाजप सत्ताधारी करत असून, आता सातारा गादी चे वंशंजांचाही दुरुपयोग भाजप करत आहे.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्या प्रती सत्य-निष्ठेचे रक्षण करणारे होते हे प्रथम समजले पाहिजे.
काँग्रेस काळात शिव छत्रपतींच्या नांवे व महाराजांच्या प्रती निष्ठा समर्पित करून उभारलेल्या संस्था, विद्यापीठे, रेल्वे स्थानक, इन्फ्रास्ट्रक्चर, विमानतळे इ ची मालीका त्यांनी सांगितली.
महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार (६९-७०) सालीच काँग्रेस ने सुरु केला.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम पुणे (बालेवाडी), कोल्हापूर, रत्नागिरी .. इ ठीकाणी काँग्रेस सत्ताकाळात सुरु झाली
विक्टोरीया टर्मिनस (व्हीटी) चे नामकरण (सीएसटी) “छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस” असे तत्कालीन रेल्वेराज्य मंत्री सुरेश कलमाडी काँग्रेस सरकार काळात झाले.
राज्याची राजधानी झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाचे’ नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे काँग्रेस काळात झाले, परंतू आता मात्र त्याचे नांव अडानी एअरपोर्ट करण्याचे प्रयत्न शिवेंद्रराजे ना दिसत नाही काय(?) असा उपहासात्मक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला…!
संसदेत भाजप खासदाराची मजल ‘पुर्व जन्मी’ नरेंद्र मोदी हे शिवाजी महाराज होते.. इथपर्यंत बोलण्या पर्यत जाते.. हे शिवेंद्र राजे भोसले यांना मान्य आहे काय..?
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर’ होण्यासाठी १९ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्याचे महतपुर्ण कार्य काँग्रेस राज्य सरकार काळात झाले..!
महाराष्ट्रात ‘शिवाजी विद्यापीठाची’ स्थापना ही काँग्रेस काळात झाली तसेच प्रतापगढ, शिवनेरी – जुन्नर परीसर ते बालेवाडी, पुणे शहरातील शिव छत्रपतींची स्मारके व पुतळे हे काँग्रेस सत्तेच्या काळातच उभारले किमान याचे तरी स्मरण हवे. कोल्हापुर मघील शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहूलजी गांधी यांचे हस्ते नुकतेच झाले.
तत्कालीन पंतप्रघान पं नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना वर्षात ‘प्रताप गडा’ वरील अनावरण केलेला अश्वारुढ पुतळा वर्षा नु वर्षे ‘उन वारा पाऊस’ अंगावर घेत दिमाखात ऊभी आहेत. मात्र, पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या सिंधूदुर्ग येथील भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या पुतळ्या प्रमाणे घारातिर्थी झाला नाही, ईकडे देखील शिवेंद्र राजे लक्ष देतील काय..?
ते पुढे म्हणाले की, जनतेचे कोट्यावघी रुपये खर्ची पाडून व जाहीरातबाजी करून ‘अरबी समुद्रात’ पंतप्रघान मोदीं च्या हस्ते भुमिपुजन होऊन, वर दशकभराचा कालावधी ओलांडून देखील, श्रीमंत संभाजी राजे यांनी बोटी द्वारे व दुर्बिण लाऊन, मुंबई समुद्रात केलेल्या पाहणीत नजरेस ही पडला नाही याचे कारण काय व ही भाजप सरकारने केलेली महाराजांची थट्टा नाही काय असे ही काँग्रेसने म्हंटले आहे.
महाराष्ट्राची दैवते श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे शौर्य – पराक्रमा विषयी, कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री, राज्यपाल कोश्यारींसह वि दा सावरकर, मा स गोलवळकरां पासून सोलापुरकर, कोरटकर यांनी जी विघाने केलीत ती शिवेंद्र राजेंच्या गीनतीत नाहीत काय (?) वा जाणीव पुर्वक दुर्लक्षीत करू इच्छीतात (?) असा सवाल काँग्रेस ने केला..
शिवाजी महाराजांचा रयते प्रती, बळीराजा प्रती, महीला भगीनींच्या सुरक्षे प्रतीचा वसा खऱ्या अर्थाने कोणी अंमलात आणला असेल तर काँग्रेस पक्षानेच आणल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे..!
———————————————-///


