• वेव्हलाइट प्लस ही पूर्णपणे टेलर केलेली रिफ्रॅक्टिव्ह उपचारपद्धती आहे. त्यात प्रत्येक रूग्णाच्या विशेष ऑप्टिकल यंत्रणेचा विचार केला जातो. 1,2
• साइटमॅप निदान उपकरणाच्या मदतीने संपूर्ण ऑप्टिकल यंत्रणेचे मोजमाप घेते जेणेकरून प्रत्येक रूग्णासाठी उपयुक्त एक डिजिटल आय ट्विन तयार करता येईल.1,3
• शस्त्रक्रियेपूर्वी रूग्णाच्या डिजिटल डोळ्यासाठी वैयक्तिकीकृत उपचार योजना तयार करते.1-4
• खऱ्या जगातील माहितीतून असे दिसते की हे तंत्रज्ञान रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. ९८ टक्क्यांपेक्षा जास्त मायोपिक रूग्णांना किमान २०/२० नजर मिळाली,5* ८९% रूग्णांना २०/१६ किंवा त्यापेक्षा चांगली नजर मिळाली.1,3-5∞*
नवी दिल्ली, ३ एप्रिल २०२५– लोकांना उत्तम नजर मिळण्यास मदत करण्यासाठी समर्पित असलेल्या आणि नेत्रसेवेच्या क्षेत्रात जागतिक आघाडीवर असलेल्या अल्कॉनने आज वेव्हलाइट प्लस आणण्याची घोषणा केली. हा भारतातील पहिला पूर्णपणे वैयक्तिकृत लेसर-असिस्टेड इन सिटू केराटोमाइलियसिस (लेसिक) उपचार आहे. अल्कॉन रिफ्रॅक्टिव्ह व्हिजन सुधारणेच्या क्षेत्रात आघाडीवर आहे आणि त्यांच्या पुढील पिढीचे वेव्हलाइट प्लस तंत्रज्ञान रिफ्रॅक्टिव्ह व्हिजन शस्त्रक्रियेतील अचूकता आणखीवाढवते. त्यात अद्वितीय वैयक्तिकीकरण असल्यामुळे रूग्णांना किमान जोखीम आणि उत्कृष्ट अंदाजासह उत्तम परिणाम मिळतात. १,३,४∞ वेव्हलाइट प्लसला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीजीएससीओ) इंडियाची मान्यता, सीई मानांकन आणि अलीकडेच यूएस अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) ची मान्यता मिळाली आहे. १२
मायोपिया ही रिफ्रॅक्टिव्ह व्हिजनमधली सर्वांत सामान्य त्रुटी आहे आणि जागतिक स्तरावर लोकसंख्येच्या 30% पेक्षा जास्त लोक मायोपियाने ग्रस्त आहेत. ही संख्या 2050 पर्यंत जवळजवळ 50% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.6 भारतात वाढलेला स्क्रीन टाइम, कमी व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यासारख्या घटकांमुळे रिफ्रॅक्टिव्ह व्हिजनच्या केसेसे सतत वाढत आहेत.9-11 अल्कॉनचे नवीन रिफ्रॅक्टिव्ह तंत्रज्ञान ही एक प्रगत लेसिक उपाययोजना आहे. ती अत्यंत वैयक्तिकृत आणि अत्याधुनिक दृष्टी सुधारणांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करते.6
“आजची पिढी लहानपणापासूनच विविध आवडी आणि महत्त्वाकांक्षी आकांक्षांनी प्रेरित होऊन सक्रिय जीवनशैली स्वीकारते. परंतु चष्मा घालणे कधीकधी त्यांच्या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात अडथळा ठरू शकते,” असे अल्कॉन इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख अमर व्यास म्हणाले. “वेव्हलाइट प्लस ही वैयक्तिकृत दृष्टी सुधारणेतील एक प्रगती आहे. ती चष्मा वापरून मर्यादा आणण्यास नकार देणाऱ्या तरुण पिढीसाठी केलेले आहे. भारतात दृष्टी सुधारणेमध्ये अल्कॉनचे नवीन उपक्रम आणण्याची आम्हाला उत्सुकता आहे. डोळ्यांच्या लेसर शस्त्रक्रियेबाबत अल्कॉनच्या दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये हे अनावरण एक नवीन अध्यायदेखील आहे. आम्ही भारतातील डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाच्या संपूर्ण डोळ्याच्या प्रणालीनुसार तयार केलेली पूर्णपणे वैयक्तिकृत प्रक्रिया वापरण्यासाठी सक्षम करत आहोत.1-2”
पारंपारिक लेसिक उपचारांच्या तुलनेत वेव्हलाइट प्लस रे ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल आय ट्विन तयार करते. हे प्रत्येक रुग्णाच्या डोळ्याचे एक अत्यंत तपशीलवार ३डी मॉडेल आहे. 3,4 हे डॉक्टरांना शस्त्रक्रियेपूर्वी पूर्णपणे तपासणी करणे, उपचार योजना ठरवणे आणि सुयोग्य उपचार वापरणे शक्य करते. अत्युच्च पातळीची अचूकता आणि वैयक्तिकृत दृष्टी सुधारणा यातून साध्य होते. 1-4 केवळ कॉर्नियाचा विचार न करता संपूर्ण ऑप्टिकल सिस्टमचा विचार करून ही यंत्रणा शस्त्रक्रियेची अचूकता, सुरक्षितता आणि दृश्य परिणाम वाढवते. त्यामुळे रुग्णांना 20/20 पेक्षा जास्त दृष्टी मिळवणे शक्य होते.4-5∞ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या https://www.myalcon.com/in/lasik/
वेव्हलाइट प्लस लेसिक केलेल्या २०० रुग्णांच्या प्रत्यक्ष क्लिनिकल पुराव्यांमधून असे आढळून आले की या तंत्रज्ञानाने नजर तीक्ष्ण झाली. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह उपचारांचा फायदाही वाढला. हे अल्कॉनच्या क्लिनिकल अभ्यासाशी सुसंगत आहे. डॉ. चंद्रा बाला यांच्या अभ्यासातील प्रमुख निकालांमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:5*
• १०० टक्के मायोपिक डोळ्यांमधून ३ महिन्यांत अनकरेक्टेड व्हिज्युअल एक्युटी (यूडीव्हीए) २०/२० अशी अचूक झाली. 5*
• ८९% मायोपिक डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर २०/१६ यूडीव्हीए आला आणि ५०% डोळ्यांचा ३ महिन्यांत २०/१२.५ आला. ५*
• ९८% डोळ्यांच्या शस्त्रक्रियेपूर्वीच्या सुधारित अंतराच्या दृश्य तीक्ष्णता (सीडीव्हीए) च्या पहिल्या टप्प्यात ३ महिन्यांत शस्त्रक्रियेनंतर यूडीव्हीए मिळवला ५*
• ९४% डोळ्यांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वीच्या सीडीव्हीएपेक्षा ३ महिन्यांत समान किंवा चांगले सीडीव्हीए आले. ५*
लेसिक भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यापासून हे तंत्रज्ञान केराटोमेट्री आणि रिफ्रॅक्टिव्ह व्हिजनपासून कॉर्नियल टोमोग्राफी आणि वेव्हफ्रंट अबेरोमेट्रीपर्यंत सतत प्रगती करत आहे. ७ वेव्हलाइट प्लस या प्रगतीवर आधारित आहे. शस्त्रक्रियेपूर्वी उपचार प्रक्रिया ठऱवणे आणि निर्णय घेण्यासाठी साइटमॅप डायग्नोस्टिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने रुग्णांना उत्कृष्ट आणि स्पष्ट नजर मिळते. ३
रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि अल्कॉनच्या रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रियेतील नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना २०/२० दृष्टी आणि त्याहीपेक्षा जास्त चष्म्यापासून मुक्त राहण्यासाठी मदत होऊ शकते. १, २, ४. ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. अधिक माहितीसाठी कृपया वैद्यकीय व्यावसायिकांचा सल्ला घ्या.
वेव्हलाइट प्लस सर्वप्रथम चीनमध्ये आणण्यात आले. आता ते युरोप, आशियातील अनेक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे आणि अलीकडेच अमेरिकेतही मान्यता मिळाली आहे.
लक्षवेध: दुष्परिणाम, इशारे आणि खबरदारीच्या संपूर्ण यादीसाठी वेव्हलाइट प्लस ऑपरेटर मॅन्युअल पाहा.


