Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedलता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि.२१)* *माय होम इंडिया आणि...

लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि.२१)* *माय होम इंडिया आणि एमआयटी डब्ल्यूपीयु स्कूल ऑफ लिबरल आर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव आणि लता दीदींच्या स्मृतींना सुरेल अभिवादन*

 

 

पुणे : माय होम इंडिया आणि एमआयटी डब्ल्यूपीयु स्कूल ऑफ लिबरल आर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने लता मंगेशकर पुरस्कार सोहळा २०२५ तसेच लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीताला अभिवादन करणारी ‘सुनो सजना’ ही विशेष स्वरमैफल रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयु कॅम्पस स्वामी विवेकानंद सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माय होम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय थिटे यांनी दिली.

 

लता मंगेशकर पुरस्कार २०२५ अंतर्गत भारतीय संगीत क्षेत्रात मौलिक, दीर्घकालीन व प्रेरणादायी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षीचे पुरस्कारार्थी म्हणून डॉ. मृदुला दाढे, डॉ. शंतनु गोखले, विजय केळकर (अण्णा), जीवन धर्माधिकारी आणि श्रीकांत शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.

 

या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ‘ गप्पाष्टक’ कार डॉ. संजय उपाध्ये, प्रमुख अतिथी म्हणून मंगेशकर कुटुंबाचे प्रतिनिधी आदिनाथ मंगेशकर उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून कुलगुरू, एमआयटी-डब्ल्यूपीयू डॉ. रविकुमार चिटणीस तसेच जनसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा उपस्थित असतील. माय होम इंडियाच्या उपाध्यक्षा पौर्णिमा मेहता, विश्वस्त आनंद देवधर हेही यावेळी उपस्थित असतील. कार्यक्रमात संगीत अभ्यासक, संशोधक व सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे यांना त्यांच्या संशोधनात्मक व कलात्मक योगदानाची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

तसेच, प्रथितयश संतूर वादक डॉ. शंतनु गोखले यांना वाद्य संगीतातील उत्तम कामगिरीसाठी, सिने संगीतातील ज्येष्ठ गायक विजय केळकर (अण्णा) यांना त्यांच्या प्रदीर्घ संगीतसेवेसाठी, तर युवा संगीतकार जीवन धर्माधिकारी यांना नव्या पिढीतील सर्जनशील संगीतकार म्हणून गौरविण्यात येणार आहे. शाहिरीकला व लोकसंगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्रीकांत शिर्के हे ही या पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत.

 

तसेच सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ‘सुनो सुजना’ ही विशेष स्वरमैफल आयोजित करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांनी नटलेली ही स्वरसंध्या रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश असून, प्रवेशिका असलेल्या रसिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मोफत प्रवेशिका मिळवण्यासाठी १७ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत गोविंद स्मृती, १२१७, सदाशिव पेठ, भावे हायस्कूल शेजारी (श्री देवश्री फूड्सच्या खाली), पुणे येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

 

लता मंगेशकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत संगीत परंपरेचा सन्मान करणारा हा संपूर्ण सोहळा कला, संशोधन आणि लोकसंगीत यांचा सुरेल संगम ठरणार असून पुण्यातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उदय – ९१४५४५४४३५ किंवा वैभव – ९५९५०८१९९२ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments