Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दैवत - ना. चंद्रकांत...

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दैवत – ना. चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रवादी विचारांची संघटना आहे. देश आणि हिंदुत्व यांच्या प्रत्येक प्रतिकाबद्दल संघाला आणि संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला नितांत आदर आणि अपार श्रद्धा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे संघासाठी दैवत आहेत. म्हणूनच संघाच्या प्रत्येक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असतेच. शिवाय संघाच्या प्रत्येक उत्सवात दोन सरसंघचालकांच्या म्हणजेच आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. हेडगेवार जी आणि परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेच्या मधोमध शिवरायांची प्रतिमा ठेऊन तिचे पूजन केले जाते. गेली १०० वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरु आहे, आणि अनंतापर्यंत सुरु राहील याची प्रत्येक स्वयंसेवकाला खात्री आहे. उबाठा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजयजी राऊत यांना सर्व विषयांचे सर्वाधिक आणि सर्वोत्तम ज्ञान असते, त्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. पण संघाच्या बाबतीत तसेच संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचे ज्ञान अगदीच कच्चे आहे. त्यांनी भारतातील संघाच्या कोणत्याही कार्यालयाला कधीही भेट द्यावी, त्यांचे संघ विषयक अज्ञान नक्की दूर होईल.

 

#RSS

#ChatrapatiShivajiMaharaj

 

https://x.com/chdadapatil/status/1964672746492772694?s=46&t=-cpW0JCB4jlQvtZdncO7LA

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments