फ्लेक्स कार्यालयीन जागांनी शहरातील एकूण कार्यालयीन व्यवहारांमध्ये ४३ टक्क्यांचे योगदान दिले
· भारित सरासरी निवासी किमती २०१८ च्या पहिल्या तिमाहीपासून ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च आहेत
· २० दशलक्ष ते ५० दशलक्ष रूपयांच्या तिकिट आकारामधील निवासी विक्रीमध्ये वार्षिक ७८ टक्के वाढीची नोंद झाली
पुणे, एप्रिल ३, २०२५: नाइट फ्रँक इंडियाने आपला नवीन अहवाल इंडिया रिअल इस्टेट: कार्यालयीन व निवासी बाजारपेठ (जानेवारी – मार्च २०२५) क्यू१ २०२५ मधून निदर्शनास आणले आहे की, पुण्यातील कार्यालयीन बाजारपेठेने २०२५ च्या पहिल्या तिमाहीत विक्रमी वाढ संपादित केली आहे. जागा भाडेतत्त्वावर देणे ३.७ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत (दशलक्ष चौ. फूट) पोहोचले, ज्यामध्ये वार्षिक ९१ टक्क्यांची वाढ झाली आणि आतापर्यंतचे सर्वोच्च तिमाही व्यवहार ठरले. नवीन बांधकामाचे प्रमाण ३.५ दशलक्ष चौरस फूट होते, जे आठ प्रमुख शहरांमध्ये[1] सर्वोच्च होते आणि २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील १.८ दशलक्ष चौरस फूटच्या तुलनेत मोठी वाढ झाली. कार्यालयीन भाड्यामध्ये देखील वार्षिक ३ टक्क्यांची वाढ झाली, जेथे सरासरी व्यवहार करण्यात आलेला भाडेदर प्रतिमहिना प्रतिचौरस फूट ७७ रूपये आहे.
पुणे कार्यालयीन बाजारपेठ सारांश (२०२५ ची पहिली तिमाही)
Office Transactions
Completions
(Mn Sq Ft)
(Mn Sq Ft)
City
Q1 2025
Q1 2024
% Change YoY
City
Q1 2025
Q1 2024
% Change YoY
Pune
3.7
1.9
91%
Pune
3.5
1.8
99%
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
अंतिम-वापरकर्ता श्रेणी
पुण्यातील व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये २०२५ च्या पहिल्या तिमाहीत जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रबळ हालचाली दिसण्यात आल्या, जेथे स्थिर कार्यालयीन जागांची मागणी सर्वाधिक होती. या श्रेणीने एकूण व्यवहारांमध्ये ४३ टक्क्यांचे योगदान दिले, जेथे १.६ दशलक्ष चौरस फूट जागेचे व्यवहार करण्यात आले, ज्यामध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील १.१५ दशलक्ष चौरस फूट जागेच्या तुलनेत वार्षिक ४० टक्क्यांची वाढ दिसण्यात आली. यानंतर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी)चा क्रमांक होता, जेथे १.१ दशलक्ष चौरस फूट जागेचे व्यवहार करण्यात आले, ज्यामध्ये गेल्या वर्षी याच कालावधीत नोंद करण्यात आलेल्या ०.३ दशलक्ष चौरस फूट जागेच्या तुलनेत २६६ टक्क्यांची मोठी वाढ झाली.
