पुणे, २२ एप्रिल २०२५: सुरक्षित राइडिंग सवयींना चालना देण्याप्रती आपल्या देशव्यापी प्रयत्नांशी बांधील राहत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज पुणे, महाराष्ट्र येथील आर्मी पब्लिक स्कूल-दिघी येथे रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचे आयोजन केले. या उपक्रमाने जवळपास २४०० विद्यार्थी व कर्मचारीवर्गामध्ये जनजागृती केली, ज्यामागे रस्त्यावरील तरूण राइडर्सना रस्ता सुरक्षा माहिती अधिक उपलब्ध, व्यावहारिक व ज्ञात करून देण्याचा मनसुबा होता.
तरूणांशी संलग्न झाल्याने मोठा अनुकूल परिणाम होतो, जेथे कुटुंबातील सदस्य व समुदायांवर सुरक्षित राइडिंग पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रभाव पडतो. ही मोहिम तरूणांमध्ये सर्वोत्तम व सर्वसमावेशक माहिती स्वरूपांच्या माध्यमातून दैनंदिन वाहतूक स्थितींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. धोका ओळखण्याचे प्रशिक्षण, क्विझेस्, गेम्स, हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती अशा अॅक्टिव्हिटीजनी सहभागींना रस्त्यावर त्यांच्या जबाबदारीबाबत गांभीर्याने विचार करण्यास, तसेच रस्ता सुरक्षेचे प्रमुख पैलू जाणून घेत वास्तविक जीवनात त्यांचा अवलंब करण्यास प्रेरित केले.
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये टीमने सुलभ समन्वयासाठी सक्रिय पाठिंबा दिला, ज्यामधून सर्व सत्रांसाठी सहभागींच्या अर्थपूर्ण सहभागाची खात्री मिळाली. विद्यार्थी व कर्मचारीवर्गाची ऊर्जा आणि उत्साहाने या उपक्रमाच्या प्रभावाला दृढ केले, ज्यामुळे व्यापक समुदायापर्यंत जनजागृती करण्यास मदत झाली.
एचएमएसआय प्रत्यक्ष शाळा व कॉलेजमधील तरूणांशी कनेक्ट होत भारतभरात आपल्या रस्ता सुरक्षा प्रयत्नांना वाढवत आहे. पुण्यातील मोहिम देशभरात आयोजित करण्यात आलेल्या अनेक मोहिमांपैकी एक आहे, जेथे कंपनी सुरक्षित राइडिंग वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते, अधिकाधिक व्यक्तींना रस्ता सुरक्षा उपायांबाबत आवश्यक माहितीसह सक्षम करत आहे आणि रस्ता सुरक्षेला सर्वांची जबाबदारी मानत आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची रस्ता सुरक्षेप्रती सीएसआर कटिबद्धता:
२०२१ मध्ये, होंडाने वर्ष २०५० साठी आपल्या जागतिक दृष्टिकोन विधानाची घोषणा केली, जेथे कंपनी होंडा मोटरसायकल्स व ऑटोमोबाइल्ससहित शून्य वाहतूक अपघातासाठी प्रयत्न करेल. भारतात, एचएमएसआय या दृष्टिकोनाशी, तसेच २०३० मध्ये अपघातांचे प्रमाण निम्मे कमी करण्याच्या भारत सरकारच्या निर्देशाशी बांधील राहत काम करत आहे.
हे ध्येय संपादित करण्यामधील महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे वर्ष २०३० पर्यंत मुलांमध्ये रस्ता सुरक्षिततेप्रती सकारात्मक मानसिकता विकसित करणे आणि त्यानंतर देखील त्यांना जागरूक करत राहणे. शाळा व महाविद्यालयांमध्ये तरूणांना रस्ता सुरक्षिततेबाबत जागरुक देखील करेल आणि त्यांना रोड सेफ्टी अॅम्बेसेडर्स बनवेल. हा उपक्रम भावी पिढ्यांना जबाबदार बनण्यास आणि सुरक्षित समाजाप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सक्षम करतो.
एचएमएसआयची समाजाला अपेक्षित कंपनी असण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि समाजाच्या सर्व स्तरांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यावर दृढ लक्ष केंद्रित करत आहे, तसेच अद्वितीय संकल्पना शालेय मुलांपासून कॉर्पारेट आणि मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत प्रत्येक विभागाच्या गरजांची पूर्तता करत आहेत.
