Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताचा एरोस्पेस, ड्रोन आणि स्पेसटेक उद्योग 2033 पर्यंत 2,00,000+ अधिक नोकऱ्या निर्माण...

भारताचा एरोस्पेस, ड्रोन आणि स्पेसटेक उद्योग 2033 पर्यंत 2,00,000+ अधिक नोकऱ्या निर्माण करणार : अ‍ॅडेको इंडिया

भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सच्या वाढीच्या कक्षेत नेण्यासाठी सरकारी सुधारणा, जागतिक सहकार्य आणि स्टार्ट-अप नवोन्मेष सज्ज आहेत.

बेंगळुरू, 12 दिसंबर, 2025 – भारताची एरोस्पेस, ड्रोन आणि स्पेसटेक उद्योग अर्थव्यवस्था 2033 पर्यंत पाच पटीने वाढून 44 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे आणि याच प्रक्रियेत 200,000 हून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळे अभियंते, संशोधक, डेटा सायंटिस्ट आणि व्यावसायिकांसाठी संधींचे एक नवीन दालन खुले होईल. याव्यतिरिक्त, अंतराळ धोरण विश्लेषक, रोबोटिक्स इंजिनीअर्स, एव्हिओनिक्स तज्ज्ञ आणि जीएनसी (मार्गदर्शन, नेव्हिगेशन आणि नियंत्रण) तज्ज्ञ या नवीन काळातील भूमिका भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांसाठी महत्त्वपूर्ण म्हणून समोर येत आहेत. सरकारची ठाम आणि धाडसी पाऊले, खासगी क्षेत्राचा वाढत सहभाग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे हे क्षेत्र संशोधन-चलित क्षेत्रातून जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या पूर्ण उद्योगात वेगाने विकसित होत आहे.

 

गगनयान क्रूड मिशन, अ‍ॅक्झिओम-4 आयएसएस कार्यक्रमात भारताचा सहभाग आणि देशाच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाचा विकास यासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमुळे इस्रोपासून ते उदयोन्मुख अंतराळ तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सपर्यंतच्या यंत्रणेतील प्रतिभेला वाढती मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय अंतराळ अर्थव्यवस्था आज जागतिक बाजारपेठेत सुमारे 2% योगदान देत आहे. 2033 पर्यंत हे प्रमाण 44 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य सरकारने ठेवले आहे. ज्यामध्ये 11 अब्ज डॉलर्सची निर्यात समाविष्ट आहे, ज्यामुळे जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेच्या 7-8% हिश्शावर भारताचे नियंत्रण असेल. या विस्ताराच्या केंद्रस्थानी भारतीय अंतराळ धोरण 2023, 250+ अंतराळ स्टार्टअप्सचा आधार आणि नवोपक्रम तसेच खासगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देण्यासाठी IN-SPACE अंतर्गत 1,000 कोटी रुपयांचा व्हीसी फंड यासारख्या उल्लेखनीय सुधारणा आहेत.

 

“भारताचा एरोस्पेस, ड्रोन आणि स्पेसटेक उद्योग हा केवळ रॉकेट आणि उपग्रहाबद्दल नाही, तर भविष्यासाठी नवोन्मेष-चलित अर्थव्यवस्था आणि कार्यबल तयार करण्याबद्दल आहे. ठाम सरकारी दृष्टिकोन आणि एका उत्साही स्टार्टअप इकोसिस्टमसह, भारत जागतिक अंतराळ केंद्र बनण्यास सज्ज आहे. यामुळे अभियांत्रिकी, संशोधन, डेटा अशा व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिभेसाठी संधींची लाट निर्माण होईल. एअरोस्पेस आणि मोबिलिटी उद्योगांना पाठिंबा देण्याचा जागतिक पातळीवर अनुभव असलेली अ‍ॅडेको यासाठी मदत करण्यास तयार आहे. या वेगाने विस्तारत जाणाऱ्या क्षेत्रासाठी कौशल्य, पुनर्कौशल्य आणि नियुक्तीसाठी मदत करण्याची तिची पूर्णपणे तयारी आहे. बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे या शहरांमध्ये जास्तीत जास्त संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. यात एव्हिओनिक्स, क्रायोजेनिक्स, एटीडीसी (अ‍ॅटिट्यूड डिटरमिनेशन अँड कंट्रोल सिस्टीम्स), रिमोट सेन्सिंग स्पेशलिस्ट, स्पेस हॅबिटॅट इंजिनिअर यासारख्या प्रमुख जबाबदाऱ्यांसाठी तुलनात्मक तांत्रिक क्षेत्रांपेक्षा 20-30% प्रीमियम वेतन आहे,” असे अ‍ॅडेको इंडियाचे संचालक आणि जनरल स्टाफिंग प्रमुख दीपेश गुप्ता म्हणाले.

 

Regional spread of the talent

Role

Bangalore

Chennai

Pune

Mumbai

Delhi

Others

Payload Design

41%

16%

13%

11%

7%

12%

RF Communications

44%

18%

14%

5%

5%

14%

Systems Engineering

40%

13%

19%

10%

9%

9%

Propulsion

35%

16%

13%

14%

12%

10%

Structural Design

31%

18%

16%

15%

9%

11%

Cyrogenics

46%

15%

10%

13%

8%

8%

Remote Sensing

39%

14%

14%

13%

13%

7%

GIS Analytics

32%

20%

15%

16%

14%

13%

Program Managers

35%

19%

17%

13%

12%

4%

Space Policy Analyst

32%

20%

14%

14%

11%

9%

Robotics Engineer

33%

21%

14%

10%

12%

10%

Avionics Specialist

37%

13%

12%

10%

16%

12%

GNC Expert

34%

14%

10%

11%

15%

16%

 

 

 

तांत्रिक अभियांत्रिकी, वैज्ञानिक संशोधन, डिजिटल आणि डेटा-चलित कार्ये आणि व्यवस्थापकीय/व्यवसाय ऑपरेशन्स या चार व्यापक श्रेणींमध्ये भारताचा एरोस्पेस, ड्रोन आणि स्पेसटेक उद्योग संधी उपलब्ध करून देत आहे. या क्षेत्रातील प्राथमिक व्यावसायिकांना दरवर्षी 6-8 लाख, ज्यांना अनुभव आहे अशांना 16-19 लाख तर एव्हियोनिक्स, क्रायोजेनिक्स, रोबोटिक्स किंवा अवकाश धोरण क्षेत्रातील तज्ज्ञांना कौशल्य आणि अनुभवानुसार 25-30 लाख किंवा त्याहून अधिक वेतन मिळू शकते. जबाबदाऱ्या आणि वेतनातील हे वैविध्य या क्षेत्राची गतिमान वाढ आणि विशेष कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करते. बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली टियर 1, पुणे, अहमदाबाद टियर 2 तसेच टियर 3 शहरे अशा नोकऱ्यांना चालना देतील अशी अपेक्षा आहे. उद्योग वाढत असताना, वैविध्यावर भर असणे आणि या क्षेत्रातील बुद्धिमान भारतीयांना परत आणण्यासाठी उलट स्थलांतर सक्षम करणे, या प्रवासात महत्त्वाचे ठरेल.

 

“विविधता ही भारताच्या अंतराळ कार्यबलाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. WISE फेलोशिप, विज्ञान ज्योती कार्यक्रम, ISRO यंग सायंटिस्ट प्रोग्राम (YUVIKA) आणि समृद्ध योजना यासारख्या उपक्रमांमुळे आधीच मोठ्या प्रमाणात महिला तांत्रिक क्षेत्र, संशोधन आणि उद्योजकतेत प्रवेश करू शकत आहेत. खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्स देखील यात सहभागी होत असल्याने, सर्वसमावेशकता वाढवण्याची प्रचंड क्षमता आम्हाला दिसते. यामुळे महिला आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांना भारताच्या अंतराळ परिसंस्थेचे भविष्य घडवण्यासाठी अधिक संधी मिळतात,” असे अ‍ॅडेको इंडियाचे संचालक आणि जनरल स्टाफिंग प्रमुख दीपेश गुप्ता म्हणाले.

