पुणे, ८ फेब्रुवारी २०२४ : लिक्सिल ग्रुपचा पुरस्कारप्राप्त सामाजिक व्यवसायाचा हिस्सा असलेल्या सॅटो तर्फे सॅटो टॉयलेट एक्सप्रेस – स्वच्छता का संदेश गांव गांव में उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ही व्हॅन-आधारित जनजागृती मोहीम भारतातील बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील ग्रामीण आणि निम-शहरी भागात शौचालय वापरण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार केली गेली आहे. सॅटो टॉयलेट एक्स्प्रेस ही केवळ मोहीम नाही; तर सुधारित स्वच्छता आणि स्वच्छता पद्धतींकडे वर्तणुकीत बदल घडवून आणण्याचा हा एक गतिमान आणि व्यापक प्रयत्न आहे. या व्हॅनने सुमारे 30 दिवसांत बिहारमधील 60 गावे आणि महाराष्ट्रातील 35 गावांमध्ये प्रत्येक समुदायामध्ये स्वच्छतेच्या सकारात्मक पद्धतींचा प्रचार करत जागरूकता निमार्ण केली आहे.
बिहार आणि महाराष्ट्रातील 95 खेड्यांमध्ये सॅटो टॉयलेट एक्स्प्रेस
RELATED ARTICLES


