Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे निवेदन

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे निवेदन

पुणे -भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना एक निवेदन दिले आहे. दोन पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या ” समजपत्राबाबत हे पत्र दिले आहे. यात खर्डेकर यांनी नमूद केले आहे की

 

माझ्या इ मेल वर मला दोन मेल प्राप्त झाल्या. मला मी केलेल्या तक्रारीबाबत “समजपत्र” का पाठविण्यात आले आहे ते न “समजल्याने” हा पत्रप्रपंच.

1) पहिले समजपत्र दिनांक 9 सप्टेंबर रोजी प्राप्त झाले व त्यात माझ्या 11 मे च्या तक्रार अर्जाचा उल्लेख असून त्यावर 7 जुलै रोजी पुणे रेल्वे स्टेशन आवारात कारवाई केल्याचा उल्लेख आहे. ह्या कार्यतत्परतेबाबत मनःपूर्वक आभार व अभिनंदन. 💐 मात्र तेथील परिस्थिती अजून ही तशीच आहे व तेथे वाहतूक कोंडी नित्याचीच आहे हे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

2) दुसरे समजपत्र गणेशोत्सवा आधी “गणेश विसर्जन मिरवणुकीत ” होणाऱ्या गैरप्रकारांबाबत 3 ऑगस्ट रोजी मी आपल्याला एक पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मी दिलेली प्रत्येक तक्रार ही खरी ठरली.त्याबाबत माझं म्हणणं मांडण्यासाठी आज मला बोलावण्यात आल्याचा मेल काल प्राप्त झाला. मात्र नवरात्र उत्सवात व्यस्त असल्यामुळे आज तरी याबाबत म्हणणं मांडणे शक्य होणार नाही.

मात्र मी केलेल्या तक्रारीनुसार – ढोल पथकातील वादकांच्या संख्येवर नियंत्रण नसणे, मिरवणूक अनिर्बंध असणे आणि दीर्घकाळ लांबणे,ढोल वादकांकडून पत्रकारांना मारहाणीपर्यंत मजल जाणे, प्लाझ्मा चा मुक्त वापर, आवाजाची अमर्याद पातळी, सर्वसामान्यांना त्रास हे सर्व घडलेच…. त्यामुळे आता माझा जबाब घेण्यात काहीच हशील नसून आपण संबंधित पोलीस स्टेशन ला माझा अर्ज दप्तरी दाखल करण्यास सांगितल्यास योग्य होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments