पुणे,18 सप्टेंबर 2025 : साऊथ आफ्रिकन टूरिझम तर्फे कॉर्पोरेट थिंक टँकच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यक्रमांची मालिका हैदराबाद,चेन्नई,पुणे आणि कोलकाता येथे अनुक्रमे 19 सप्टेंबर,7 नोव्हेंबर,12 डिसेंबर 2025 आणि 30 जानेवारी 2026 रोजी होणार आहेत. एमआयसीई (मीटिंग्स,इंसेंटिव्हज्,कॉन्फरन्सेस व एक्झिबिशन्स) साठी एक प्रमुख स्थान म्हणून प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने कॉर्पोरेट थिंक टँक या कार्यक्रमांच्या मालिकेत उद्योगातील प्रमुख नेतृत्व एकत्र आणून व्यवसाय वाढीच्या संधी,प्रवासाबाबत बदलत्या मागण्या आणि एमआयसीईचे भविष्य याबाबत चर्चा केली जाईल.