End-User Licensee/Buyer
Flex
GCC
India Facing Business
Third Party IT
Total
Area transacted in mn sq ft
1.6
1.1
0.6
0.4
3.7
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
निवासी बाजारपेठ अपडेट: जानेवारी – मार्च २०२५
पुण्यातील निवासी बाजारपेठने आपली विकास गती कायम राखली, जेथे २०२५ च्या पहिल्या तिमाहीत १४,२३१ युनिट्सच्या विक्रीची नोंद केली, ज्यामध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील ११,८३२ युनिट्सच्या तुलनेत वार्षिक २० टक्क्यांची वाढ झाली. नवीन लाँचमध्ये देखील मोठी वाढ झाली, जे वार्षिक २२ टक्क्यांच्या वाढीसह १६,२३१ युनिट्सपर्यंत पोहोचले. तसेच, शहरातील भारित सरासरी निवासी किंमत आतापर्यंतच्या सर्वोच्च प्रतिचौरस फूट ४,८२५ रूपयांपर्यंत पोहोचली, ज्यामध्ये वार्षिक ६ टक्क्यांची वाढ झाली.
Sales
Launches
City
Q1 2025
Q1 2024
YoY % Change
City
Q1 2025
Q1 2024
YoY % Change
Pune
14,231
11,832
20%
Pune
16,231
13,293
22%
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
शहरातील प्रीमियम हाऊसिंग श्रेणीमध्ये देखील उल्लेखनीय वाढ दिसण्यात आली, जेथे १०० दशलक्ष ते २०० दशलक्ष रूपये (१० कोटी ते २० कोटी रूपये) श्रेणीमधील विक्रीमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील २ युनिट्सच्या तुलनेत १८० टक्क्यांच्या वाढीसह ७ युनिट्सपर्यंत वाढ झाली. २० दशलक्ष ते ५० दशलक्ष रूपये (२ कोटी ते ५ कोटी रूपये) श्रेणीमधील घरांच्या किमतींनी दुसऱ्या सर्वोच्च वाढीची नोंद केली, जे ३७६ युनिट्सच्या तुलनेत वार्षिक ७८ टक्क्यांच्या वाढीसह ६७० युनिट्सपर्यंत पोहोचले. दरम्यान मध्यम रेंजची श्रेणी (५ दशलक्ष ते १० दशलक्ष रूपये) सर्वात सक्रिय राहिली, जिने एकूण निवासी विक्रींमध्ये ४७ टक्क्यांचे योगदान दिले आणि तिमाहीदरम्यान ६,६९० युनिट्सची विक्री झाली.
विक्रीची तिकिट आकारानुसार विभागणी
Ticket Size Categories
<5 mn
5-10 mn
10-20mn
20-50 mn
50-100 mn
100-200 mn
200-500 mn
Total
Q1 2025
4,054
6,690
2,785
670
24
7
1
14,231
YoY % change
-2%
24%
48%
78%
57%
180%
–
20%
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च
विक्री न झालेल्या सदनिकांच्या यादीमध्ये वार्षिक १९ टक्क्यांची वाढ झाली असताना देखील पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेने चांगली वाटचाल दर्शवली. क्वॉर्टर्स टू सेल (क्यूटीएस) मेट्रिक ३.७ क्वॉर्टर्सपर्यंत राहिले, ज्यामधून ग्राहकांची रूची आणि शाश्वत मागणी दिसून येते.
नाइट फ्रँक इंडियाचे राष्ट्रीय संचालक व पुण्यातील ब्रांच हेड पी. विलास म्हणाले, ”पुण्यातील कार्यालयीन बाजारपेठ ऑक्यूपायरच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देत सतत विकसित होत आहे. स्थिर वर्कस्पेसेस्, हायब्रिड मॉडेल्स आणि शाश्वत सोल्यूशन्ससाठी वाढत्या प्राधान्यक्रमामुळे शहर भविष्यासाठी उत्तमरित्या सुसज्ज आहे. निवासी संदर्भात मेट्रो कॉरिडर सारख्या पायाभूत सुविधा सुधारणा आणि विस्तारित रस्ते नेटवर्क्समुळे कनेक्टिव्हीटीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांचे उदयास येत असलेल्या नजीकच्या बाजारपेठांकडे लक्ष वेधून घेतले जात आहे. हे घटक भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रामधील प्रमुख कंपनी म्हणून पुण्याचा दर्जा अधिक दृढ करत आहेत.”