एचएमएसआयचे कुशल सेफ्टी इन्स्ट्रक्टर्स भारतभरातील आमचे १० अवलंबलेले ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क्स (टीटीपी) आणि ६ सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटर्स (एसडीईसी)मध्ये दररोज उपक्रम राबवत समाजाच्या प्रत्येक भागामध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत माहिती देतात. हा उपक्रम ९७ लाखांहून अधिक भारतीयांपर्यंत पोहोचला आहे. एचएमएसआयच्या राष्ट्रीय सुरक्षा जागरूकता उपक्रमाने अध्ययन धमाल व सायन्टिफिक केले.
वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन करण्यात आलेले लर्निंग मॉड्यूल: होंडाच्या कुशल इन्स्ट्रक्टर्सनी रस्त्यावरील चिन्हे व मार्किंग्ज, ड्रायव्हरचे रस्त्यावरील कर्तव्य, राइडिंग गिअर व पवित्रा स्पष्टीकरण आणि सुरक्षित राइडिंग पद्धतींवरील सैद्धांतिक सत्रांसह पाया स्थापित केला.
व्यावहारिक अध्ययन: सर्वांना वास्तविक राइडिंगपूर्वी रस्त्यावरील १०० हून अधिक संभाव्य धोक्यांचा अनुभव देण्यासाठी होंडाच्या व्हर्च्युअल राइडिंग सिम्युलेटरवरील विशेष प्रशिक्षण अॅक्टिव्हिटीची अंमलबजावणी करण्यात आली.
परस्पदसंवादात्मक सत्र: सहभागींना धोका ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, जे किकेन योसोकू ट्रेनिंग (केवायटी) म्हणून ओळखले जाते, जे राइडर/ड्रायव्हरची धोक्याप्रती संवेदनशीलता वाढवण्यामध्ये मदत करते आणि रस्त्यांवर सुरक्षित ड्रायव्हिंग वर्तणूकीची खात्री देते.
विद्यमान ड्रायव्हर्सनी राइडिंग कौशल्ये आत्मसात केली: विद्यार्थी आणि विद्यमान राइडर्स असलेले शालेय कर्मचारीवर्ग यांनी संथ गतीने राइड करण्याच्या अॅक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, तसेच अरूंद मार्गांमधून राइड करत त्यांच्या राइडिंग कौशल्यांची चाचणी घेतली आणि त्यामध्ये निपुणता मिळवली.
एचएमएसआयने नुकतेच आपला नाविन्यपूर्ण डिजिटल रस्ता सुरक्षा अध्ययन प्लॅटफॉर्म ई-गुरूकुल लाँच केला. हा ई-गुरूकुल प्लॅटफॉर्म ५ वर्ष ते १८ वर्षांपर्यंतच्या तीन विशिष्ट वयोगटांसाठी डिझाइन करण्यात आलेले प्रशिक्षण मॉड्यूल्स देतो, ज्यामधून रस्ता सुरक्षेप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोनाची खात्री मिळते. सध्या, मॉड्यूल्स कन्नड, मल्याळम, हिंदी, तेलुगू, तमिळ व इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामधून सर्वसमावेशकता व प्रादेशिक प्रासंगिकतेची खात्री मिळते. ई-गुरूकुल egurukul.honda.hmsi.in येथे उपलब्ध होऊ शकते. प्लॅटफॉर्म लाइव्ह स्ट्रिमिंग किंवा डाऊनलोडिंग आणि विविध प्रांतांमध्ये उपलब्धतेच्या खात्रीसाठी बहुभाषिक मॉड्यूल्स देतो. ई-गुरूकुलचे लाँच मुले, शिक्षक व डिलर्सना सुरक्षित रस्ता पद्धतींना प्राधान्य देण्यास सक्षम करण्याच्या एचएमएसआयच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. हा उपक्रम प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये राबवण्यात येईल, विविध वयोगटासाठी डिझाइन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा शिक्षणाला चालना देण्यात येईल. ही माहिती मिळवण्यास इच्छुक असलेली कोणतीही शाळा Safety.riding@honda.hmsi.in येथे संपर्क
साधू शकते.