 

डोमेन

प्रमुख जबाबदाऱ्या

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वेतन श्रेणी

सॅटेलाइट टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग (उपग्रह तंत्रज्ञान आणि उत्पादन)

पेलोड डिझाइन, असेंब्ली, आरएफ कम्युनिकेशन्स, सिस्टीम्स इंजिनीअरिंग

एअरोस्पेसमध्ये बी.टेक/एम.टेक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग

वर्षाला 6 ते 10 लाख, 3-5 वर्षांचा अनुभव गरजेचा

लाँच व्हेइकल डेव्हलेपमेंट

प्रॉपल्शन, ऍव्हियोनिक्स, स्ट्रक्चरल डिझाइन्स, क्रायोजेनिक्स

एअरोस्पेसमध्ये बी.टेक/ एम.टेक, पीएच.डी, ऍरॉनॉटिकल, मेकॅनिकल, किंवा क्रायोजेनिक्स इंजिनीअरिंग

वर्षाला 7.50 ते 13 लाख. 3-5 वर्षांचा अनुभव गरजेचा

सॉफ्टवेअर, डेटा अँड अर्थ ऑब्झर्वेशन

एआय/एमएल, जीआयएस ऍनॅलिटिक्स, रीमोट सेन्सिंग

कॉम्प्युटर सायन्स/आयटीमध्ये बी.टेक, डेटा सायन्स, जीआयएस, रीमोट सेन्सिंगमध्ये एम.एससी किंवा एआय/एमएल सर्टिफिकेशन्स

वर्षाला 9 ते 16 लाख. 3-5 वर्षांचा अनुभव गरजेचा

स्पेस आर अँड डी, आणि एक्स्प्लोरेशन

ऍस्ट्रॉफीजिक्स, प्लॅनेटरी सायन्स, स्पेस मेडिसिन, ऍडव्हान्स्ड मटेरियल्स

फीजिक्स, ऍस्ट्रॉनॉमी, स्पेस सायन्सेस, लाइफ सायन्सेस किंवा मटेरिअल सायन्सेसमध्ये एम.एससी/पीएच.डी.

वर्षाला 7.50 ते 13 लाख. 3-5 वर्षांचा अनुभव गरजेचा

बिझनेस अँड सपोर्ट फंक्शन्स

प्रोग्रॅम मॅनेजर्स, सप्लाय चेन आणि प्रोक्युरमेंट तज्ज्ञ, लीगल अँड कम्प्लायन्स सल्लागार, इंटरनॅशनल पार्टनरशिप मॅनेजर्स, फायनान्स अँड रिस्क ऍनॅलिस्ट्स, एचआर आणि टॅलेंट डेव्हलपमेंट लीड्स

(ऑपरेशन्स/फायनान्स/एचआर)मध्ये एमबीए, एलएलबी/एलएलएम, सीए/सीपीए, किंवा इंटरनॅशनल बिझनेस/पॉलिसी डिग्रीज

वर्षाला 5 ते 8.50 लाख. 3-5 वर्षांचा अनुभव गरजेचा

भविष्यातील जबाबदाऱ्या

स्पेस पॉलिसी ऍनॅलिस्ट, रोबोटिक्स इंजिनीअर, ऍव्हिओनिक्स तज्ज्ञ, जीएनसी तज्ज्ञ

पब्लिक पॉलिसीमध्ये एम.ए./एम.एससी., रोबोटिक्स, ऍव्हिओनिक्स, एअरोस्पेस किंवा कंट्रोल सिस्टीम्समध्ये बी.टेक/एम.टेक

वर्षाला 5 ते 8.50 लाख. 3-5 वर्षांचा अनुभव गरजेचा

 

 

प्रमुख क्षमतांच्या पलीकडे जात, भारताच्या अंतराळ क्षेत्राला वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यक्षम आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांची वाढत्या प्रमाणात गरज असेल. यामध्ये सायबर सुरक्षा आणि उपग्रह डेटा संरक्षण, एअरोस्पेस उत्पादनातील टिकाऊ पद्धती, स्वायत्त प्रणालींमध्ये एआय आणि नैतिकतेवर आधारित प्रशासन, सीमापार नियामक कौशल्य, अंतराळ रोबोटिक्स आणि मानव-केंद्रित अंतराळ मोहिमांसाठी डिझाइन विचार यांचा समावेश आहे. या क्षमता निर्माण करणे हे भारताला केवळ २०३३ चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठीच मदत करणे नाही तर अवकाश प्रतिभा नवोपक्रमासाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा अ‍ॅडेकोचा विश्वास आहे.

 

सर्वांनाच आवश्यक ते कौशल्य पुरवणे, उदयोन्मुख प्रतिभा वाढविण्यास आणि पुढील पिढीला अ

वकाश तंत्रज्ञान तसेच अन्वेषणातील करिअरसाठी तयार करण्यास मदत करून जागतिक कार्यबल नेता म्हणून अ‍ॅडेको हे परिवर्तन सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments