Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedकायनेटिक ग्रीनकडून दुचाकी व्‍यवसायाचे अध्‍यक्ष म्‍हणून जयप्रदीप वासुदेवन यांची नियुक्‍ती

कायनेटिक ग्रीनकडून दुचाकी व्‍यवसायाचे अध्‍यक्ष म्‍हणून जयप्रदीप वासुदेवन यांची नियुक्‍ती

पुणे, ३ जून २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकी वाहनांच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीला त्‍यांच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी व्‍यवसायाचे अध्‍यक्ष म्‍हणून श्री. जयप्रदीप वासुदेवन यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा करताना आनंद होत आहे.

ऑटोमोबाइल उद्योगामध्‍ये २५ वर्षांहून अधिक काळाचा दांडगा अनुभव असलेले श्री. जयप्रदीप विविध ऑटोमोटिव्‍ह व भूमिकांमधील धोरणात्‍मक नेतृत्‍व, व्‍यवसाय विकास, कंपनीचा विकास आणि व्‍यावसायिक कार्यसंचालनांमध्‍ये कुशल आहेत.

उद्योगामध्‍ये ‘जेपी’ म्‍हणून प्रख्‍यात असलेले श्री. जयप्रदीप कायनेटिक ग्रीनसोबत महत्त्वाच्या वेळी करार करत आहेत, जेथे कंपनी आपला दुचाकी व्यवसाय आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. ते या वर्षाच्या अखेरीस लाँच होणाऱ्या तंत्रज्ञानाने युक्‍त हाय पॉवर इलेक्ट्रिक स्कूटरसह आगामी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेतील धोरणाचे नेतृत्व करतील, तर कायनेटिक ग्रीनच्या ई-लुना आणि त्यांच्या इतर दुचाकी उत्पादनांच्या विद्यमान श्रेणीचा विस्तार करतील.

जेपी आपल्‍या नेतृत्‍वाच्‍या माध्‍यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रँडची उपस्थिती वाढवण्‍यासोबत ग्राहक अनुभवामध्ये वाढ करतील आणि कायनेटिक ग्रीनच्या डीलरशिप नेटवर्कला अधिक मजबूत करतील.

टीममध्‍ये त्‍यांचे स्‍वागत करत कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, “आम्‍हाला आमच्‍या प्रवासाच्‍या या परिवर्तनात्‍मक टप्‍प्‍यामध्‍ये कायनेटिक ग्रीनसोबत जेपी सामील होण्‍याचा आनंद होत आहे; आम्‍ही आमचे नेतृत्‍व दृढ करत असताना त्‍यांचा व्‍यापक अनुभव, उद्योगाबाबत सखोल माहिती, ग्राहक-केंद्रित मानसिकता आणि उत्तम अंमलबजावणी या क्षमता बहुमूल्‍य ठरतील. जेपी आमच्‍या दुचाकी व्‍यवसायाला योग्‍य दिशा दाखवण्‍यासह आम्‍ही आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओची व्‍याप्‍ती व प्रभाव विस्‍तारित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आम्‍हाला भारतातील इलेक्ट्रिक वैयक्तिक गतीशीलता विभागामध्‍ये मार्केट लीडर ठरण्‍याचा विश्‍वास आहे.”

या नवीन पदाप्रती आपला आनंद व्‍यक्‍त करत श्री. जयप्रदीप म्‍हणाले, “मला कायनेटिक ग्रीनमध्‍ये सामील होण्‍याचा आणि त्‍यांच्‍या दुचाकी व्‍यवसायाचे नेतृत्‍व करण्‍याचा आनंद होत आहे. कायनेटिक ग्रीन ब्रँडचा प्रख्‍यात वारसा आहे आणि आजही भारतातील जनतेसाठी शाश्‍वत इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या वैविध्‍यपूर्ण श्रेणीच्‍या माध्‍यमातून जुडलेला आहे. मी ग्राहक केंद्रित्व, कार्यक्षम वितरण चॅनेल्‍स आणि ग्राहकांसाठी जागतिक दर्जाच्‍या उत्‍पादनांच्‍या माध्‍यमातून कंपनीच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी व्‍यवसायाच्‍या विकासाला चालना देईन, तसेच भारताला निव्‍वळ शून्‍य उत्‍सर्जन देश बनवण्‍याप्रती सकारात्‍मक योगदान देईन.”

जेपी यांनी १५ वर्षे रॉयल एनफील्डमध्‍ये काम केले, जेथे त्यांनी इंडिया बिझनेस हेड म्हणून कंपनीच्या वाढीच्या मार्गाला आकार देण्यात, देशव्यापी नेटवर्क विस्ताराला आणि नाविन्यपूर्ण रिटेल फॉरमॅट्सना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे विक्रीत लक्षणीय वाढ झाली आणि मार्केट शेअर वाढला. याआधी, त्यांनी हिंदुस्तान मोटर्स आणि टीएएफई येथे नेतृत्वाची भूमिका बजावली, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात भक्कम पाया तयार केला. नुकतेच, जेपी यांनी राप्टी या इलेक्ट्रिक मोटरसायकल स्टार्टअपमध्ये मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून काम केले, त्यांनी त्‍यांच्‍या धोरणात्मक प्रयत्‍नांद्वारे दुचाकी विभागात प्रीमियम कंपनी म्हणून ब्रँडला स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कायनेटिक ग्रीनमध्ये जेपी श्री. रितेश मंत्री (सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक) यांच्यासोबत सहयोगाने काम करतील, ज्‍यामुळे कंपनीची उपस्थिती धोरणात्मकरित्या वाढेल आणि शाश्‍वत गतिशीलता सोल्‍यूशन्‍समधील कंपनीच्‍या पुढील विकास अध्यायाला गती मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments